Big News: विधानभवनाच्या बाहेर आत्मदहनाचा प्रयत्न, रॉकेल अंगावर ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न
विधानभवनाच्या बाहेर आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. कांदळगावच्या एका व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
मुंबई : विधानभवनाच्या (Vidhanbhavan) बाहेर आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. कांदळगावच्या एका व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. साताऱ्यातील कांदळगावचे शेतकरी सुभाष भानुदास देशमुख यांनी आज विधिमंडळ परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी विधान भवनाबाहेर रॉकेल अंगावर टाकत स्वत:ला पेटवून घेतलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आग विझवत देशमुख यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. शेतीच्या वादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे.
आत्मदहनाचा प्रयत्न
विधिमंडळ अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. अधिवेशनावेळी साताऱ्यातील कांदळगावचे शेतकरी सुभाष भानुदास देशमुख यांनी आज विधिमंडळ परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सुभाष देशमुख यांनी विधान भवनाबाहेर रॉकेल अंगावर टाकत स्वत:ला पेटवून घेतलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आग विझवत देशमुख यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. शेतीच्या वादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. चौथा दिवस देखील अपेक्षेप्रमाणे वादळी ठरण्याची शक्यता आहे. अधिवेशनाचे तीन दिवस विरोधकांच्या आंदोलनाने आणि घोषणाबाजीने चांगलेच गाजले. विरोधकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत वेगवेगळ्या मागण्या केल्या. सध्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा मुद्दा गाजत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी आवाज उठवलाय. दुसरीकडे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट जनतेतून सरपंच निवडीबाबतचे विधेयक मांडले. मात्र या विधेयकाला विरोधकांनी जोरदार विरोध केला. यावरून आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगल्याचे पहायला मिळाले. आजदेखील विधिमंडळात अनेक प्रश्नावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चौथा दिवस देखील वादळी ठरू शकतो.
आज विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी 50-50 बिस्कीटांचे पुडे घेऊन घोषणाबाजी करण्यात आली. आमच्या हातात 50-50 बिस्कीटांचे पुडे आहेत मात्र त्यांच्या हातात काय आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. सरकारमध्ये आता मंत्री असलेले त्यावेळी गुवाहाटीला का गेले असा सवाल त्यांनी केला. मंत्री महोदय यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आपल्याला 50 खोके हवेत का असे बोलले होते. सत्तेच्या मस्तीत अशी उत्तर कोण देऊ शकतो का, असा संतप्त सवाल शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.