पुणे, रत्नागिरी, मुंबईत काँग्रेस आयात उमेदवार देणार?
मुंबई: काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेच्या जागावाटपांची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. काही जागांवरुन दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरु आहे. असं असताना काँग्रेसला काही जागांवर आयात उमेदवार द्यावे लागण्याची शक्यता आहे. तशी तयारी काँग्रेसकडून सुरु आहे. काँग्रेस काही लोकसभा जागेवर आयात उमेदवार देण्याची शक्यता आहे. यामध्ये पुणे, रत्नागिरी आणि उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी […]
मुंबई: काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेच्या जागावाटपांची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. काही जागांवरुन दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरु आहे. असं असताना काँग्रेसला काही जागांवर आयात उमेदवार द्यावे लागण्याची शक्यता आहे. तशी तयारी काँग्रेसकडून सुरु आहे. काँग्रेस काही लोकसभा जागेवर आयात उमेदवार देण्याची शक्यता आहे. यामध्ये पुणे, रत्नागिरी आणि उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे.
रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात राणे यांना संपर्क करण्यासाठी एका मोठ्या काँग्रेस नेत्याची मध्यस्थी सुरु आहे. रत्नागिरीतून 2014 मध्ये नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणे हे काँग्रेसकडून लढले होते. मात्र त्यांचा पराभव झाला. सध्या राणे भाजपसोबत आहेत, तर निलेश राणे हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचं काम करत आहेत. त्यामुळे काँग्रेस रत्नागिरीत कोणाला उमेदवारी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पुण्यात संजय काकडे? दरम्यान, पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस संजय काकडेंना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. संजय काकडे हे सध्या भाजपचे राज्यसभेचे सहयोगी खासदार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती. संजय काकडे हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असून, काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही पुणे मतदारसंघासाठी आग्रह धरला होता. राष्ट्रवादीही संजय काकडेंना उमेदवारी देण्याच्या तयारीत होती. मात्र हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने, संजय काकडे काँग्रेसच्या संपर्कात आहेत.
पुण्यातील विद्यमान खासदार
दरम्यान, सध्या पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे अनिल शिरोळे हे विद्यमान खासदार आहेत. त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसच्या विश्वजीत कदम यांचा पराभव केला होता. सध्या विश्वजीत कदम हे वडील पतंगराव कदम यांच्या जागी विधानसभा पोटनिवडणुकीत निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्याऐवजी यावेळी काँग्रेस संजय काकडे यांना उमेदवारी देण्याची चिन्हं आहेत.
उत्तर मध्य मुंबई
दरम्यान, उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार प्रिया दत्त यांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मतदारसंघातही काँग्रेसला आयात उमेदवार द्यावा लागण्याची शक्यता आहे. प्रिया दत्त यांनी खासगी कारण देत, लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची इच्छा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली आहे.
संबंधित बातम्या
काँग्रेसला झटका, प्रिया दत्त यांची लोकसभेतून माघार
संजय काकडे काँग्रेसकडून पुणे लोकसभा निवडणूक लढवणार?
लोकसभा निवडणूक : पुणे जिल्ह्याचं राजकारण निर्णायक ठरणार!
मुंबई उत्तर मध्य लोकसभा : युती न झाल्यास पूनम महाजनांना मोठा फटका