अखेर ठरलं! वरळी नव्हे ‘या’ मतदारसंघातून अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात? शिंदे गटाला तगडं आवाहन

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विविध मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. अशातच आता आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे नेते अमित ठाकरे हे रिंगणात उतरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अखेर ठरलं! वरळी नव्हे 'या' मतदारसंघातून अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात? शिंदे गटाला तगडं आवाहन
अमित ठाकरे राज ठाकरे
Follow us
| Updated on: Oct 18, 2024 | 10:25 AM

Amit Thackery Will Contestant election from Mahim Constituency : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेत राज्यातील निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार येत्या २० नोव्हेंबर २०२४ ला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर तीन दिवसांनी २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विविध मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. अशातच आता आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे नेते अमित ठाकरे हे रिंगणात उतरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमित ठाकरे हे माहिम मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, असे म्हटले जात आहे.

अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी या निवडणुका लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. अमित ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत ही इच्छा मांडली होती. यानंतर विविध मतदारसंघांची चाचपणी करण्यात आली. त्यातच आता खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित ठाकरे हे माहिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे स्वत: चाचपणी करत आहेत. अमित ठाकरे यांनी कोणत्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी किंवा लढवू नये, याचा आढावा सध्या राज ठाकरेंकडून घेतला जात आहे. मात्र कार्यकर्त्यांकडून सातत्याने अमित ठाकरेंच्या निवडणुका लढवण्याबद्दलची मागणी केली जात आहे. यापूर्वी अमित ठाकरे यांच्यासाठी भांडुप, मागठाणे आणि माहिम या तीन मतदारसंघांची निवड करण्यात आली होती. राज ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.