Yavatmal district Assembly results | यवतमाळ जिल्हा विधानसभा निकाल
यवतमाळ जिल्ह्यात विधानसभेच्या 7 जागा आहेत. 2014 मध्ये 5 भाजपकडे, एक शिवसेना आणि एक राष्ट्रवादीकडे होती.
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात विधानसभेच्या 7 जागा आहेत. 2014 मध्ये 5 भाजपकडे, एक शिवसेना आणि एक राष्ट्रवादीकडे होती. 7 विधानसभा असलेला यवतमाळ जिल्हा कापूस उत्पादक शेतकऱ्याचा जिल्हा आहे. हा जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचाच बोलबाला होता. अनेक दिग्ग्ज नेते या जिल्ह्याने दिले. शिवाय दोनवेळा मुख्यमंत्रीपद नाईक घराण्याच्या रूपाने यवतमाळ जिल्ह्याला मिळाले. मात्र 2014 मधील निवडणुकीत जिल्ह्यातील काँग्रेस भुईसपाट झाली.
निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा
मतदारसंघ | महायुती | महाआघाडी | विजयी उमेदवार |
---|---|---|---|
वणी | संजीव रेड्डी बोदकुलवार (भाजप) | वामनराव कासावार (काँग्रेस) | संजीव रेड्डी बोदकुलवार (भाजप) |
राळेगांव | अशोक उईके (भाजप) | वसंत पुरके (काँग्रेस) | अशोक उईके (भाजप) |
यवतमाळ | मदन येरावार (भाजप) | बाळासाहेब मंगळूरकर (काँग्रेस) | बाळासाहेब मंगळूरकर (काँग्रेस) |
दिग्रस | संजय राठोड (शिवसेना) | मो. तारीक मो. शमी (राष्ट्रवादी) | संजय राठोड (शिवसेना) |
आर्णी | संदीप धुर्वे (भाजप) | शिवाजीराव मोघे (काँग्रेस) | संदीप धुर्वे (भाजप) |
पुसद | निलय नाईक (भाजप) | इंद्रनिल मनोहर नाईक (राष्ट्रवादी) | इंद्रनिल मनोहर नाईक (राष्ट्रवादी) |
उमरखेड | नामदेव ससाणे (भाजप) | विजय खडसे (काँग्रेस) | नामदेव ससाणे (भाजप) |
2014 चा निकाल – यवतमाळ – 07 ( Yavatmal MLA list)
76 – वणी – संजीव रेड्डी बोदकुलवार (भाजप )
77 – राळेगांव – अशोक उईके (भाजप)
78 – यवतमाळ – मदन येरावार (भाजप)
79 – दिग्रस – संजय राठोड (शिवसेना)
80 – आर्णी – राजू तोडसाम (भाजप)
81 – पुसद – मनोहर नाईक (राष्ट्रवादी)
82 – उमरखेड – राजेंद्र नजरधने (भाजप)