माधुरी दीक्षित पुण्यातून लढणार का? भाजपची पहिली प्रतिक्रिया

पुणे : अभिनेत्री माधुरी दीक्षित भाजपच्या वतीने पुण्यातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. भाजपने यावर स्पष्टीकरण देत, अजून असा कोणताही निर्णय झाला नसल्याचं म्हटलं आहे. भाजपच्या संसदीय बोर्डाचा निर्णय अंतिम असतो, अजून असा निर्णय झालेला नाही, अशी माहिती पुणे भाजपचे अध्यक्ष योगेश गोगावले यांनी दिली. पुण्यातून माधुरीला जर उमेदवारी दिली, तर भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी […]

माधुरी दीक्षित पुण्यातून लढणार का? भाजपची पहिली प्रतिक्रिया
संपर्क फॉर समर्थन या यात्रेअंतर्गत भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी जून महिन्यात माधुरी दीक्षितची भेट घेतली होती.
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:54 PM

पुणे : अभिनेत्री माधुरी दीक्षित भाजपच्या वतीने पुण्यातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. भाजपने यावर स्पष्टीकरण देत, अजून असा कोणताही निर्णय झाला नसल्याचं म्हटलं आहे. भाजपच्या संसदीय बोर्डाचा निर्णय अंतिम असतो, अजून असा निर्णय झालेला नाही, अशी माहिती पुणे भाजपचे अध्यक्ष योगेश गोगावले यांनी दिली. पुण्यातून माधुरीला जर उमेदवारी दिली, तर भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, माधुरीला उमेदवारी देण्यासारखी वेळ भाजपवर अजून आलेली नसल्याचं भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी म्हटलं आहे. आठ आमदार आणि दोन खासदार असताना भाजपकडे सक्षम उमेदवार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या बातम्या पेरल्या जात आहेत. पुणेकर माधुरीला स्वीकारणार नाहीत. खासदारकीचा उमेदवार हा पुण्यातील आणि भाजपचा असेल. पक्ष सर्वांना विचारात घेऊन निर्णय घेईल, असंही संजय काकडे म्हणाले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यावेळीही भाजप सेलिब्रिटींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजपने देशव्यापी सर्वेक्षण सुद्धा केले आहे. या सर्वेक्षणानुसार बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ अर्थात प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितला सुद्धा भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्र ‘मिड डे’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले आहे. ‘मिड डे’च्या वृत्तानुसार, 2019 साली भाजपकडून माधुरी दीक्षितला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. माधुरीसाठी मुंबई आणि पुण्यातील मतदारसंघांची चाचपणी झाली. त्यात पुण्यातून माधुरीला लोकसभेसाठी उतरवलं जाण्याची शक्यता अधिक आहे. भाजपचे कट्टर कार्यकर्ते, काहीशे तटस्थ आणि भाजपविरोधक अशा मतदारांकडून भाजपने या सर्वेक्षणाअंतर्गत मतं जाणून घेतली.  

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.