नवी दिल्ली : राज ठाकरे यांच्या भोंग्याचा (Loudspeaker) आवाज अख्या भारतभर पसरला. त्यानंतर देशभर भोंग्यावर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाजवली जाऊ लागली. तर उत्तर प्रदेशमध्ये सपावाल्यांनी मंहगाई डायनवर आवाज वाढवला. महाराष्ट्रात सुरू झालेल्या आजान आणि भोंग्याचा प्रश्न आता हिंदू महासभेने (Hindu Mahasabha) देखील हा विषय उटलून धरला आहे. तसेच महासभेने अजानवर बंदी घालावी अशी मागणी करताना सर्वोच्च न्यायालयाचे दारे ठोठावली आहेत. यावेळी हिंदु महासभेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करताना म्हटले आहे की, मशीद आणि इदगाहला प्रार्थनेची जागा मानली जाऊ शकत नाही. तसेच या जागा पब्लिक मिटींगच्या जागा आहेत. तसेच याचिकेत महासभेने या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सुरू झालेला हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह अख्या देशात आजानचा मुद्दा गाजत आहे. त्यानंतर दिल्लीती जंहागिरपुरी येथे झालेल्या हिंसाचारामुळे या विषयाला आणखी धग मिळाली आहे. तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्र शासनालाच 3 तारखेचा अल्टीमेट देत भोंगे उतारा म्हटले आहे. तसेच जर यानंतर भोंगे उतारले गेले नाही तर जशाच तसे उत्तर देऊ. मशीदींच्या समोर पाच वेळी हनुमान चालिसा वाजवू असे म्हटले होते. तसेच देशातील हिंदु ना तयार रहा असे आवाहन देखील त्यांनी केले होते. त्यानंतर भोंग्याचा वाद अख्या देशात परसला होता. त्यात आता हिंदु महासभेने उडी घेत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेण्याची मागणी केली आहे. तसेच महासभेने मशीद-इदगाहला कम्युनिटी मिटींगच्या जागा म्हणून घोषित करावे अशी मागणी केली आहे.
त्याचबरोबर महासभेने असे देखील म्हटले आहे की, ज्यावेळी इस्लामचा उदय झाला, त्याता प्रसार झाला आणि जेव्हा कुराण ही समाजात आला त्यावेळी काही लाउडस्पीकर नव्हते. त्यामुळे आता पहावं लागेल की याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय कधी सुनावणी घेईल. तर भोंग्याचा वाद हा महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेशसह इतर अनेक राज्यांत सुरू आहे. ज्यामुळे तणावाचे वातावरण आहे.
महाराष्ट्रात आजानचा आणि भोंग्याचा मुद्दा हा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उचलून धरा आहे. तसेच त्यांनी मशीदीवरील भोंगे उतरवा असे म्हटले आहे. त्यानंतर ऑल इंडिया सुन्नी जमीयत उलमा यांनी मुंबई पोलिसांकडे आजान संदर्भात मागणी केली. तर सुन्नी जमीयत उलमा संघंटनेचे मुंबई येथील अध्यक्ष सैयद मोईनुद्दीन अशरफ यांनी म्हटले आहे की, मशीदींवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करूनच लाउडस्पीकर लावण्यात आले आहेत.