पुणे काँग्रेस भवनात शुकशुकाट, उमेदवार जाहीर करा, कार्यकर्त्यांची मागणी

पुणे : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. येत्या 11 एप्रिलपासून  पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे अनेक मतदारसंघातून उमेदवारांनी अर्ज भरण्यात सुरुवात केली आहे. मात्र काँग्रेसला पुणे मतदारसंघासाठी उमेदवारच मिळत नसल्याने पुण्याच्या काँग्रेस भवन परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. येत्या 23 एप्रिल रोजी पुण्यात लोकसभेसाठी मतदान होणार आहे. या लोकसभा मतदारसंघासाठी […]

पुणे काँग्रेस भवनात शुकशुकाट, उमेदवार जाहीर करा, कार्यकर्त्यांची मागणी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

पुणे : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. येत्या 11 एप्रिलपासून  पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे अनेक मतदारसंघातून उमेदवारांनी अर्ज भरण्यात सुरुवात केली आहे. मात्र काँग्रेसला पुणे मतदारसंघासाठी उमेदवारच मिळत नसल्याने पुण्याच्या काँग्रेस भवन परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

येत्या 23 एप्रिल रोजी पुण्यात लोकसभेसाठी मतदान होणार आहे. या लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून गिरीश बापट यांना उमेदवारी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. एकीकडे उमेदवारी अर्ज भरण्याचे चित्र असताना दुसरीकडे मात्र काँग्रेसकडून या मतदारसंघासाठी उमेदवारच जाहीर झालेला नाही. त्यामुळे पुण्यातील काँग्रेस भवनाबाहेर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे उमेदवार जाहीर झालेला नसतानाही काँग्रेस भवन बाहेर निवडणूक कचेरीसह, प्रचार साहित्य इत्यादी गोष्टी दिसत आहे.

दरम्यान गेल्या कित्येक दिवसांपासून पुणे लोकसभा मतदारसंघासाठी प्रविण गायकवाड यांचे नाव चर्चेत होतं. मात्र काही अडचणींमुळे काँग्रेसकडून प्रविण गायकवाड यांच्या नावावर  शिक्कामोर्तब होऊ शकला नाही. त्यातच आता पुण्यात काँग्रेसकडून अरविंद शिंदे यांचं नाव चर्चेत आलं आहे. सध्या अरविंद शिंदे हे पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक असून काँग्रेसचे महापालिका गटनेते आहेत. तसेच त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. त्यामुळे सध्या अरविंद शिंदे यांचे नावे पुणे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून समोर येत आहे. मात्र त्यांच्या नावावरही अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे पुण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींना लवकरात लवकर उमेदवार जाहीर करावा अशी विनंती केली आहे.

प्रविण गायकवाड यांची माघार

दरम्यान काँग्रेसकडे उर्मिलासाठी वेळ आहे, माझ्यासाठी नाही असं म्हणत प्रविण गायकवाड यांनी काँग्रेस तिकीटाच्या शर्यतीतून माघार घेतली.

संबंधित बातम्या :

काँग्रेसकडे उर्मिलासाठी वेळ, माझ्यासाठी नाही, प्रविण गायकवाडांची माघार

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.