नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने 2019 ची मतमोजणी संपल्यानंतर अंतिम निकालाची घोषणा केली. भाजपप्रणित एनडीएने 352 जागा मिळवत पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. भाजप नेते किरण रिजीजू यांच्या अरुणाचल प्रदेशातील जागेचा निकाल शुक्रवारी सायंकाळी जाहीर झाला. यामुळेच अंतिम निकालासाठी विलंब झाला. या निवडणुकीत एकट्या भाजपने 303, तर काँग्रेसने 52 जागा मिळवल्या आहेत.
मतमोजणीला विलंब कशामुळे?
देशातील 541 जागांचा अंतिम निकाल शुक्रवारी सकाळपर्यंत आला होता. पण अरुणाचल प्रदेशमधील एका जागेमुळे अंतिम निकाल रखडला. शुक्रवारी दुपारी किरण रिजीजू 1 लाख 56 हजार मतांनी काँग्रेस उमेदवाराच्या पुढे होते. पण मतमोजणी पूर्ण झालेली नसल्यामुळे त्यांना विजयाचं प्रमाणपत्र दिलं नाही. रिजीजू यांनी 1 लाख 74 हजार 843 मतांनी काँग्रेसच्या उमेदवारावर मात केली. 2014 मध्येही रिजीजू यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्याचीच पावती म्हणून त्यांना केंद्रात मंत्रीपदही मिळालं.
पक्षनिहाय जागा
आप – 01
एआयएडीएमके – 01
एमआयएम – 02
टीएमसी – 22
बसपा – 10
सपा – 05
भाजप – 303
शिवसेना – 18
बीजेडी – 12
सीपीआय – 02
सीपीआयएम – 03
डीएमके – 23
काँग्रेस – 52
जेडीएस – 01
नॅशनल कॉन्फरन्स – 03
जेडीयू – 16
लोक जनशक्ती पार्टी – 06
राष्ट्रवादी काँग्रेस – 05
अकाली दल – 02
टीआरएस – 09
टीडीपी – 03
वायएसआर काँग्रेस – 25
इतर पक्ष – 14