मोठे प्लेअर आले की छोट्या प्लेअरला विसरतात; महादेव जानकर यांची भाजप विरोधात खदखद; शरद पवार यांच्याबद्दल म्हणाले…

लोकसभा जागा वाटपावरुन राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. आम्ही छोटे प्लेअर आहोत. मोठे प्लेअर आले की छोट्या प्लेअरना कोण विचारणार अशा शब्दात महादेव जानकर यांनी भाजपावर टीका केली आहे.

मोठे प्लेअर आले की छोट्या प्लेअरला विसरतात; महादेव जानकर यांची भाजप विरोधात खदखद; शरद पवार यांच्याबद्दल म्हणाले...
mahadev jankar and devendra fadnavis Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Mar 20, 2024 | 2:17 PM

पुणे | प्रतिनिधी, 20 मार्च 2024 : लोकसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. तरी अनेक जागांचे वाटप अजून पूर्ण झाले नाही. त्यावर महायुती आणि महाविकास आघाडीत अजून चर्चा सुरु आहे. त्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना अजून महाविकास आघाडीने किंवा महायुतीने थेट संपर्क केलेला नाही. त्यांनी आता जर कोणी बोलवले नाहीत तर माढा आणि परभणी येथून स्वत:च्या बळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. महायुतीकडे आपण तीन जागा मागितल्या होत्या. परंतू त्यांनी आम्हाला न विचारताच माढा लोकसभेचा उमेदवार परस्पर जाहीर केला असे रासपचे नेते महादेव जानकर यांनी म्हटले आहे.मोठे प्लेयर आले की छोट्या प्लेयर ला विसरतात का ? अशा शब्दात जानकर यांनी भाजपावर टीका केली आहे.

रासपचे महादेव जानकर यांना भाजपाने मंत्री केले होते. आता महादेव जानकर यांनी लोकसभा लढविण्यासाठी चाचपणी सुरु केली आहे. अलिकडेच आपल्याला महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्याशीच आपली चर्चा झाल्याचे जानकर यांनी म्हटले होते. आपल्याला महाविकास आघाडी परभणीची जागा द्यायला तयार नाही. आणि महायुतीने तर माढाचा उमेदवार जाहीर करून टाकला आहे. आम्ही त्यांना तीन जागा मागितल्या होत्या. त्यांनी आम्हाला न विचारताच माढा लोकसभेचा उमेदवार जाहीर केला. त्यांना महादेव जानकर ची गरज वाटली नसेल, मोठे प्लेयर आले की छोट्या प्लेयर ला विसरतात अशा शब्दात महादेव जानकर यांनी भाजपावर टीका केली आहे.

पंकजा मुंडे यांना शुभेच्छा आहेतच

देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र आहेत, उद्या ही राहतील. परंतू राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो आणि शत्रूही नसतो असे महादेव जानकर यांनी म्हटले आहे. शरद पवार मोठ्या मनाचा माणूस आहे, त्यांनी मला प्रतिसाद दिला. मी हळव्या मानाचा माणूस आहे, आमच्यात चांगली चर्चा झाली आहे असेही जानकर यांनी म्हटले आहे. दोन जागा देवून महाविकास आघाडीने सेटलमेंट करावी अशी मागणी जानकर यांनी केली आहे. पंकजा मुंडे माझी बहीण आहे माझ्या तिला शुभेच्छा आहेर आहे. तिने पण मला शुभेच्छा दिल्या आहेत. माझ तिच्यावर प्रेम आहे, बहीण म्हणून माझी साथ असेल असेही जानकर यांनी म्हटले आहे.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....