Mahadev Jankar : रामदास आठवलेंपाठोपाठ आता महादेव जानकरांचीही मंत्रिपदाची मागणी, महामंडळावरही केला दावा

Mahadev Jankar : रामदास आठवले यांनीही रिपाइंला मंत्रिपद देण्याची मागणी केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आम्हाला मंत्रिपद द्यायला हवं. मागच्या सरकारमध्ये आम्हाला महायुतीच्या माध्यमातून मंत्रिपद मिळालं होतं. त्यामुळे नव्या सरकारमध्ये रिपाइंला संधी मिळायला हवी, असंही ते म्हणाले.

Mahadev Jankar : रामदास आठवलेंपाठोपाठ आता महादेव जानकरांचीही मंत्रिपदाची मागणी, महामंडळावरही केला दावा
रामदास आठवलेंपाठोपाठ आता महादेव जानकरांचीही मंत्रिपदाची मागणी, महामंडळावरही केला दावाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 1:00 PM

नवी दिल्ली: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले (ramdas athawale) यांनी राज्यात रिपाइंला मंत्रिपद देण्याची मागणी भाजपकडे केली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे. आठवलेंपाठोपाठ आता राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनीही भाजपकडे मंत्रिपदाची मागणी केली आहे. भाजपने मित्र पक्षांना सत्तेत वाटा दिला पाहिजे. आम्हाला एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक महामंडळ दिलं पाहिजे, अशी मागणी महादेव जानकर यांनी केली आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेतून 40 आमदारांनी बंड केलं आहे. तसेच दहा अपक्ष आमदारांनीही शिवसेनेची साथ सोडून एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यात काहीजणांनी तर मंत्रिपदावरही पाणी सोडलं आहे. त्यामुळे या सर्वांना मंत्रिमंडळात सामावून घेताना मित्र पक्षालाही मंत्रिमंडळात भाजप कसे स्थान देणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महादेव जानकर दिल्लीत आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या मित्रपक्षांना वाटा मिळायला हवा. रासपला एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक महामंडळ मिळावं. भाजपने मित्रपक्षांचा सन्मान ठेवावा. पुढील दोन तीन दिवसात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात रासपला वाटा दिला पाहिजे, अशी मागणी महादेव जानकर यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

मंत्रीपद आणि महामंडळेही हवेत

दरम्यान, रामदास आठवले यांनीही रिपाइंला मंत्रिपद देण्याची मागणी केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आम्हाला मंत्रिपद द्यायला हवं. मागच्या सरकारमध्ये आम्हाला महायुतीच्या माध्यमातून मंत्रिपद मिळालं होतं. त्यामुळे नव्या सरकारमध्ये रिपाइंला संधी मिळायला हवी, असंही ते म्हणाले. आठवले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी फडणवीस यांच्याकडे आपली मागणी ठेवली. रिपाइंला एक मंत्रिपद, महामंडळाचं अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालकपद द्यावे. तसेच शासनाच्या विविध कमिट्यांवर रिपाइंच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात यावी, अशी मागणीही आठवले यांनी फडणवीस यांच्याकडे केली. त्यावर रिपाइंच्या मागण्यांचा विचार करण्याचं आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचं आठवले म्हणाले.

रिपाइंला मुंबईत युती हवी

यावेळी आठवले यांनी मुंबई, ठाण्यासह राज्याच्या इतर महापालिकेत रिपाइं, शिंदे गट आणि भाजपची युती व्हावी, अशी इच्छा बोलून दाखवली आहे. युतीत रिपाइंला सन्मानजनक जागा मिळाव्यात अशी अपेक्षाही आठवले यांनी व्यक्त केली आहे. तसेच या युतीत मनसेला घेण्यास आठवले यांनी विरोध केल्याचंही सांगण्यात येतं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.