12 आमदारांची यादी 7 महिन्यांपासून राज्यपालांकडेच, गलगलींना RTI मध्ये माहिती, आता मुंबई हायकोर्टातही याचिका

| Updated on: Jun 15, 2021 | 1:52 PM

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावाची यादी 6 नोव्हेंबर 2020 रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली. यादी सादर करुन 7 महिने उलटले तरीही राज्यपालांनी नियुक्ती केलेली नाही.

12 आमदारांची यादी 7 महिन्यांपासून राज्यपालांकडेच, गलगलींना RTI मध्ये माहिती, आता मुंबई हायकोर्टातही याचिका
फाईल फोटो
Follow us on

कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही 9 मराठी, मुंबई : ठाकरे सरकारने शिफारस केलेल्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा (12 MLC Maharashtra) प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकीकडे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली (Anil Galgali) यांच्या अपिलावर आज सुनावणी झाली. त्यावेळी ही नावांची यादी राज्यपालांकडे सुरक्षित असल्याचं त्यांना कळवण्यात आलं. तर दुसरीकडे 12 आमदार यांच्या नियुक्तीबाबत मुंबई हायकोर्टात (High Court) जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत 12 आमदारांची तात्काळ नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले असून, 25 जूनला पुढील सुनावणी होणार आहे. (Maharashtra 12  governor nominated mlc contro, PIL in Bombay high court also hearing on Anil Galgalis appeal)

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावाची यादी 6 नोव्हेंबर 2020 रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली. यादी सादर करुन 7 महिने उलटले तरीही राज्यपालांनी नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष निर्माण झाला आहे.

अनिल गलगलींच्या याचिकेवर सुनावणी

दरम्यान, राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांबाबत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केलेल्या अपिलावरील सुनावणी झाली. राज्यपाल कार्यालयात उपसचिव प्राची जांभेकर यांनी याला उत्तर दिलं. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, त्यामुळे आता ही यादी तुम्हाला देऊ शकत नाही, मात्र ती राज्यपालांकडे सुरक्षित असल्याचं कळवण्यात आलं आहे. निकाल आल्यानंतर राज्यपाल त्यावर निर्णय घेतील. तसेच आपल्या माहिती अंतर्गत मागवण्यात येत असलेल्या माहितीबाबत कायदेशीर सल्ला घेऊनच आपल्याला उत्तर दिले जाईल असे सांगण्यात आल्याचे गलगली यांनी सांगितले.

12 सदस्यांमध्ये कोणाची नावं?

काँग्रेस

1) सचिन सावंत – सहकार आणि समाजसेवा
2) रजनी पाटील – सहकार आणि समाजसेवा
3) मुजफ्फर हुसैन – समाजसेवा
4) अनिरुद्ध वनकर – कला

राष्ट्रवादी काँग्रेस

1) एकनाथ खडसे
2) राजू शेट्टी – सहकार आणि समाजसेवा
3) यशपाल भिंगे – साहित्य
4) आनंद शिंदे – कला

(List of Governor elected 12 MLC hand over to Bhagat Singh Koshyari)

शिवसेना

1) उर्मिला मातोंडकर – कला
2) नितीन बानगुडे पाटील-
3) विजय करंजकर –
4) चंद्रकांत रघुवंशी –

संबंधित बातम्या 

विधानपरिषद : राष्ट्रवादीच्या यादीत खडसे, शेट्टी, आनंद शिंदेंचं नाव, शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, नितीन बानुगडे

राज्यपाल आणि आमचं एकमेकांवर प्रेम, ते 12 जणांची यादी नाकारणार नाहीत : राऊत

विधानपरिषद : उर्मिला आणि नितीन बानुगडे विधानपरिषदेवर, शिवसेनेची चार नावं ठरली !

(Maharashtra 12  governor nominated mlc contro, PIL in Bombay high court also hearing on Anil Galgalis appeal)