ठाणे : सुरक्षा नाकारल्याच्या आरोपांनतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांच्या ठाण्यातील नंदनवन बंगल्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. नंदनवन बंगल्याला 10 फूट उच भिंतीचं कुंपण घालण्यात येतंय. पुढील पाच दिवस हे काम चालणार आहे.युद्ध पातळीवर या कामाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हे कुंपण घालण्यात येतंय. रस्त्यालगत बंगला असल्याने आतील हालचाली दिसू नयेत, यासाठी बंगल्याला चहूबाजूने कुंपण घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकनाथ शिंदे हे सध्या नंदनवन बंगल्यातच (Nandan Bungalow) राहत आहेत. पुढेही इथेच राहणार असल्याची माहीती मिळतेय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसाठी देण्यात येणाऱ्या वर्षा बंगल्यावर ते राहायला जाणार का? हा प्रश्न अनुत्तरित राहातो.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांच्या ठाण्यातील नंदनवन बंगल्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. नंदनवन बंगल्याला 10 फूट उच भिंतीचं कुंपण घालण्यात येतंय. पुढील पाच दिवस हे काम चालणार आहे.युद्ध पातळीवर या कामाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हे कुंपण घालण्यात येतंय. रस्त्यालगत बंगला असल्याने आतील हालचाली दिसू नयेत, यासाठी बंगल्याला चहूबाजूने कुंपण घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच एकनाथ शिंदे यांनी सुरक्षतेसाठी मर्यादित पोलीस कर्मचारी असावेत अशा सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या. सुरक्षेबाबत गंभीर नसलेल्या एकनाथ शिंदे यांच्या जुन्या किस्स्याची आता नव्याने चर्चा रंगू लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना त्यांच्या जीविताला धोका असतानाही त्यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना सुरक्षा नाकारली असा आरोप शिंदे गटाचे आ. सुहास कांदे यांनी केला होता. शिवाय त्यांनी केलेल्या आरोपाचे सतेज पाटील यांनी खंडन केले त्यानंतर शंभुराज देसाईं यांनी मात्र या आरोपाला दुजोरा दिला आहे.
नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदे यांना धमकीचे पत्र आल्यानंतर यावर दोन्ही सभागृहात चर्चाही झाली होती. त्यामुळे सुरक्षतेच्या अनुशंगाने राज्य गृहमंत्री म्हणून सुरक्षाही जाहीर केली होती. धमकी पत्राची सतत्या पडताळण्यात आली. यामध्येही त्यांना सुरक्षेची गरज पाहिजे असाच सूर उमटला होता. त्याअनुशंगाने अधिकऱ्यांशी बैठक पार पडत असताना सकाळी 8 ते साडे आठच्या दरम्यान आपणास वर्षा निवसस्थानावरुन फोन आल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले आहे. एवढेच नाहीतर एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षतेबाबत विचारणा झाल्यानंतर त्यांना सुरक्षतेची गरज नसल्याचे खुद्द उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचे देसाई म्हणाले.