विधानसभेसाठी शिवसेनेकडून मनसेला शुभेच्छा

यावेळी मनसेने (MNS Vidhansabha election) दुसऱ्यांचा अपप्रचार न करता स्वतःचा प्रचार करावा, असं म्हणत शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.

विधानसभेसाठी शिवसेनेकडून मनसेला शुभेच्छा
Follow us
| Updated on: Sep 23, 2019 | 9:02 PM

मुंबई : राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट झालंय. मनसेने (MNS assembly election 2019) लोकसभा निवडणूक न लढवता भाजपविरोधात प्रचार केला होता. पण यावेळी मनसेने (MNS assembly election 2019) दुसऱ्यांचा अपप्रचार न करता स्वतःचा प्रचार करावा, असं म्हणत शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या मध्यवर्ती कार्यालय राजगड इथे नुकत्याच विभाग अध्यक्षांकडून निवडणूक लढवण्याबाबत आढावा घेण्यात आला. त्या आढाव्याचा अहवाल मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सादर केला. त्यानंतर मनसे निवडक 100 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. मनसेच्या या निर्णयाला विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्रातील विविध विभागातील जागांची चाचपणी या आधीच राज ठाकरे यांनी केली होती. कल्याण-डोंबिवली या मतदारसंघात मनसेचे इच्छुक उमेदवार अधिक आहेत. तसेच या भागात मनसेचं वर्चस्व आहे. मात्र नेमक्या किती जागा कुठे लढवणार याची अधिकृत घोषणा राज ठाकरे हे पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्याची शक्यता आहे.

मनसे आघाडीसोबत न जाता विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार अशी दाट शक्यता मनसेच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मनसेने दुसऱ्यांचा प्रचार किंवा अपप्रचार करण्यापेक्षा मनसेने स्वतः साठी प्रचार करून लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी पुढे यावं, अशी परखड प्रतिक्रिया शिवसेना आमदार प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत काँग्रेस-राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष पाठींबा देत भाजपविरोधात प्रचार केला होता. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी प्रचाराचा जो झंझावात होता, तो झंझावात आता राज ठाकरे स्वतःच्या पक्षासाठी करताना पाहायला मिळणार आहे.

मनसेची 122 जागांची तयारी – सूत्र

सध्या मनसेची एकूण 122 जागांची तयारी झाली आहे. त्यामध्ये मुंबईतील 36 पैकी 36 जागा, ठाणे 24 पैकी 24, नाशिक 15 पैकी 15, मराठवाडा 42 पैकी 22, विदर्भ 62 पैकी 15, कोकण 15 पैकी 10, उत्तर महाराष्ट्र – चाचपणी सुरु, अशी मनसेने तयारी केली आहे.

शिवसेना-भाजपची युती झाल्यास नाराज पदाधिकारी मनसेकडे वळतील, अशी आशा पक्षाला आहे. युती होईल असं गृहीत धरुन मनसे नाराजांना संपर्क करत आहे. भाजपा आणि सेनेचे काही पदाधिकारी मनसेच्या वाटेवर असल्याचा दावा मनसेचा आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.