आणखी एका खासदाराने भाजपची साथ सोडली, कॉंग्रेसचा हात हातात घेणार?

लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. विद्यमान भाजप खासदार यांनी तिकीट कापल्यामुळे या नेत्याने कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे वडील 2022 पर्यंत राज्यसभेचे खासदार होते. याशिवाय पाच वेळा आमदार आणि तीन वेळा राज्य सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत.

आणखी एका खासदाराने भाजपची साथ सोडली, कॉंग्रेसचा हात हातात घेणार?
pm narendra modiImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Mar 10, 2024 | 11:09 PM

नवी दिल्ली | 10 मार्च 2024 : भाजपने गेल्या शनिवारी लोकसभा उमेदवारांची पहिली यादि जाहीर केली. या यादीतून वगळण्यात आल्याने अनेक नेत्यांची नाराजी पक्ष नेतृत्वाने ओढवून घेतली आहे. भाजपने या निवडणुकीत ‘अब की बार, 400 पार’ हा नारा दिला आहे. मात्र, भाजपने जाहीर केलेल्या यादीनंतर अनेक नाराज नेत्यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर, काही जण कॉंग्रसमध्ये परवेश करून आपले नशीब अजमावणार आहेत. यात आणखी एका नेत्याची भर पडली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. हिसारमधील भाजप खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

भाजप खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी हिसारमधून निवडणूक लढविली होती. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट केली आहे. ‘राजकीय मजबुरीमुळे मी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मला हिसारच्या लोकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल पक्षाध्यक्ष जेपी नड्डा जी, पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचे आभार मानतो.’ असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

ब्रिजेंद्र सिंह हे माजी IAS अधिकारी आहेत. त्यांचे वडील बिरेंद्र सिंह हे 2022 पर्यंत राज्यसभेचे खासदार होते. याशिवाय पाच वेळा आमदार आणि तीन वेळा राज्य सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. 1984 मध्ये हिसारमध्ये त्यांनी ओमप्रकाश चौटाला यांचा पराभव केला होता. 2019 मध्ये बिरेंद्र सिंह यांनी मुलगा ब्रिजेंद्र सिंह यांना तिकीट मिळवून दिले होते. त्या निवडणुकीत ते विजयी झाले होते.

बिरेंद्र सिंह हे दीर्घकाळ काँग्रेसमध्ये होते. 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवून केंद्रीय मंत्री केले होते. याशिवाय त्यांच्या पत्नी उचाना मतदारसंघातून आमदार झाल्या होत्या. गेल्या निवडणुकीत ब्रिजेंद्र सिंह हे हिसार मतदारसंघातून विजयी झाले होते. बिरेंद्र सिंग हे पुन्हा कॉंग्रेसमध्ये जाणार असल्याचा चर्चा होत्या. या पार्श्वभूमीवर त्यांनी भूपेंद्रसिंग हुड्डा यांची अनेकदा भेट घेतली आहे.

आगामी 2024 च्या निवडणुकीत भाजपने हरियाणामध्ये जेजेपीसोबत युती केली आहे. येथे जागावाटपाबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, निवडणुकीत ब्रिजेंद्र सिंह यांना तिकीट नाकारले जाण्याची भीती आहे त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक लवकरच होऊ घातली आहे. ज्यामध्ये काही उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली जाऊ शकते. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात कार्यकर्त्यांनी ब्रिजेंद्र सिंह यांच्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या जागेवर उमेदवार बदलण्याची तयारी भाजपने सुरु केली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.