भगतसिंह कोश्यारींकडे गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त प्रभार

गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची बदली मेघालयच्या राज्यपालपदी करण्यात आली आहे.

भगतसिंह कोश्यारींकडे गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त प्रभार
Follow us
| Updated on: Aug 18, 2020 | 12:33 PM

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त प्रभार सोपवण्यात आला आहे. गोवा राज्याचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक यांची बदली झाल्याने कोश्यारींकडे अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (Bhagat Singh Koshyari gets additional Charge as Goa Governor)

गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची बदली मेघालयच्या राज्यपालपदी करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बदलीच्या पत्रकावर स्वाक्षरी केली आहे.

कोण आहेत सत्यपाल मलिक?

सत्यपाल मलिक हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. 25 ऑक्टोबर 2019 रोजी गोव्याच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मलिक हे ऑगस्ट 2018 ते ऑक्टोबर 2019 काळात जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. त्यांच्याच कार्यकाळात जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा कलम 370 रद्द करण्याचा घटनात्मक निर्णय ऑगस्ट 2019 मध्ये घेण्यात आला होता.

1974 ते 1977 दरम्यान त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभेत आमदारकी भूषवली. 1980 ते 86 मध्ये त्यांनी राज्यसभेवर उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले. तर 1989 ते 1991 दरम्यान ते जनता दलाकडून अलिगढचे लोकसभा खासदार होते. ऑक्टोबर 2017 ते ऑगस्ट 2018 दरम्यान ते बिहारचे राज्यपाल होते.

भगतसिंह कोश्यारी यांचा परिचय

भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे 5 सप्टेंबर 2019 रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. कोश्यारी यांची भूमिका महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात महत्त्वाची राहिली आहे.

भगतसिंह कोश्यारी यांचा जन्म 17 जून 1942 रोजी झाला. कोश्यारी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत असून भाजपच्या वरिष्ठ फळीतील नेते आहेत. आणीबाणीच्या काळात 1977 मध्ये त्यांनी तुरुंगवारीही भोगली आहे. 79 वर्षीय भगतसिंह कोश्यारी यांनी इंग्रजी साहित्य विषयात पदवी संपादन केली आहे. व्यवसायाने ते शिक्षक आणि पत्रकारही होते. (Bhagat Singh Koshyari gets additional Charge as Goa Governor)

उत्तराखंड राज्याच्या निर्मितीनंतर भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 2001-2002 या काळात ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. 2002 ते 2007 या काळात उत्तराखंड विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी त्यांची वर्णी लागली होती. 2008 ते 2014 या काळात ते राज्यसभेचे खासदार होते. तर 2014 मध्ये ते नैनिताल-उधमसिंग नगर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते.

संबंधित बातम्या :

हम बहुत छोटे लोग, हेलिकॉप्टरसे आते नही, 79 व्या वर्षी कोश्यारींनी पायीच शिवनेरी केला सर

(Bhagat Singh Koshyari gets additional Charge as Goa Governor)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.