माढ्यात फक्त उमेदवारांची नव्हे, शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांचीही प्रतिष्ठा पणाला

सोलापूर : या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. 2009 साली नव्याने निर्माण केलेल्या माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी निवडणूक लढवली आणि ते विक्रमी मताने निवडून आले. त्यानंतर मनमोहन सिंह मंत्रीमंडळात कृषी मंत्री झाले. मात्र 2014 साली आपण लोकसभेची निवडणूक लढवणार नाही, असं जाहीर करत त्यांनी राज्यसभेची वाट धरली आणि […]

माढ्यात फक्त उमेदवारांची नव्हे, शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांचीही प्रतिष्ठा पणाला
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

सोलापूर : या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. 2009 साली नव्याने निर्माण केलेल्या माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी निवडणूक लढवली आणि ते विक्रमी मताने निवडून आले. त्यानंतर मनमोहन सिंह मंत्रीमंडळात कृषी मंत्री झाले. मात्र 2014 साली आपण लोकसभेची निवडणूक लढवणार नाही, असं जाहीर करत त्यांनी राज्यसभेची वाट धरली आणि 2014 च्या मोदी लाटेतही राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीचा गड राखला. तेव्हापासून माढा म्हणजे जणू राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असं समीकरण बनलंय.

यावेळची निवडणूक शरद पवार हे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर लढवणार असं जाहीर केलं होतं. मात्र एकाच कुटुंबातील किती जणांनी निवडणूक लढवावी यावर कुटुंबातील लोकांबरोबर चर्चा होऊन आपण निवडणुकीत माघार घेत असल्याचं पवारांनी जाहीर केलं. त्यामुळे माढा मतदारसंघाचा राष्ट्रवादीचा पर्यायाने शरद पवारांचा शिलेदार कोण याची उत्सुकता लागली होती. हे सगळं सुरु असताना राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आणि निवडणुकीआधी राष्ट्रवादीचा मोठा धक्का दिला.

शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला

सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटील आणि राष्ट्रवादी असे समीकरण होतं. मात्र आता मोहिते कुटुंबीयांनी भाजपशी घरोबा केल्याने माढा मतदारसंघातील आपली पकड ढिली होते की काय म्हणून शरद पवारांनी पुन्हा एकदा त्यांच्या प्लॅन बी नुसार मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक आणि सोलापूर जिल्हा परिषेदेचे संजय शिंदे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर केली. मोहिते पाटील हे भाजपात गेले आहेत. त्यामुळे मतदारसंघ राष्ट्रवादीच्या हातून जाऊ नये यासाठी राजकीय खेळात निष्णात असणारे शरद पवार स्वतः कामाला लागले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीसांचीही प्रतिष्ठा पणाला

माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील किंवा प्रभाकर देशमुख असतील अशी गृहीते धरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक म्हणून संजय शिंदे यांच्या पाठीमागे ताकत लावली होती. शिवाय अपक्ष असताना सुद्धा जिल्हा परिषदेतील मोहिते पाटलांचे साम्राज्य खालसा करण्यासाठी संजय शिंदे अपक्ष असताना त्यांना पाठींबा देऊन सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षस्थानी विराजमान केलं. म्हणूनच संजय शिंदे हे काही दिवस राष्ट्रवादीशी चार हात दूर राहून भाजपच्या नेत्यांशी सलगी वाढवली होती.

माढा मतदारसंघात संजय शिंदे यांच्या रूपाने भाजपला पाय रोवता येईल अशी धारणा मुख्यमंत्र्याबरोबरच पालकमंत्री विजयकुमार देशमुखांची झाली होती. मात्र आता हेच मनसुबे शरद पवारांनी उधळून लावले आहेत. संजय शिंदे हा आपला घरचा माणूस म्हणत संजय शिंदेनाच उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे संजय शिंदे यांच्या रूपाने माढा मतदारसंघाचा ताबा येईल असे वाटणाऱ्या मुख्यमंत्र्यांची संजय शिंदेंनी घोर निराशा केली. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेल्या भाजपच्या प्रयत्नांना मोठा ब्रेक बसलाय. संजय शिंदे यांच्या विरोधात तगडा उमेदवार देऊन आपली प्रतिष्ठा जपण्याचं आव्हान देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आहे आणि त्यासाठी ते सुद्धा कामाला लागले आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.