महाराष्ट्राचे 28 वे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संपूर्ण माहिती

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस (cm devendra fadnavis information) यांनी पुन्हा शपथ घेतली आहे. आज सकाळी (23 नोव्हेंबर) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे हा शपथविधी सोहळा पार पडला.

महाराष्ट्राचे 28 वे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संपूर्ण माहिती
Follow us
| Updated on: Nov 23, 2019 | 10:11 PM

मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस (cm devendra fadnavis information) यांनी पुन्हा शपथ घेतली आहे. आज सकाळी (23 नोव्हेंबर) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, माजी मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजनांसह इतर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (cm devendra fadnavis information) यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अभिनंदन केले. महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी परिश्रमपूर्वक कार्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या माहिती जनसंपर्क विभागाने ही माहिती प्रसिद्ध केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती (cm devendra fadnavis information)

नाव: देवेंद्र फडणवीस

जन्म दिनांक: 22 जुलै 1970.

वय: 49

आई-वडिलांचे नाव: सरिता आणि स्व. गंगाधरराव फडणवीस

पत्नी: अमृता फडणवीस

सुपुत्री: दिविजा फडणवीस

शिक्षण:  देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विद्यापीठातून विशेष गुणवत्तेसह कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी पदवीनंतर व्यवस्थापनशास्त्राची पदवी मिळविली. त्यांनी डीएसई बर्लिन या जर्मनीतील संस्थेमध्ये डिप्लोमा इन मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा डिप्लोमा मिळविला.

माहिती

महाराष्ट्राचे 28वे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस म्हणजे विद्वत्ता आणि लोकप्रियतेचा मिलाप साधणारे एक दुर्मिळ राजकीय व्यक्तिमत्त्व आहे. नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी व्यवसाय व्यवस्थापनात स्नातकोत्तर पदवी आणि डी. एस. ई. बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापनाच्या पद्धती आणि तंत्र या विषयात पदविका मिळविली. नव्वदीच्या दशकात राजकारणात प्रवेश केल्यानंतर अल्पावधीतच त्यांनी मोठा जनाधार प्राप्त केला.

देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या जनतेचे प्रतिनिधित्त्व करत असतानाच पक्षांतर्गत विविध स्तरांवर नेतृत्व केले. नागपूर महानगरपालिकेतून ते सलग दोनदा (1992 आणि 1997) निवडून आले. नागपूरचे महापौर पद त्यांनी भूषविलेले असून भारतातील आजवरचे दुसरे सर्वात तरुण महापौर अशी त्यांची ख्याती आहे. महापौरपदी पुन्हा निवडून येऊन महाराष्ट्रातून ‘मेअर इन काऊन्सिल’ चा मान मिळविणारे ते पहिलेच.

देवेंद्र फडणवीस हे अनुभवी लोकप्रतिनिधी असून राजकीय बुद्धिचातुर्य व कौशल्य यासाठी त्यांना विविध व्यासपिठांनी गौरविलेले आहे. त्यांच्या कार्य-कर्तृत्त्वाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली गेलेली असून राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने दिला जाणारा ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तसेच जागतिक संसदीय फोरमच्या सचिवपदी ते कार्यरत आहेत.

लोकप्रतिनिधित्व

  • 2014 ते 2019 महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री
  • 1999 ते आतापर्यंत सलग पाचवेळा महाराष्ट्र विधानसभा सद्स्य
  • 1992 ते 2001 सलग दोन टर्म नागपूर महापालिकेचे सदस्य, दोनवेळा नागपूरचे महापौर, मेयर इन कॉन्सिल पदावर फेरनिवड, असा सन्मान मिळणारे राज्यातील एकमेव

राजकीय टप्पे

  • 2013 – अध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
  • 2010 – सरचिटणीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
  • 2001 – राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा
  • 1994 – प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा
  • 1992 – अध्यक्ष, नागपूर शहर भारतीय जनता युवा मोर्चा
  • 1990 – पदाधिकारी, नागपूर शहर पश्चिम
  • 1989 – वॉर्ड अध्यक्ष, भाजयुमो

विधिमंडळातील कार्य

अंदाज समिती, नियम समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नगरविकास आणि गृहनिर्माणाविषयी स्थायी समिती, राखीव निधीविषयी संयुक्त निवड समिती, स्वयंनिधीवर आधारित शाळांबद्दलची संयुक्त निवड समिती

सामाजिक योगदान

  • सचिव, ग्लोबल पार्लमेंटेरिअन्स फोरम ऑन हॅबिटाट फॉर एशिया रिजन
  • नागरी पायाभूत सुविधांसाठीचा वित्तपुरवठा आणि राजकीय व्यवस्थापनाच्या मुद्द्यांबाबत रिसोर्स पर्सन
  • संयुक्त राष्ट्रांची मान्यता मिळालेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, मुंबई या संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य
  • नाशिक येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष
  • नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य

आंतरराष्ट्रीय ठसा

  • 1999 मध्ये होनोलुलू, अमेरिका येथे इंटरनॅशनल एनव्हायरमेंट समिटमध्ये सहभाग आणि सादरीकरण
  • 2005 मध्ये अमेरिकेतील वॉशिंग्टन आणि नॅशविले येथे यू. एस. नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेचर्स
  • 2006 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे आयडीआरसी – युनेस्को – डब्ल्यूसीडीआर यांनी आयोजित केलेल्या ‘डिझास्टर मिटिगेशन अँड मॅनेजमेंट इन इंडिया’ या विषयावरील आंतराष्ट्रीय शिखर परिषदेत सादरीकरण
  • चीनमध्ये बीजिंग येथे डब्ल्यूएमओ – ईएसएसपी यांनी आयोजित केलेल्या ग्लोबल एनव्हायरमेंटल चेंज काँग्रेसमध्ये ‘नॅचरल डिझास्टर्स मिटिगेशन – इश्युज ऑन इकॉलिजिकल अँड सोशल रिस्क’ या विषयी सादरीकरण
  • 2007 मध्ये डेन्मार्कमध्ये कोपेनहेगेन येथे आशिया व युरोपमधील तरूण राजकीय नेत्यांच्या आसेम परिषदेत भारताचे प्रतिनिधीत्व
  • 2008 मध्ये अमेरिकेच्या संघराज्य शासनाच्या ईस्ट – वेस्ट सेंटरतर्फे आयोजित न्यू जनरेशन सेमिनारमध्ये ‘एनर्जी सिक्युरिटी इश्युज’ या विषयावर शोधनिबंध सादर
  • 2008 मध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझिलँड आणि सिंगापूरला गेलेल्या कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोशिएशनच्या उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळाचे सदस्य
  • 2010 मध्ये मॉस्को येथे भेट देणार्‍या इंडो रशिया चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाचे सदस्य
  • 2011 मध्ये क्रोएशिया येथे ‘ग्लोबल पार्लमेंटरियन फोरम ऑन हॅबिटाट’मध्ये सहभाग,
  • 2012 मध्ये मलेशियामध्ये ‘जीपीएच एशिया रिजनल मीट’मध्ये सहभाग
  • 2012 मध्ये केनियातील नैरोबी येथे ‘युनायटेड नेशन्स हॅबिटाट’ने निमंत्रित केलेल्या शिष्टमंडळाचे सदस्य

पुरस्कार

  • कॉमनवेल्थ पार्लमेंटेरियन असोसिएशन 2002-2003 चा सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार
  • राष्ट्रीय आंतर विद्यापीठ वादविवाद स्पर्धेत सर्वोत्कृष्ट वक्ता पुरस्कार
  • रोटरीचा मोस्ट चॅलेंजिंग यूथ विभागीय पुरस्कार
  • मुक्तछंद, पुणे या संस्थेतर्फे स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार, नाशिक येथील पूर्णवाद परिवारतर्फे राजयोगी नेता पुरस्कार

मुख्यमंत्री कार्यकाळातील परदेश दौरे

  • 21 ते 25 जानेवारी 2015 आणि 21 ते 15 जानेवारी 2018 – दावोस (स्वित्झर्लंड)- वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी.
  • 12 ते 16 एप्रिल 2015 – जर्मनी- हॅनोव्हर मेसी परिषदेसाठी.
  • 26 ते 29 एप्रिल 2019 – इस्राईल
  • 14 ते 18 मे 2015 – चीन
  • 29 जून ते 6 जुलै 2015 आणि 19 ते 22 सप्टेंबर 2016 – अमेरिका
  • 8 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर 2015 – जपान
  • 12 ते 16 नोव्हेंबर 2015 – लंडन
  • 9 ते 14 जुलै 2016 – रशिया
  • 26 ते 29 सप्टेंबर 2017 – दक्षिण कोरिया-सिंगापूर
  • 11 ते 14 ऑक्टोबर 2017 – स्वीडन- स्वीडन एक्स्पोसाठी
  • 9 ते 16 जून 2018 – दुबई, कॅनडा, अमेरिका
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.