विधान परिषद : ठाकरे सरकारकडून विचारणा, राज्यपालांकडून प्रतिसाद नाही

मात्र अद्याप यावर राज्यपालांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (Governor elected Vidhan Parishad MLC Candidate List) 

विधान परिषद : ठाकरे सरकारकडून विचारणा, राज्यपालांकडून प्रतिसाद नाही
राजभवनाकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपलब्ध नसल्याचे कळवण्यात आले आहे.
Follow us
| Updated on: Dec 28, 2020 | 5:43 PM

मुंबई : विधान परिषदेवरील राज्यपाल निर्देशित आमदारांच्या नियुक्त्यांना अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांकडून 12 आमदारांची यादी तयार आहे. ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. मात्र अद्याप यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. विशेष म्हणजे महाविकासआघाडी सरकारकडून याबाबत दोन वेळा विचारणा करण्यात आली आहे. मात्र अद्याप यावर राज्यपालांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (Maha Vikas Aaghadi Government Ask Governor elected Vidhan Parishad MLC Candidate List)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत महाविकासआघाडी सरकारकडून राज्यपालांना दोन वेळा विचारणा करण्यात आली आहे. ही यादी राज्यपालांना सुपूर्द करुन काही महिने उलटले आहेत. मात्र तरीही  राज्यपालांनी या 12 आमदारांच्या यादीवर सही केलेली नाही. त्यामुळे या यादीवर नेमका कधी शिक्कामोर्तब होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी तयार आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे सुपूर्द करण्यात आली आहे. मात्र अद्याप यावर राज्यपालांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान जून महिन्यापासून या जागा रिक्त असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियुक्त्या लांबल्या होत्या.

राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदारांसाठी निकष काय?

कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेत 12 सदस्य नियुक्त करण्याचे राज्यपालांना अधिकार आहेत. मंत्रिमंडळाकडून शिफारस करण्यात आलेली नावे राज्यपालांकडून स्वीकारली जातात. मात्र सध्या राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारचे संबंध पाहता तिन्ही पक्षांनी शिफारस केलेल्या नेत्यांची वर्णी सहजासहजी लागणे दुरापास्त मानले जाते.

कोणाकोणाची नावं चर्चेत?

शिवसेना

सुनील शिंदे – वरळीचे माजी आमदार, आदित्य ठाकरेंसाठी जागा सोडली

आदेश बांदेकर – शिवसेना नेते, श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष (राज्यमंत्रिपद दर्जा), 2009 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर माहिममधून पराभव

सचिन अहिर – 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश, माजी आमदार, आदित्य ठाकरेंच्या विजयात मोठा वाटा मानला जातो, त्याची बक्षिसी म्हणून विधानपरिषद आमदारकी मिळण्याची शक्यता

शिवाजीराव आढळराव-पाटील – सलग तीन वेळा शिरुरचे खासदार, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले नेते डॉ. अमोल कोल्हेंकडून पराभव, आमदारकीतून राजकीय पुनर्वसन होण्याची चिन्हं

वरुण सरदेसाई – युवासेना सरचिटणीस

राहुल कनाल – युवासेना पदाधिकारी

वरुण सरदेसाई यांच्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे प्रयत्नशील असल्याचे म्हटले जाते

राष्ट्रवादी

एकनाथ खडसे – भाजपचा राजीनामा देत नुकतेच राष्ट्रवादीत आगमन, राजकीय पुनर्वसनासाठी आमदारकी जवळपास निश्चित

शिवाजी गर्जे – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, माजी सनदी अधिकारी असलेले गर्जे हे शरद पवार यांच्या मर्जीतील मानले जातात

आदिती नलावडे – मुंबई संघटक आणि सोशल मीडिया सेलच्या प्रमुख, माजी विधानसभा अध्यक्ष व शिवसेनेचे नेते दिवंगत दत्ताजी नलावडे यांच्या पुतणी, सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय

सूरज चव्हाण – राष्ट्रवादी पदाधिकारी

राजू शेट्टी – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे नाव जवळपास निश्चित मानले जाते

आनंद शिंदे – प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांची विधानपरिषदेवर वर्णी निश्चित मानली जाते

(Governor Elected Vidhan Parishad MLC Election Candidates)

काँग्रेस

सचिन सावंत – काँग्रेस प्रवक्ते

आशिष देशमुख – नागपूरमधील काटोलचे माजी आमदार, भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश

नसीम खान – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, माजी कॅबिनेट मंत्री

मोहन जोशी – माजी विधानपरिषद आमदार, 2019 मध्ये पुण्यातून भाजप नेते गिरीश बापट यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीत पराभव

सत्यजीत तांबे – महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष

(Maha Vikas Aaghadi Government Ask Governor elected Vidhan Parishad MLC Candidate List)

संबंधित बातम्या : 

विधान परिषद : खडसे, बांदेकर ते सरदेसाई, तांबे; राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी 17 नावं चर्चेत

राजकारणातही ‘शिंदेशाही बाणा’, गायक आनंद शिंदे राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.