नाशिक : “राज्यातल्या गुंतवणुका बाहेर घेऊन जाण्याचा कट रचला जात असल्याची सरकार ओरड करत आहे. मात्र, या देशातील कुठल्याही व्यक्तीला आपल्या भागात उद्योग उभा राहावा यासाठी प्रयत्न करण्याचा अधिकार आहे,” असे म्हणत भाजप नेते माधव भांडारी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची पाठराखण केली आहे. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर चौफेर टीका केली. (Madhav Bhandari supported the Maharashtra visit of Yogi Adityanath)
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बॉलिवूडचे कलाकार तसेच निर्मात्यांची भेट घेत आहेत. त्याचाच भाग म्हणून मंगळवारी (1 डिसेंबर) अभिनेता अक्षय कुमारने आदित्यानाथ यांची भेट घेतली. तसेच, योगी आदित्यनाथ राज्यातील बड्या उद्योगपतींसोबतही बैठक घेणार आहेत. यावेळी उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक कशी वाढवता येईल यावर ते चर्चा करणार आहेत. याच कारणामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने योगींच्या दौऱ्यावर बोट ठेवले आहे. या टीकेनंतर राज्यातील भाजप नेते योगींच्या दौऱ्याची पाठराखण करत आहेत.
“राज्यातील गुंतवणुका बाहेर घेऊन जाण्याचा कट रचला जातोय, अशी ओरड महाविकास आघाडी सरकार करत आहे. या देशात व्यक्तीला आपल्या भागात उद्योग उभे राहावेत यासाठी प्रयत्न करण्याचा अधिकार आहे. एखादी व्यक्ती त्यासाठी प्रयत्न करु शकते,” असे भांडारी म्हणाले. तसेच, सराकरच्या नाकर्तेपणामुळे जर उद्योग राज्याच्या बाहेर जात असतील तर काय करणार?, हा खरा प्रश्न आहे, असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेस नेते सचीन सावंत यांनी आदित्यनाथ यांच्या भेटीमुळे बॉलिवूडधील निर्मात्यांवर जोर-जबरदस्ती केली जाऊ शकते असा आरोप केला. तर, सर्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ‘महाराष्ट्रातील सरकार बदलले तर उत्तरप्रदेश सरकारच्या नावाखाली बॉलीवूडचे लचके तोडण्याची पटकथा तयार झालेली दिसते. ताकदीच्या बळावर दुसऱ्याच्या ताटातील घास हिसकावून पोट भरणे योग्य नाही, ‘ असे चव्हाण म्हणाले.
नोव्हेंबरमध्ये मोदी सरकारला मोठं यश, ज्या मुद्द्यावर विरोधकांनी घेरलं त्यातच मिळवला विजयhttps://t.co/gQa8IwaEU6
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 1, 2020
संंबंधित बातम्या :
कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही; सुप्रिया सुळेंचा इशारा
बॉलिवूड मुंबईतून कोणीही नेऊ शकत नाही, योगी आदित्यनाथ अभ्यासासाठी येत असावेत : चंद्रकांत पाटील
कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही; सुप्रिया सुळेंचा इशारा
(Madhav Bhandari supported the Maharashtra visit of Yogi Adityanath)