मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांची निवड निश्चित
मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून अखेर किशोरी पेडणेकर यांचे नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती (Kishori Pednekar will be next mumbai mayor) सूत्रांनी दिली आहे.
मुंबई : मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून अखेर किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं (Kishori Pednekar will be next mumbai mayor) आहे. किशोरी पेडणेकर थोड्याच वेळात अर्ज दाखल करणार असल्याचेही सांगण्यात आलं (Kishori Pednekar will be next mumbai mayor) आहे. तर उपमहापौरपदासाठी सुहास वाडकर यांच्या नाव घोषित करण्यात आलं आहे. मावळते महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी ही घोषणा केली. मुंबई महापालिका महापौरपदासाठी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालं आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांचे निश्चित करण्यात आले (Kishori Pednekar will be next mumbai mayor) आहे.
मुंबईच्या महापौरपदासाठी अनेक ज्येष्ठ नगरसेवकांनी दावा केला होता. यशवंत जाधव, मंगेश सातमकर यांसारख्या स्थायी समितीच्या सदस्यांनी महापौरपदासाठी दावा केला होता. मात्र शेवटच्या क्षणी शिवसेनेकडून महापौरपदासाठी किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोललं जात आहे. लवकरच किशोरी पेडणेकर अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
महापौरपदासाठी शिवसेनेकडून नियमित चर्चेत असलेली नावं मागे पडत असल्याचे पाहायला मिळते. दरवेळी नवीन नावं देण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून कायम असल्याचे समजतं आहे. किशोरी पेडणेकर वरळीतील गांधीनगर-डाऊन मिलमधील नगरसेविका (Kishori Pednekar will be next mumbai mayor) आहेत.
मुंबई महापौर या पदासाठी शिवसेनेकडून अनेक महिला नगरसेविकाही दावेदार होत्या. दादरमधील नगरसेविका विशाखा राऊत यांनी सुद्धा महापौर पदासाठी दावा केला होता. त्यामुळे इतर दावेदार असलेल्या इच्छुकांची शिवसेना नेते अनिल परब मनधरणी करत आहेत. कोणीही नाराज होऊ नये आणि याचा फटका पक्षाला बसू नये यासाठी ही मनधरणी सुरु आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांची सध्या बैठक सुरु आहे. यात अनेक दावेदारांचे मन वळवले जात आहे.
तर दुसरीकडे मुंबईला मुदत संपल्यानंतर महिला महापौर मिळणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या महिला संघटनांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
राज्याच्या सत्तास्थापनेचा तिढा कायम असताना, तिकडे महापालिकेत महापौर (Mumbai mayor election) निवडणुकांचे वेध लागले आहे. राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेत महापौरपदाची (Mumbai mayor election) शर्यत सुरु झाली आहे.
दरम्यान दुसरीकडे शिवसेना-भाजप युती तुटल्याने, भाजपकडून महापौरपदासाठी उमेदवार देण्याची चर्चा होती. मात्र भाजपने मुंबई महापौरपदाची निवडणूक लढणार नाही अशी घोषणा केली आहे.
कोण आहेत किशोरी पेडणेकर?
- किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या (191 G/S) वरळीतील गांधीनगर-डाऊन मिलमधील नगरसेविका आहेत.
- त्यांचे शिक्षण 10 वी पर्यंत झाले आहे.
- किशोरी पेडणेकर यांचे शिक्षण वरळीतील बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल या शाळेत झाले आहे.
- किशोरी पेडणेकर या सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.
- आतापर्यंत त्यांनी एकही मोठ पद भूषवलेले नाही.
- काही काळासाठी त्यांनी एका वर्षासाठी स्थापत्य शहर समितीच्या अध्यक्षा होत्या.
- पेडणेकर यांना पालिका कामकाजाचा दांडगा अनुभव आहे.
- किशोरी पेडणेकर यांना 2017-18 वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे.
किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया
“महापौरपदासाठी माझ्या नावावर शिक्कामोर्तब झाले याचा मला आनंद आहे. पण त्यासोबत कामाची जबाबदारीही आता वाढली आहे. तसेच आता याचा आनंद साजरा करण्यापेक्षा मुंबईच्या समस्या सोडवणे हे मी माझे आदयकर्तव्य समजून काम करेन,” अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली.
आरक्षण सोडत
राज्य नगरविकास विभागाकडून राज्यातील एकूण 27 महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या पुढील पदावधीबाबतच्या आरक्षणाची सोडत काढली जाते. 2017 मध्ये महापालिकेच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर अडीच वर्षाची मुदत 8 सप्टेंबरलाच संपली होती. मात्र विधानसभा निवडणुकांमुळे महापौरपदाचा कालावधी तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आला. अखेर मुंबई महापालिका महापौरपदाचं खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालं. त्यामुळे इच्छुकांनी (Mumbai Mayor Candidates) पक्षश्रेष्ठींकडे भाऊगर्दी करण्यास सुरुवात केली आहे.
बीएमसीतील संख्यागणित –
- शिवसेना – 94
- भारतीय जनता पार्टी – 83
- काँग्रेस – 29
- राष्ट्रवादी काँग्रेस – 8
- समाजवादी पार्टी – 6
- एमआयएम – 2
- मनसे – 1
- अभासे – 1
मुंबई महापालिकेतील चित्र
मुंबई महापालिकेत भाजप शिवसेनेसोबत सत्तेत थेट सहभागी नाही. मात्र, भाजपला 2014 मध्ये राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिल्याने भाजपने बीएमसीत महापौर पदावर दावा केला नव्हता. शिवसेनेला मुंबई महापौरपदावर दावा करण्यासाठी बहुमताचा जादुई आकडा 113 होता. त्यासाठी भाजपनं शिवसेनेला मदत केली होती. मात्र, देशाची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई महापौरपद कायम ठेवण्यासाठी शिवसेनेला भाजपने आव्हान दिल्यास इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार होती. मात्र आता भाजपने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे.
संबंधित बातम्या :
मुंबईच्या महापौरपदासाठी शर्यतीत कोण कोण?
भाजपचा मोठा निर्णय, मुंबई महापौर निवडणुकीत उमेदवार देणार नाही