Satara Assembly result सातारा : सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. 2014 मध्ये 5 जागा एकट्या राष्ट्रवादीकडे, 2 काँग्रेसकडे आणि 1 शिवसेनेकडे होत्या. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात राष्ट्रवादीला भगदाड पडलं. उदयनराजे आणि शिवेंद्रराजे दोघेही भाजपमध्ये गेले. त्यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर या जिल्ह्यात राजकीय चित्र कसं असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं. लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला.
निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा
मतदारसंघ | महायुती | महाआघाडी | विजयी उमेदवार |
---|---|---|---|
फलटण | दिगंबर आगवणे (भाजप- रिपाइं) | दीपक चव्हाण (राष्ट्रवादी) | दीपक चव्हाण (राष्ट्रवादी) |
वाई | मदन भोसले (भाजप) | मकरंद जाधव (राष्ट्रवादी) | मकरंद जाधव (राष्ट्रवादी) |
कोरेगाव | महेश शिंदे (शिवसेना) | शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी) | महेश शिंदे (शिवसेना) |
माण | जयकुमार गोरे (भाजप) विरुद्ध शेखर गोरे (शिवसेना) | जयकुमार गोरे (भाजप) | |
कराड उत्तर | धैर्यशील कदम (शिवसेना) | बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी) | बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी) |
कराड दक्षिण | अतुल भोसले (भाजप) | पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) | पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) |
पाटण | शंभूराजे देसाई (शिवसेना) | सत्यजीत पाटणकर (राष्ट्रवादी) | शंभूराजे देसाई (शिवसेना) |
सातारा जावली | शिवेंद्रराजे भोसले (भाजप) | दीपक पवार (राष्ट्रवादी) | शिवेंद्रराजे भोसले (भाजप) |
2014 चा निकाल
सातारा जिल्हा – 08 (Satara MLA List)
255 – फलटण – दीपक चव्हाण (राष्ट्रवादी)
256 – वाई – मकरंद जाधव (राष्ट्रवादी)
257 – कोरेगाव – शशीकांत शिंदे (राष्ट्रवादी)
258 – माण – जयकुमार गोरे (काँग्रेस)
259 – कराड उत्तर – बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी)
260 – कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)
261 – पाटण – शंभूराजे देसाई (शिवसेना)
262 – सातारा – शिवेंद्रराजे भोसले विजयी (राष्ट्रवादी) सध्या (भाजप)