महाआघाडीची गाडी सुसाट, आता ब्रेक नाही : संजय राऊत
ज्या वेगाने आम्ही पुढे निघालो आहोत. आता आमच्या गाडीला ब्रेक नाहीत. ब्रेक काढलेत. गाडी वेगाने पुढे चालली आहे," असं मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त (Sanjay Raut On mahaaghadi) केलं.
नवी दिल्ली : राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत (Sanjay Raut On mahaaghadi) आहे. दिल्लीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकांचे सत्र सुरु आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी चर्चा केली असता ते (Sanjay Raut On mahaaghadi) म्हणाले, “सत्तास्थापनेचा दावा शनिवारपर्यंत करण्यात आता मला कुठलीही अडचण दिसत नाही. ज्या वेगाने आम्ही पुढे निघालो आहोत. आता आमच्या गाडीला ब्रेक नाहीत. ब्रेक काढलेत. गाडी वेगाने पुढे चालली आहे,” असं मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त (Sanjay Raut On mahaaghadi) केलं.
“सरकार स्थापनेच्या घडामोडी अंतिम टप्प्याच्याही पलीकडे गेल्या आहेत. उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यात बैठक होत आहे. पुढील पाच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे आम्ही गृहीत धरुन चाललो आहे,” असेही संजय राऊत म्हणाले.
“सर्व महाराष्ट्राची इच्छा आहे, की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असावेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही महाआघाडी आहे इतकं मला माहीत आहे. बाकी सर्व आपआपल्या पद्धतीने तिचं नामकरण करत आहेत,” असेही राऊत यावेळी (Sanjay Raut On mahaaghadi) म्हणाले.
“छत्रपतींच्या नावाने महाराष्ट्रातील प्रत्येक मोठी गोष्ट घडत असते एवढं मी सांगतो. छत्रपती शिवरायांचे राज्य हे जगातलं सर्वात पहिले सेक्युलर राज्य होते,” असेही संजय राऊत म्हणाले.
“स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा ही मागणी कशाला करायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य येऊन साडे पाच वर्षे होत आली. मागणी करण्याची गरजच नाही,” अशी टीकाही संजय राऊत यांनी (Sanjay Raut On mahaaghadi) केली.
दरम्यान सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान संजय राऊत म्हणाले, “राष्ट्रवादीला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देण्याविषयी आमच्याकडे कोणतीही माहिती नाही. ही चर्चा योग्य नसून त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही,” असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
“काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची काल बैठक झाली. या बैठकीत काय झालं, त्याबाबत मी बोलणार नाही. त्यांनी काही निर्णय घेतल्याचं मला समजलं. त्यावेळी माझ्याशी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीही त्यांनी फोनवरुन चर्चा केली, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. मी शरद पवारांना भेटणार आहे, पण सोनिया गांधींना इतक्यात भेटण्याचं प्रयोजन नसल्याचंही राऊतांनी (Sanjay Raut On mahaaghadi) सांगितलं.”
संबंधित बातम्या :
राष्ट्रवादीला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा योग्य नाही : संजय राऊत
‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनायचं आहे हे आधी माहीत असतं तर भाजपने पाठिंबा दिला असता’