Eknath Shinde, Maharashtra Assembly Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन

| Updated on: Jul 04, 2022 | 9:34 PM

Maharashtra Vishan Sabha CM Eknath Shinde floor test result LIVE Updates : विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा आणि अखेरचा दिवस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज बहुमत चाचणी

Eknath Shinde, Maharashtra Assembly Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन
विधानसभा विशेष अधिवेशन | दिवस दुसराImage Credit source: TV9 Marathi

CM Eknath Shinde floor test LIVE : विधानसभा अधिवेशनाचं दोन दिवसीय विशेष अधिवेशन सुर आहे. या अधिवेशनाचा आज दुसरा आणि अखेरचा दिवस आहे. शिवसेनेत बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde floor test LIVE) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधानसभेत बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे नव्या सरकारची आज अग्निपरीक्षा विधानसभेत होईल. या संदर्भातली सर्व ताज्या आणि लाईव्ह घडामोडींचा झटपट आढावा घेणार आहोत. राज्यातील राजकारणाशी संदर्भात महत्त्वपूर्ण घडामोडी एका क्लिकवर जाणून घ्या

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 04 Jul 2022 07:52 PM (IST)

    Mumbai rain live updates : मुख्यमंत्री बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दाखल

    मुख्यमंत्री बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे.

    मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांनाही केलं अभिवादन

  • 04 Jul 2022 06:58 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन

    मुंबई- बहुमत चाचणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संध्याकाळी हुतात्मा चौकात पोहचले आहेत. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना त्यांनी अभिवादन केले आहे.

  • 04 Jul 2022 06:38 PM (IST)

    एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं जंगी स्वागत

    विधान भवनातून बाहेर पडता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा भव्य हार घालून सत्कार करण्यात आलाय. यावेळी त्यांच्या स्वागताला कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

  • 04 Jul 2022 06:22 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Live

    सर्व लोकांना न्याय देण्याचं काम करू, लोकांच्या मनातलं हे सरकार आहे. राज्यातले प्रकल्प लवकरात लवकर कसे पूर्ण होतील यकडे आमचा भर असणार आहे. केंद्र सरकार आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. एकंदिरीत केंद्र आणि राज्य एकत्र येतं तेव्हा राज्याचा विकास जलद होत असतो.

    खाते वाटपाबाबत आम्ही केंद्रातील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, हे रोज कोर्टात जात आहेत. महाविकास आघाडीत सगळ्यांचा श्वास दाबला गेला होता. तो आता रिकामा झाला आहे. यांनी व्हीपचं उल्लंघन केलं आहे. त्यावर नियमानुसार कारवाई होणार. शिवसेना ओरिजिनल आम्ही आहोत.

  • 04 Jul 2022 06:15 PM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Live

    मुख्यमंत्र्यांनी काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्याबाबत ते सांगतील. येत्या 18 तारखेला अधिवेश आणि त्याच दिवशी राष्ट्रपतींची निवडणूक आहे. त्यामुळे त्याही संदर्भात लवकरच निर्णय घेऊ.

  • 04 Jul 2022 06:03 PM (IST)

    सतोष बांगर यांच्या शिंदे गटात जाण्याच्या निर्णयाचे स्वागत

    कळमनुरी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या निर्णयाचे फटाके फोडून स्वागत, शहरातील गांधी पार्क परिसर येथे ढोल ताशांच्या गजरात संतोष बांगर यांचा बॅनर लावून जल्लोष साजरा, मोठ्या संख्येने यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते.

  • 04 Jul 2022 05:29 PM (IST)

    विरोधी पक्षनेते अजित पवार Live

    एकनाथ शिंदे एकदा सुरू झाले ते पुन्हा सुसाट सुटले. त्यांची फडणवीस आणि केसरकरांना काळजी वाटायला लागली. हे सर्व मी बघत होतो. पण माणसाला कुठेतरी मन मोकळं करावं वाटतं. त्यांनी त्यांचं काम करावं आपण आपलं काम करावं, अशा पद्धतीने लोकशाही जपवण्याचं कामं व्हावं. जर जनतेने ठरवलं तर अनेक बलाढ्य नेत्यांनना सत्तेतून बाहेर बसवतात.

  • 04 Jul 2022 05:25 PM (IST)

    शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना उद्धव ठाकरेंचा निरोप

    उद्धव ठाकरेंनी शिवाजी आढळरावांना भेटीसाठी मातोश्रीवर बोलावलं

    पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्यांनाही भेटीचं निमंत्रण

    शिवाजी आढळरावांची पक्षातून हकालपट्टी केल्याचं निघालं होतं पत्र

    मात्र ते शिवसेनेतचं कारवाई मागे घेण्यात आली होती

    उद्या उद्धव ठाकरे आणि शिवाजी आढळरावांची होणार भेट

    सूत्रांची माहिती

  • 04 Jul 2022 05:13 PM (IST)

    विरोधी पक्षनेते अजित पवार Live

    सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या. सर्वांचे मी आभार मानतो. उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, जयंत पाटील, अशा अनेक मान्यवरांनी मला याठिकाणी मला संधी दिली. मी ही जबाबदारी स्वीकारली. मी बारामती मतदारसंघातून दोन नंतरच्या मतांनी निवडून आलो होतो. पवारांना देशाचे संरक्षण मंत्री म्हणून जावं लागलं. तेव्हा मला राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. कशा प्रकारे कामकाज चालतं हे मी अनेकदा गॅलरीतून पाहिलं. मी खूप नवखा होतो. मी काम शिकत गेलो.

    महाराष्ट्राच्या विधानमंडळाला एक गौरवशाली परंपरा आहे, सर्वांची मी नावं घेत नाही. या खुर्चीवर मी अनेक नेते पाहिले.  गेल्या काही दिवसात अधिवेशनं झालीच नाहीत. नागपूरलाही अधिवेशनं घेण्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेतील.

  • 04 Jul 2022 05:12 PM (IST)

    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर Live

    जे गुण एका चांगल्या राजकारण्यामध्ये हवे असतात ते अजित पवारांमध्ये आहेत. त्यांनी सुट्टीच्या वेळेलाही मला भेटायला बोलावलं. तेव्हा मी लेट झालो. पण ते वेळेत पोहोचले होते. ते टायमिंग कधीच चुकवत नाहीत. हे सभागृह यशस्वीपणे चालवण्यात मलाही त्यांचं सहकार्य मिळेल ही अपेक्षा व्यक्त करतो.

  • 04 Jul 2022 05:04 PM (IST)

    शिवसेना नेते भास्कर जाधव Live

    अजित पवारांचे गुणविशेष, कार्यक्षमता, निर्णयक्षमता याबाबत सर्वांना कौतुक आहे. त्यांना स्वच्छताही आवडते. वक्तशीरपणा हा त्यांच्यातला एक मोठा गुण आहे. कोरोनाच्या काळातही अजित पवारांनी सतत मंत्रालयातून लोकांची कामं केली. हे सर्वांना मान्य करावं लागेल. अंतुले साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी वाढवलेले अधिकार, आमदार हा सक्षम राहिला पाहिजे. अजित पवारांनही आमदारांचे अधिकार वाढवण्याचे काम केले. मोदींच्या कार्यक्रमात तुम्हा बोलायला दिलं नाही. ते तुम्ही शांतपणे घेतलं. त्यामुळे मला भिती वाटू लागली आहे. अजितदादा विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही कणखर भूमिका बजवा, तुमचं अभिनंदन.

  • 04 Jul 2022 05:00 PM (IST)

    काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात Live

    अजित पवारांना अनेक वर्षांपासून पाहतोय. ते सर्वांना सांभाळून घेतात. अत्यंत स्पष्टवक्ते ते आहेत. अजित पवारांची मैत्री ही वेगळी आणि विरोधी पक्षनेते असल्यावर सरकारवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी ही त्यांची आहे, याचा उपयोग ते चांगल्या पद्धतीने करतील, याची खात्री मला आहे.

  • 04 Jul 2022 04:54 PM (IST)

    राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील Live

    महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याची खुर्ची जनतेला न्याय देण्यासाठी ते नक्की वापरतील हा मला विश्वास आहे. मला खात्री आहेत या सभागृहात ज्या गोष्टीत शासनाकडून त्रुटी राहतील. त्यावर दादा नक्की बोट ठेवतील. अजित पवारांना अनेक खात्यांचा मोठा अनुभव आहे. इतर सर्व खात्याचा मंत्री होणं वेगळं आणि अर्थमंत्री होणं वेगळं. त्याचाही अनुभव हा अजित पवारांना आहे. सरकार जे चांगलं करेल त्याला अजित पवारांचं सहकार्य नक्की मिळेल. संकटाच्या काळात अजित पवार धावून जातील.

    एकनाथ शिंदे यांचं सरकार चांगलं काम करेल यात दुमत नाही. तुमच्या चुकांवर बोट ठेवायचं हेचं विरोधी पक्षनेत्याचं काम असतं. मंत्रिमंडळात काम करणाऱ्यांनाही अजित पवार चांगलं सहकार्य करतील. आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही सर्वांनी अजित पवारांना विरोधी पक्षनेता म्हणून निवडलं आहे. त्यांना शुभेच्छा.

  • 04 Jul 2022 04:47 PM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Live

    शरद पवारसाहेब हे त्यांच्या भाषणातून त्यांच्या आईचा उल्लेख करतात. त्याच माऊलीचे संस्कार अजित पवारांनाही मिळाले आहेत. पुणे मध्यवर्ती निवडणुकीपासून त्यांनी त्यांच्या कामाला सुरूवात केली. बारामतीचे आमदार म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केलं. त्या कामाचं कौतुक अनेकांनी केलं आहे. अधिकाऱ्यांवर अजित पवारांचा चांगला वचक आहे. अजित पवारांसोबतची बैठक ही निर्णायक असते. विरोधी पक्षनेते म्हणून तुमच्या सूचना आमलात आणू.

  • 04 Jul 2022 04:43 PM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Live

    अजित पवारांची प्रेमाची दादागिरी चालते. अजित पवारांनी दिलेला शब्द हा मोडला जात नाही. राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे स्थिर आहेत. मात्र अजित पवार हे वक्तशीर आहेत. मागच्या काळात मंत्रालय बंद राहिलं असतं. मात्र अजित पवारांमुळे उघडायला लागायचं. काम होणार असेल, नसेल तर ते तोंडावर सांगतात. त्यांना सर्व प्रकारची चांगली माहिती त्यांच्याकडे आहे. त्यांचा आणि माझा जन्मदिवस एकच आहे. त्यांच्या वक्तव्यांमुळे ते एकदा अडचणीत आले. मात्र आत्ता ते विचार करून बोलतात.

  • 04 Jul 2022 04:37 PM (IST)

    संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

    माझ्यावर आरोप करून काय उपयोग, गरज सर्व वैद्य मरो या भूमिकेत शिवसेना नाही

    इमान इमान असतं, कुणाला तर दोष द्यायचा म्हणून संजय राऊत यांना दोष दिला जातोय

    50 आमदार त्यांच्यासोबत असणार की नाही हे येणारा काळ ठरवेल

    भाजपच्या मनात त्यांच्याबद्दल काय भावना आहेत यावर भविष्य ठरेल , लोकांना हा निर्णय आवडलेला नाही

    बंडखोरांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या बाबत ही राग आहे आणि त्याच चार लोकांनी तुम्हाला सत्तेपर्यंत पोहोचवलं होतं, हे विसरू नका

    आमदारांच हे उठाव म्हणता येत नाही, महाराष्ट्र हे स्वीकारायला तयार नाही

    कोणताही पक्ष कुणाच्याही ताब्यात जात नाही

    मोजकी लोक विकले जातात म्हणून पक्ष कोणाच्या ताब्यात जात नाही

  • 04 Jul 2022 04:35 PM (IST)

    विश्वासदर्शक ठरावाप्रसंगी भाषणाच्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणा

    1. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 21 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा
    2. राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.
    3. शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा शिवसेना-भाजप युती सरकारचा निर्धार
  • 04 Jul 2022 04:34 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या समोर व्यक्त केलेले ठळक मुद्दे

    1. लढायचे असेल तर सोबत राहा
    2. भाजपचा शिवसेनेला संपवण्याचा डाव ,
    3. हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा ,
    4. असे खेळ खेळण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊ, आम्ही चुकत असू तर जनता आम्हाला घरी बसवेल ,  तुम्ही चुकत असाल तर जनता तुम्हाला घरी बसवेल ,
    5.  घटना तज्ज्ञांना विनंती आहे आपण घटनातज्ञ आहात , सध्या जे सुरु आहे ते घटनेला धरून सुरु आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकरांची घटना मोडण्याचा प्रकार सुरु आहे, त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट मांडा.
    6. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्रात जे सुरु आहे त्याबाबत सर्वाना सत्य बोलू द्या
    7. विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा घटनेचा अपमान
  • 04 Jul 2022 04:24 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Live

    तेलाच्या किमती वाढल्यावर काही महाराष्ट्राने व्हॅट कमी केला नव्हता. तो आम्ही आता करू, अशी घोषणा ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे लवकरच आता पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार आहेत.

  • 04 Jul 2022 04:15 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Live

    अजित पवार चाळीस वर्षे शिवसेनेत आहे असेच बोलत होते. मोदी मला शपथ घ्याच्या आधी बोलते. राज्याच्या विकास कर, राज्याला पुढे घेऊन जा आणि अमित शाह म्हणाले आपण जुने मित्र आहे. आम्ही तुमच्यामागे पहाडासाखे उभे आहोत. अरे भास्करराव जे खरंय ते बोलायला पण हिंमत लागते ना.

  • 04 Jul 2022 04:12 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Live

    यांचे लोक रोज कोर्टात जातात. शिवसैनिकाला फायदा झाला पाहिजे. सरकार असताना होणार नाही तर कधी होणार. शिवसैनिकाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवू. मी अजून आमच्या लोकांना सांगतो मी मुख्यमंत्री झालोय की नाही मला माहितीच नाही. माझ्याकडे कोणी काम घेऊन आलं की मी कलेक्टरला फोन करतो. लिखापडीत खूप वेळ जातो.

  • 04 Jul 2022 04:07 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Live

    भाजपने कुणालाही जेलमध्ये टाकलं नाही. त्यांचे जास्त आमदार असताना त्यांनी आम्हाला मुख्यमंत्रिपद दिलं. आम्ही वेगळे राहिलो असतो तर त्यांनी शंभरपेक्षा जास्त टार्गेट ठेवलं होतं. जयंत पाटील जाईल तिकडं बोलत होते पुढचा आमदार होणार. निर्दोश माणसं यांनी जेलमध्ये टाकली. काय मिळालं शिवसेनेला सत्तेमध्ये तडीपाऱ्या वॉन्टेड असं सर्व मिळालं. मी मोकळाच असल्याने सर्वांचं ऐकूण घेतो. मी माझ्याकडून होईल तेवढी मदत मी करायचो.

  • 04 Jul 2022 03:54 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Live

    भुजबळांमुळे शंभर लोकं जेलमध्ये राहिले. आम्ही अन्य धर्मियांचा द्वेष करणार नाही. हे राज्य सर्वांचं आहे. मोदींनी जगाला काबू करून ठेवलंय. पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं एकच शपथविधी होईल. त्यामुळे ते खूष होते. आधीच त्यांना माहिती होतं सगळं. हिंदुत्वाचा ज्यांनी पुरस्कार केला. तिकडे आम्ही गेलोय. आम्ही दोघं मिळून दोनशे लोकं निवडून आणू. आम्ही शिवसैनिक आहे. लाथ मारेल तिथं पाणी काढू. हे नाही केलं तर गावाला शेती करायला जाईन. माझा छोटा नातू आहे. फूल टाईमपास आहे. जेव्हा शिवसेनेची काँग्रेस होतेय असं वाटेल तेव्हा दुकान बंद करीन. संतोष बांगर मला फोन करायला घाबरत होते.

  • 04 Jul 2022 03:44 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Live

    यान्नास लोकांच्या मतदारसंघातली कामं झाली नाहीत. अजित पवा माझ्या विभागाच्या घ्यायचे. आठशे कोटी घेतले तरी मी काय बोललो नाही. नंतर तुम्ही पॅरालल नगरविकास विभागाचा हेड का केला. मला काम करणारी माणसं आवडतात. मी कदीही खोडा घातला नाही. माझ्या विभागात सर्वच हस्तक्षेप करत होते.

    काही लोकं आमचा बळी देण्यापासून ते काहीही बोलत होते.  आता देवीने कुणाचा बळी घेतला. चाळीस रेडे पाठवल, देवी बोलली जो बोललाय तो रेडा आम्हाला नको. सहन करण्याची एक परिसीमा असते.

    पंधरा वर्षे सडवल्याची टीका केली होती. आता तुमच्याकडे सत्ता दिल्यास वाटोळं होईल म्हटलेलं. मग सांगा कसं बसणार तुमच्याकडे. यांनी जास्त मतं घेतल्याने आमचा दुसरा माणूस पडला.

    आम्ही मतमोजणी केली. तर बोलले आपले बरोबर आहेत. तर फुटले कुणाचे. बाकी लोक बोलले पडला तो वेगळा पडला पाहिजे होता. दोन्ही खासदार निवडून येण्याचं गणित आमच्याकडे होते.

    विधानपरिषदेत मला बाहेरच काढून टाकलं होतं. मी तीन मतं बाहेरून आणली राज्यसभेला. आमचे दोन्ही निवडून आले. मी बोलत बोलत गेलो. मी बॉन्ड्रीच्या बाहेर गेलो. तुमच्याकडे टावर लोकेशन सगळं आहे. तिकडे नाकाबंदी केली. मला पण माहितेय नाकाबंदीतून कसं निघायचं असतं ते.

  • 04 Jul 2022 03:42 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Live

    आमदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. आपली नैसर्गित युती हे भाजपसोबत आहे हे सांगतो होते. मी पाचवेळा सांगण्याचा प्रयत्न केला. केसरकर त्याला साक्षीदार आहेत. मात्र आम्हाला यात यश मिळालं नाही. यात अडीच वर्षे गेली. त्यात अनेक अनुभव आला. काँग्रेससोबत असल्याने सावरकरांसबोत बोलू शकत नाही, दाऊशी कनेक्शन ज्यांचं झालं त्यांच्यावर कारवाई करून शकलो नाही. संभाजीनगर नाव करू शकत नव्हतो. आम्ही वयक्तिक कारणासाठी ही भूमिका घेतली नाही. आम्ही बाळासाहेबांचे आणि दिघेसाहेबांचे शिवसैनिक आहेत.

    कुणी वैयक्तिक घेण्याची गरज नाही. शिवसेनाप्रमुखांचा मतदानाचा अधिकार का काढला होता. तक्रार काँग्रेसने केली होती. अशा हिंदुत्वाला नेहमी विरोध करणाऱ्या पक्षासोबत कसं बसायचं. भुजबळ साहेब इकडे आहेत त्यांना माहिती आहे. बाळासाहेबांनी मुंबईत वाचवली दगंलीत.

  • 04 Jul 2022 03:33 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Live

    मी दोन तीन वेळा माझ्या पदाचा राजीनामा दिला होता. फडणवीस बोलले चिंता करू नका. तेव्हा त्यांनी मला समृद्धी महामार्गाचं काम दिलं. जे खातं बुडीत झालं त्याला ताकद दिली. तो मार्ग आज पूर्णत्वास जातोय. फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा तुम्हाला करायचा आहे. मी रिस्क घेऊन जायचं. एकदा तर आमचं विमान क्रॅश होणार होतं. आमचा कार्यक्रम आटोपणार होता.

  • 04 Jul 2022 03:31 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Live

    जेव्हा दिघे साहेब गेले तेव्हा कोलमडून पडेल असं वाटलं होतं. हॉस्पिटल बेचिराख केलं. तो उद्रेक होता. सिलिंडर स्फोटात लोकं मेली असती. पार्थीव पोलिसांच्या व्हॅनमधून बाहेर काढलं तेव्हा लोक मागे चालायला लागली. माणसांवर केसेस झाल्या. मी पोलिसांना सांगितलं हे प्रेमापोटी झालीय. तेव्हा ठाण्यातली शिवसेना संपेल असं वाटलं होतं. शिवसेनाप्रमुखही तेव्हा चितेत होते. मात्र या सर्वांना बाहेर काढेपार्यंत मी झोपलो नाही. दिघे साहेबांनी केलेल्या कामामुळे या भागात सगळीकडे शिवसेना पसरली आहे.

  • 04 Jul 2022 03:29 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Live

    मी पोलिसांना खूप प्रयत्न केला, अर्ज लिहून थकलो. महिला आमच्या पोरांना शिव्या घालायचे. मी सोळा लेडीज बार तोडणारा हा एकनाथ शिंदे आहे. माझ्यावर शंभरपेक्षा जास्त केस आहेत. मी बंद करून टाकलं. कोर्टात माझ्यावर पिटीशन फाईल झालं. मुंबईत गँगवार सुरू होतं. मला संपवण्याचा त्यांचा प्लॅन होता. मी घाबरलो, दिघे साहेबांनी शेट्टी लोकांना बोलवलं आणि एकनाथला काही झालं तर याद राखा असं सांगितलं. कुठल्याही आंदोलनात मी मागे पाहिलं नाही. माझ्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी परिणामांचा विचार कधीच केला नाही.

  • 04 Jul 2022 03:24 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Live

    हीच परिस्थिती माझ्या श्रीकांतसोबत झाली, माझा श्रीकांत डॉक्टर झाला मात्र मी त्याला वेळ देऊ शकलो नाही. मी लेट यायचो आणि तो आधीच निघून जायचा. मी संघटनेला वेळ दिला. मी शिवसैनिक हेच माझं कुटुंब मानलं. माझ्या आयुष्यात वाईट प्रसंग आला, माझी दोन मुलं डोळ्यासमोर गेली. तेव्हा मला दिघे साहेबांनी आधार दिला. माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. कशासाठी जगायचं, कुणासाठी जगायचं. माझ्या कुटुंबाला माझी आवश्यकता होती. दिघे साहेब पाच, सहावेळा माझ्या घरी आलं. मी संघटनेला न्याय देऊ शकत नाही म्हणून सांगितलं. तेव्हा दिघे साहेब म्हणाले तुला हे दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुसावेच लागतील. मी दिघे साहेबांना देव मानतो, बाळासाहेब, दिघेसाहेब आमचे देव मानतो. मला सभागृह नेता केला. जितेंद्र आव्हाड दुसऱ्या पक्षात होता तरी त्याला माहीत होतं एकनाथ शिंदे खूप वेड्यासारखं कामाला लागला आहे.

  • 04 Jul 2022 03:23 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Live

    मी जावाचं रान केलंय. रक्ताचं पाणी केलंय. मी सतराव्या वर्षी बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन शिवसैनिक झालो. मी वयाच्या अठराव्या वर्षी शाखाप्रमुख झालो. मी साहेबांना सांगितलं सिनिअर लोकांना पद द्या, तेव्हा त्यांनी मला एक शिवी घातली आणि शाखाप्रमुख बनवलं. मी नंतर नगरसेवक झालो. मात्र त्याच्या आधी होऊ शकलो असतो. युतीच्या माणसाला तिकीट द्याचं ठरलं. तेव्हा साहेब बोलले युतीचं बघू तुला तिकीट देतो. मी म्हटलं जाऊद्या साहेब आपण पुढच्या वर्षी बघू, मी कधी पदाची लालसा ठेवली नाही. आता आमचा बाप काढला. रेडा म्हणाले अनेक वाईट शब्द काढले. मी एकदम शांगत असतो. मात्र अन्याय झाल्यावर मला शांत राहता येत नाही. माझं काम केसरकरांनी हलकं केलं. त्यांना मी मीडियाला बोलायला सांगितलं. बाप काढले, माझे वडील जिवंत आहेत. माझी आई गेली, एकादा गावी गेल्यावर उद्धव साहेबांचा फोन आला. आईने उद्धव साहेबांना सांगितलं माझ्या बाळाला सांभाळा. तिच्यासाठी मी बाळ होतो. मला खूप कष्टाने वाढवलं आहे.

  • 04 Jul 2022 03:18 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Live

    मला अभिमान आहे आमच्या पन्नास लोकांचा, आम्ही मिशन सुरू केलं तेव्हा कुठे चाललोय, किती दिवस लागतील कुणी विचारलं नाही. मी मतदानादिवशी डिस्टर्ब होतो. मतदानादिवशी मला नीट वागणूक मिळाली नाही. कशी वागणूक दिली ते यांनी पाहिलं आहे. बाळासाहेबांनी सांगितलं, अन्यायाविरुद्ध बंड असेल काही असेल केलं पाहिजे. माझ्या मनात आलं आणि माझे फोन सुरु झालं. मुख्यमंत्र्यांपासून सर्वांचे मला फोन होते. कुठे चाललात, म्हटलं मला माहिती नाही. एकाही आमदाराने म्हटलं नाही, मुख्यमंत्र्यांना भेटून जाऊया, हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही. यात सुनिल प्रभुंना माहिती आहे, कसे माझे खच्चीकरण सुरू केलंं होतं. मग मी ठरवलं लढून शहीद झालो तरी चालेल मात्र मागे हटणार नाही. मी आमदारांना सांगितलं होतं काळजी करू नका, मी तुमचं भवितव्य सुरक्षित करेन आणि जगाचा निरोप घेईन असे मी सांगितलं. मी काय छोटीमोठी घटना नाही. एक ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवकही जात नाही. हे का झालं याचा अभ्यास करायला हवा होता. एकिकडे चर्चा करायचे दुसरीकडे काढून टाकायचे. माझ्या घरावर दगड मारायचे आदेश दिले. मात्र एकनाथ शिंदे यांच्या घरावर दडग मारायची हिंमत कुणात नाही. जितेंद आव्हाडांना माहितीही माझ्या मागे किती लोक आहेत. ती डसून टाकतील.

  • 04 Jul 2022 03:12 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Live

    शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापन झालं आहे. गेले पंधरा वीस दिवस, शिवसेनेचे चाळीस आमदार आणि अपक्ष दहा असे पन्नास आमदार माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यासोबत राहिले त्यांचे मी धन्यवाद देतो. मला विश्वास बसत नाही मी सभागृहात मुख्यमंत्री म्हणून बोलतोय. आपण पाहिलं तर विरोधी पक्षातून सत्तेकडे जायची वाटचाल असते. मात्र आज आपण ऐतिहासिक घटना पाहतोय. मला फडणवीस म्हणाले फक्त देश नाही तर तेहत्तीस देशांनी या घटनेची नोंद घेतली आहे. सत्तेतून, मी नगरविकास मंत्री होतो. अनेक मंत्री याठिकाणी आहेत. हे सर्व मंत्रीपद डावावर लावून चालीस आमदार आणखी दहा आमदार पन्नास आमदार, एकीकडे बलाड्य असं सरकार, सरकारममध्ये बसलेली मोठी माणसं एकिकडे आणि दुसरी बाळासाहेबांचे शिवसैनिक अशी ही लढत होती.

  • 04 Jul 2022 03:07 PM (IST)

    हिंदूह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने राज्यात शिवसेना-भाजपाचे सरकार -मुख्यमंत्री

    मुंबई – राज्याची प्रगती होवो, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाची सुरुवात. हिंदूह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने राज्यात शिवसेना-भाजपाचे सरकार

  • 04 Jul 2022 03:06 PM (IST)

    माझ्यावर वेळ आली तेव्हा कुणी फोन घेत नव्हते – प्रताप सरनाईक

    मुंबई- ठाकरे कुटुंबांच्या अगदी जवळचे अशी सरनाईक कुटुंबाची ओळख होती. मात्र माझ्यावर वेळ आली तेव्हा कुणी फोन घेत नव्हते. कुणी आपल्यासोबत फोटो काढत नव्हते. अशा अडचणीच्या काळात एकनाथ शिंदे हे सोबत राहिले. ईडी म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जोडीने २० वर्ष राज्य करावे, अशी इच्छा प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.

  • 04 Jul 2022 02:50 PM (IST)

    या सरकारने विद्वेष ठेवू नये – जितेंद्र आव्हाड

    मुंबई- मी नेहमी बोलणारा माणूस, गेले १०-१५ दिवस काहीही बोलत नाहीये. या बुद्धिबळात आपण जाऊ नये, अशी माझी इच्छा आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. एकनाथ शिंदे यांचं बंड पटत नव्हतं. फडणवीस म्हणालेत, तसा त्यांनी विद्वेष ठेऊ नका, असे आव्हाड म्हणाले.

  • 04 Jul 2022 02:47 PM (IST)

    मुंबईत शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक सुरु

    मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनात राज्यातील सगळ्या शिवसेना जिल्हा प्रमुखांची बैठक सुरु झाली आहे. विधानभवनातील काही आमदारही या बैठकीला गेले असल्याची माहिती आहे.

  • 04 Jul 2022 02:42 PM (IST)

    संविधान मोठे आहे, सभागृह मोठे आहे की ईडी मोठी आहे-यशोमती ठाकूर

    मुंबई – आज सभागृहात जे काही झालं त्यामुळे पूर्ण राज्य गोंधळून गेले असेल, संविधान, सभागृह मोठे आहे की ईडी मोठे आहे, असा प्रश्न पडला असल्याची टीका काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली आहे.  हेच जर व्हायचं असतं तर, अडीच वर्ष आधी हे सगळे करु शकले असते आणि राज्यात एक स्थिर सरकार असतं, असेही ठाकूर म्हणाल्या.  उद्या राज्याने कोणाकडे आशेने पाहायचं? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.  मात्र खेळाडू वृत्तीने आम्ही त्यांचं अभिनंदन करतो, असेही त्या म्हणाल्या.
  • 04 Jul 2022 02:25 PM (IST)

    cआदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदार प्रकाश सुर्वेंना सुनावलं

    Uddhav Thackeray : माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोरत आदित्य ठाकरे यांंनी आमदार प्रकाश सुर्वे यांना सुनावलं, बंडखोर आमदार आणि प्रकाश सुर्वे यांच्यातील बंडखोरी नंतरची पहिलीच भेट, आदित्य ठाकरेंचं प्रकाश सुर्वे यांना सवाल, आदित्य ठाकरेंशी आधी हातमिळवणी आणि त्यानंतर प्रकाश सुर्वे यांच्या माध्यमांसमोरच थेट संवाद

  • 04 Jul 2022 02:20 PM (IST)

    Uddhav Thackeray : शिवसेना पक्षप्रमुखांकडून बैठकीचं सत्र, शिवसेना भवनात दाखल

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे शिवसेना भवनातमध्ये दाखल, उद्धव ठाकरे यांची आज जिल्हा प्रमुखांसोबत बैठक, जिल्हा प्रमुखांच्या बैठकीतून उद्धव ठाकरे जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन करणार, ठाण्यात जिल्हा प्रमुखांच्या नेमणुका नव्यानं करण्यात आल्या, आता आजच्या शिवसेनेच्या बैठकीत नेमकं काय होतं, याकडे सगळ्याचं लक्ष

  • 04 Jul 2022 01:58 PM (IST)

    Gulabrao Patil : आम्ही बंड केलेलं नाही, आम्ही उठाव केला आहे- गुलाबराव पाटील

    Gulabrao Patil : आम्ही बंड केलेलं नाही, आम्ही उठाव केला आहे- गुलाबराव पाटील

    हिंदुत्वाच्या विचाराशी फारकत घेऊ नये म्हणून आम्ही हा उठाव केला- गुलाबराव पाटील

    गुलाबराव पाटील यांचा सभागृहातून हल्लाबोल

    अजित पवारांनाही गुलाबराव पाटील यांचं प्रत्युत्तर

    आम्ही शिवसेना सोडलेलीच नाही, अजित पवार यांना गुलाबराव पाटील यांचा टोला

    चहापेक्षा किटली गरम- गुलाबराव पाटील

    वर्षवर्ष जेलमध्ये राहिलोय, तडिपार राहिलेलो आहोत, आम्हाला नजरेला नजल द्यायला अजिबात भय नाही, सहजासहजी आम्ही आमदार नाही झालेलो- गुलाबराव पाटील

    भास्कर जाधव यांनी काळजी करण्याचं कारण नाही, आम्ही आपसात भिडणार नाही, गुलाबराव पाटील यांचा टोला

    आम्ही काही लेचे पेचे म्हणून आमदार आलेलो नाही- गुलाबराव पाटील

    नगरपंचायत, नगरपालिकेत आम्ही चार नंबरवर गेलो- गुलाबराव पाटील

    आम्हाला वाटलं आम्ही रसातळाला जातोय, आमची शिवसेना संपतेय- गुलाबराव पाटील

    एकनाथ शिंदे पाच वेळा गेले, भाजपसोबत जाऊ म्हणून त्यांनी प्रयत्न केले, शंभूराजे देसाई साक्षीदार आहेत- गुलाबराव पाटील

    शिवराळ भाषा वापरली गेली आमच्यावर, गुलाबराव पाटील यांची संजय राऊत यांच्यावर टीका

    चार लोकांच्या कंडोळ्यानं उद्धव साहेबांना बावळट केलं, चार मतं घ्यायची लायकी नाही याची आणि आम्हाला डुक्कर बोलतात, हे कोण सहन करणार आहे!

    गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली खंत

    आम्ही मोठी रिस्क घेऊन बाहेर निघालेलो आहोत- गुलाबराव पाटील

  • 04 Jul 2022 01:52 PM (IST)

    Sunil Prabhu : बहुमत चाचणीनंतर सुनील प्रभू यांची पहिली प्रतिक्रिया

    लोकशाहीचा खून विधीमंडळ सचिवालयाकडून करण्यात आला आहे, असा आरोप शिवसेनेच्या सुनील प्रभू यांनी केलाय.  नियमबाह्य छेद देऊन या सगळ्या गोष्टी होत आहेत. ज्या चाळीस बंडखोर आमदारांनी विधीमंडळाचे सगळे नियम धाब्यावर बसवून या विधीमंडळाच्या कामात दबावतंत्र वापरुन लोकशाही वापरली जातेय, हे खऱ्या अर्थाने लोकशाहीची हत्या होते आहे, असा आरोप सुनील प्रभू यांनी केला आहे. बहुमत चाचणीनंतर ते माध्यम प्रतिनिधींशी विधान भवनात बोलत होते.

  • 04 Jul 2022 01:48 PM (IST)

    Ashok Chavhan : ‘वेगळा अर्थ काढू नका, थोडासा लेट झाला’

    बहुमत चाचणीला अशोक चव्हाणांची गैरहजेरी

    सभागृहाचे दरवाजे बंद झाल्यानं बहुमत चाचणीला मुकले

    थोडासा उशीर झाल्यानं बहुमत चाचणीला अशोक चव्हाण मुकले

    अखेरच्या क्षणी सभागृहात जाताना उशीर झाल्यानं बहुमत चाचणीला मुकल्याचं स्पष्टीकरण

    मुद्दामून बहुमत चाचणी टाळलेली नाही, अशोक चव्हाण यांचं स्पष्टीकरण

    वेगळा अर्थ काढू नका, अशोक चव्हाण यांचं आवाहन

  • 04 Jul 2022 01:42 PM (IST)

    Aditya Thackeray : ‘जे पळाले त्यांना शिवसेना संपवायची होती’

    जे पळाले, त्यांना शिवसेना संपवायची होती, आदित्य ठाकरे यांचा निशाणा, कुर्ल्यातील इमारत दुर्घटनेनंतर मी गेलो होतो रात्री अडीच वाजता, पण तिथले स्थानिक आमदार गुवाहाटीत पार्टी करत होते, मतदारांना बंडखोर आमदारांना कधी तरी तोंड द्यावं लागेलच, आदित्य ठाकरेंचा इशारा

    कोर्टात लढाई सुरु आहे, आमचा व्हीपच खरा व्हीप आहे, हे कोर्टात आम्ही सिद्ध करु- आदित्य ठाकरे

    20 मे रोजी एकनाथ शिंदेंना मातोश्रीवर बोलावलं होतं आणि त्यांनी मुख्यमंत्री व्हायचंय का तुम्हीला ही विचारणा करण्यात आली होती- आदित्य ठाकरे

    मध्यावधी निवडणुकांसाठी आम्ही तयार आहोत, प्रचंड ताकदीनं शिवसेना विधानसभेत पुन्हा दिमाखात भगवा फडकवून दाखवेल, आदित्य ठाकरेंचा पुनरुच्चार

  • 04 Jul 2022 01:39 PM (IST)

    काँग्रेसच्या 10 आमदारांची बहुमत चाचणीवेळी दांडी!

    एकनाथ शिंदे यांच्या बहुमत चाचणीवेळी काँग्रेसच्या दहा आमदारांची दांडी

    कोण कोणते 10 काँग्रेस आमदार बहुमत चाचणीला अनुपस्थित?

    काॅग्रेस आमदार अनुपस्थित…

    1. अशोक चव्हाण
    2. प्रणिती शिंदे
    3. जितेश अंतापुरकर
    4. विजय वडेट्टीवार
    5. झिशांत सिद्दीकी-
    6. धिरज देशमुख
    7. कुणाल पाटील
    8. राजू आवळे
    9. मोहन हंबर्डे
    10. शिरीष चौधरी
  • 04 Jul 2022 01:27 PM (IST)

    Sudhir Mungantiwar: अजित पवारांवर सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या मनाचं व्यक्तिमत्व

    शिवसेना – भाजपा युतीचा कौल मतदारांनी दिला

    शिवसेना काल्पनिक कथानक वाटण्याऱ्यासोबत गेले

    महाराष्ट्राचा विकासाचे ते पालक झालेत

    अजित पवारांनी सत्ता येण्यासाठी अप्रत्यक्ष सत्तेसाठी मदत केली

    आत मनात एकदा अशी उडी मारावी लागले

    बहुमतानं सरकार आलं, तर आता रडण्याचा कार्यक्रम सुरू केला

    भाजपा पक्ष तुम्हाला समजलेलेचं नाही

    त्याग , सेवा , समर्पण यांना समजलचं नाही

    सर्व कुटुंबियांसाठी केलेलं आहे

    कार्यकर्त्यांच्या हाती तुम्ही दंडा दिला

    शर्जिल उस्मानी तुम्ही सोडलं, हिंदुत्वाचा अपमान केला, मुनगंटीवार यांची टीका

    पाहा व्हिडीओ :

  • 04 Jul 2022 01:17 PM (IST)

    प्रताप सरनाईक यांचं प्रत्युत्तर!

    विधानसभेत प्रताप सरनाईक यांचं भास्कर जाधव यांना प्रत्युत्तर

    तुमचं अभिनंदन, तुम्हाला आज माझ्याबद्दल जे वाटतंय, ते दीड वर्षापूर्वी वाटलं असतं, तर मला बरं वाटलं असतं, असं म्हणत प्रताप सरनाईक यांचा टोला

    ईडीवरुन केलेल्या वक्तव्यामुळे प्रताप सरनाईक यांचं भास्कर जाधव यांना उत्तर

    विधानसभेत आता शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना…

  • 04 Jul 2022 01:10 PM (IST)

    Bhaskar Jadhav : भास्कर जाधव यांचं भाषण

    भास्कर जाधव यांच्याकडून अभिनंदनाच्या प्रस्तावाचं भाषण सुरु करताना महाराष्ट्राच्या राजकीय प्रथा, परंपरांवर बोट, देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून ते म्हणाले की,..

    दुसरी आवाज आहे, तोही लोकशाहीत ऐकला पाहिजे असं फडणवीस म्हणाले. मी सभागृहातला दुसरा आवाज आहे. माझे काही विचार, शब्द आपण ऐकून घेण्याचं औदार्य दाखवावं, अशी अपेक्षा बाळगतो.

    एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री झाले. गेल्या आठ दिवसात मी झोपलेलो नाही. शिंदे साहेब माझे जवळचे मित्र आहेत. मी कधी असा विचलीत होत नाही. पण मी माझा चेहरा लपवू शकत नाही. एकनाथराव शिंदे आजही सांगत आहेत, मी शिवसेनेचा आहे. मी हिंदुहृदयसम्राट यांचा शिवसैनिक आहे. आनंद दिघे यांचा वारसदार आहे. मीही हे मान्य करतो. मला त्यांना सांगायचंय, की.. तुम्ही शिवसेनेचं नाव घेता.

    तुम्ही गटनेते झाल्यावर मी तुमचा सत्कार केला. मी तुमच्याकडे पाहिलं, तेव्हा MSRDC च्या ऑफिसमध्ये दोनदा भेट झाली. तुमच्या मंत्रालयातील दालनात एकदाही माझी भेट झाली नाही. मी तुमची काम करण्याची पद्धत पाहिली, तेव्हा मला जाणवलं, की शिंदेंचं काम पाहिलं. ते मी मान्य करतो. तुम्ही मदतीला धावून जाता, हे खरंच आहे.

    आपण आज बाळासाहेब, दिघे, शिवसेनेचं नाव सांगताय, तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. एका बाजूला 40 शिलेदार उभे आहेत. दुसऱ्या बाजूला सामान्य शिवसैनिक छातीचा कोट करुन दुसऱ्या बाजूला उभा आहे. कोण कुणाला धारातीर्थी पाडणार आहे, याचा विचार करा. ही जबाबदारी आज आपल्यावर येऊन ठेपलेली आहे.

    माणसानं एखादी लढाई हातात घेतली, की थांबायचं कुठे हे ज्याला माहीत असतं, तो खरा योद्धा!

    या महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाभारताची, रामायणाची पुनरावृत्ती होणार आहे. सख्खे चुलत भाऊ एकमेकांसमोर उभे राहणार आहेत.

    पहिल्या दिवशी सरकार स्थापन झाल्यापासून प्रत्येक चाल, प्रत्येक कृती ही सरकार उलथून लावण्यासाठी होती.

    कधी सुशांत सिंह राजपूत, कधी कंगना, कधी भोंगा, कधी हनुमान चालीसा तुम्ही कुणाकुणाच्या हातात दिली. पण सत्ता उलटली नाही. ज्या भाजप तत्त्वज्ञानाच्या गोष्टी तुम्ही करता आहात…

    संजय राठोड यांचं मंत्रिपद घालवायला तुम्ही आंदोलन केलं, आता त्यांच्यासाठी तुम्ही काय करताय?

    प्रताप सरनाईक, यामिनी जाधव यांना ईडी चौकशी लावली, त्यांच्या घराखाली केंद्राची सुरक्षा लावावी लागली, हा नियतीचा न्याय आहे.

  • 04 Jul 2022 12:49 PM (IST)

    बाळासाहेब थोरात यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचं भाषण सुरु

    Balasaheb Thorat : काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्याकडून एकनाथ शिंदेच्या अभिनंदनाच्या भाषणाला सुरुवात, सतत गर्दीत राहणारं व्यक्तिमत्त्व तुमचं आहे, तुमचं भरपूर कौतुक

    चांगलं कामच तुम्हाला अडचणीत आणतंय, बाळासाहेब थोरात यांचा फडणवीसांना टोला

    महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, आपली ज्येष्ठ मंडळी कोणत्याही पक्षाची असोत, त्यांना कायम आदराचं स्थान द्यायचं,

    लहानसहान माणसं मानाच्या पदावर नको ते बोलून जातात, या सगळ्या बाबतीत महाराष्ट्रातून अशी चुकीचे पायंडे पडता कामा नये, थोरातांचं आवाहन

    मुख्मयंत्री पक्षाचा नसतो, तो राज्याचा असतो- बाळासाहेब थोरात

    कोरोना महामारीत मविओने आदर्श काम केलं.

    एका पक्षाचं सरकार असलं तरी कुरबुरी असतात, अडचणी असतात

    काम झालं पाहिजे, यासाठी किती आमदारांमध्ये तणाव असतो, हे सगळं माहिती आहे

    महाविकास आघाडीत कुणीही कधीही टोकाची भूमिका घेतली नाही, हा बदल तुम्ही करत असताना, तो एक नवा इतिहास नोंदवला जातो, यावर पुस्तकं लिहिली जातील….

    तुम्ही आमच्या खांद्यावर बंदूक ठेवली, याचं वाईट वाटतं, बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली खंत

    मेट्रो कारशेडचा निर्णय घेतला, पर्यावरणवादी तिथे निर्णय घेतलाय, त्याचा तुम्हाला फेरविचार करावा लागेल, थोरातांचं आवाहन

    महाराष्ट्रात जुलैचा पहिला आठवडा सुरुय, महाराष्ट्रात पेरणीची अवस्था काय? पाऊस नाही, पेरण्या नाही, दुबार पेरणीची वेळ आली आहे, कर्जाची व्यवस्था नाही, या सगळ्या सत्तेच्या खेळात सामान्य माणसाच्या प्रश्नाकडे तुमचं दुर्लक्ष झालंय, बाळासाहेब थोरात यांचा निशाणा

    राज्याच्या पित पाण्यासाठी तातडीनं बैठक घ्यावी, थोरातांचं शिंदे यांना आवाहन

    पाहा व्हिडीओ :

  • 04 Jul 2022 12:25 PM (IST)

    Ajit Pawar : बंडखोरांच्या आरोपांना अजित पवारांचं बेधडक उत्तर!

    अजित पवार यांनी आपल्या भाषणात म्हटलं की,

    देवेंद्र फडणवीस या सगळ्या आमदारांमध्ये सगळ्यात नशीबवान कोण असतील तर ते देवेंद्र फडणवीस आहे. ते मुख्यमंत्री पण झाले, उपमुख्यमंत्री पण झाले आणि विरोधी पक्ष नेतेही झाले. सगळी महत्त्वाची पदं त्यांनी भूषवली.

    कुणाला वाटलंही नव्हतं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील. फडणवीसांनी तीन चार वेळा सतत शिवसैनिक म्हणून उल्लेख केला. हे सारखं सारखं का सांगावं लागतंय. 4 जुलै पर्यंत विश्वासदर्शक ठराव करण्यासाठी मुदत दिली होती. त्याप्रमाणे तुम्ही ते केलंय.

    विरोधी मतदान करुन आम्ही आमची भूमिका मांडली. सत्ता येते, सत्ता जाते. ताम्रपट घेऊन कुणीच जन्माला आलेलं नाही. पण देवेंद्रजी मी तुमचं भाषण बारकाईने ऐकलं, तुम्ही त्यांचं एवढं समर्थन करत होतात, मग मागच्या टर्म असतान फक्त रस्ते विकास महामंडळच त्यांच्याकडे का दिलं? नेता मोठा असला की खाती जास्त असतात, हे चंद्रकात पाटील यांना माहीत आहेत.

    जर शिंदे साहेब सर्वगुणसंपन्न होते, तर छोटंसं रस्ते विकास महामंडळ, ज्याचा जनतेशी संबंधच नव्हता, हायवे करायचे, टनल करायचे, असं असताना त्यांनी दुसरं कुठलं खातं का नाही दिलं? याचा महाराष्ट्रपण विचार करेल.

    न्यायालयीन लढाई सुरु आहे. असं असताना ठराव इतक्या घाईत आणण्याची काही गरज नव्हती. पण अनेक गोष्टी लांबणीवर टाकण्याचं काम केलेलं आहे. शिंदेसाहेब आपण एकत्रच जायचो राज्यपालांना भेटायला… 12 आमदारांच्या निवडीचा निर्णय त्यांनी निर्णय दिलेला नाही. आता ते एक्शन मोडमध्ये आलेले आहेत. 12 आमदारांच्या निवडीचा प्रश्न लांबवला.

    पटोले साहेबांच्या राजीनाम्यानंतर प्रत्येक अधिवेशनात आम्ही शिंदेसाहेबांसोबत राज्यपालांना भेटायला गेलो. अध्यक्ष निवडीसाठी मागणी केली सातत्यानं. पण मागच्या चार दिवसात एवढ्या फास्ट घटना झाल्या, त्यानं महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात शंका उपस्थित होतात.

    गेल्या 8-10 दिवसांत राज्यात इतकं काही बरंच घडलं, की म्हटलं जातं की 40 आमदार उद्धव ठाकरेंवर अविश्वास दाखवून गेला. त्यामुळे त्यांना पद सोडावं लागलं. आता जरा बाहेर शिवसैनिकांच्या मनात काय सुरु आहे, याची माहिती घ्या.

    बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडण्याचा प्रयत्न जेव्हा जेव्हा झाला, भुजबळ साहेबही 10 आमदार घेऊन बाहेर गेले, त्यानंतर एकही आमदार निवडून आला नाही. राणेसाहेबांच्या नंतरही किती आमदार निवडून आले, याचंही आत्मचिंतन प्रत्येकानं केलं पाहिजे. संदीपानजी मिरच्या झोंबल्या पाहिजे, असं सांगत आहेत.

    तुम्ही मंत्री होतात आणि आपल्या कार्यकर्त्याला सांगताय की मिरच्या झोंबल्या पाहिजे, अरे काय…ssss

    सूरतवरु गुवाहाटी मग गोवा… माझ्या माहितीप्रमाणे इतक्या 10-12 दिवसात आतापर्यंतच्या हयातीत इतकं सगळं फिरायला मिळालं नसेल. मग आमचे शहाजीबापू.. काय झाडी… काय डोंगार… काय हॉटेल.. ओक्केयओक्केय… याच्यात फार गोंधळून जाण्याची आणि फार लगेच वक्तव्य करण्याचं कारण नाही..

    ही मोठी लोकं कधी एकत्र येतील, यांचा काही नेम नाही. शिंदेसाहेब यांचं अभिनंदन करतो.. हॉटेलात काही जणांना नाच केला. नंतर टेबलावरच नाचायला लागले. सत्ता येते, जाते, आपण पाच पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो.

    त्यात प्रवक्ते म्हणून तुम्ही दिलगिरी व्यक्त केली. कारण तुमच्यावर राष्ट्रवादीचे संस्कार झालेलेत. अब्दुल सत्ताही शांत आहेत.

    मंत्रिमंडळाचं स्थिरस्थावर होत नाही, तोपर्यंत शांत बसायची भूमिका घेतल्याचं दिसतंय.

    शिवसेनेच्या नेत्याबरोबर शिवसैनिक जात नाही, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. येणाऱ्या निवडणुकीत काय ते स्पष्ट होईल.

    40 आमदार असलेली व्यक्ती मुख्यमंत्री होते, 106 आमदार असलेली मुख्यमंत्री होते, याच नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे.

    आमच्या 105 मुळे आज तुम्ही मुख्यमंत्री आहेत, हे मनुष्यस्वभाव बोलायला मागे पुढे पाहणार नाही, हे लक्षात घ्या

    शिवसेना भाजपच्या मदतीने महाराष्ट्रात वाढली आहे. शिवसेनेसोबत राहून भाजपने आपली ताकद महाराष्ट्रात वाढवली. आघाडी असली तरी त्यांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणार. पण शिंदे साहेब आजपर्यंत महाराष्ट्रातल्या लोकांना कधीच बोललो नव्हतो, पण आज बोलतो, ही अनैसर्गिक युती, आमच्यावर अन्याय केला, असा पाढा वाचवण्याचं काम केलं. मी काम करताना असा भेदभाव कधीच करत नाही. एक कोटी रुपये आमदार निधी होता, तो दोन कोटी मीच केलं. आपण आल्याआल्या चार कोटी केला. त्यानंतर शिंदेसाहेब आपण एकत्र आल्यानंतर पाच कोटी केला. आपल्या सगळ्यांच्या मुळे आघाडीचं सरकार होतं. तुम्ही सतत म्हणता की आम्ही अन्याय केला. नगरविकास खात्याला कोट्यवधींचा निधी दिला. आपण खासगीत बोलत होतो. अजून नगरविकासला 1 हजार रुपये निधी देण्याबाबत बोलणं झालं. मी भेदभाव करणारा माणूस नाही.

    देवेंद्रजी तुम्ही मुख्यमंत्री होताना, मुख्यमंत्रीच शेवटी हात फिरवतात ना.. बजेटवर किंवा इतर बाबींवर आणि सांगण्यात आलं की राष्ट्रवादीमुळे अन्याय…

    राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थविभाग असताना, फक्त तुम्हीच नाही तर काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांनीही याप्रकारचे आरोप झाले, तुम्हाला अनैसर्गिक आघाडी झाली, अमुक झालं, तमुक झालं, पण कारण नसताना राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न करु नका..

    इथून पुढच्या वाटचालीत चांगल्या कामाच्या बाबतीच आम्ही तुम्हाला सहकार्यच करु. पण जिथं राज्याचं हित पाहिलं जाणार नाही, त्या बाबी विरोधक म्हणून आम्ही तुमच्या निदर्शनास आणून देऊ!

    पाहा व्हिडीओ :

  • 04 Jul 2022 11:58 AM (IST)

    Total mla seats in Maharashtra : महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण किती आमदार?

    Total mla seats in Maharashtra : महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण 288 आमदार आहेत. त्यापैकी 164 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्याबाजूने मतदान केलं आहे.

  • 04 Jul 2022 11:47 AM (IST)

    floor test in Maharashtra live : पुन्हा येईन म्हणालो होतो, पुन्हा आलो- देवेंद्र फडणवीस

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदनाच्या प्रस्तावाचं भाषण सुरु, फडणवीस म्हणाले की,..

    शिवसेना भाजप युतीचे आमचे मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांच्यावर प्रचंड मोठा विश्वास व्यक्त केला याबाबत मी शिंदे यांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. (यानंतर शिवसेना भाजप युतीचा विजय असो, अशी घोषणाबाजी करत शिंदे सर्मथकांकडून जल्लोष करण्यात आला.)

    सभागृहाबाहेर राहून हा प्रस्ताव मंजूर करण्यात ज्यांनी मदत केली, त्या अदृश्य हातांचेही मी आभार मानतो. शिंदे हे कट्टर शिवसैनिक आहेत. कर्मावर अढळ निष्ठा असलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. ते जनतेचे सेवेकरी आहे, कुशल संघटक आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेबांच्या प्रभावामुळे 1980 मध्ये शिवसेनेत सक्रिय काम सुरु केलं. शाखाप्रमुखापासून ते वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत ते मुख्यमंत्री झाले. 1984 मध्ये किसन नगर शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर दिघेसाहेबांच्या नेतृत्त्वात अनेक आंदोलनात शिंदेंनी सहभाग घेतला.

    सीमाप्रश्नावर जे आंदोलन झालं, त्या आक्रमक आंदोलनात शिंदे यांनी एक नेता म्हणून आपला दबदबा तयार केला. 1986 साली त्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. 40 दिवस बेलारीच्या जेलमध्ये सीमाप्रश्नी त्यांनी कारावास भोगला. त्यातून एक मोठं व्यक्तिमत्त्व तयार झालं.

    MSRDC चे मंत्री म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला. तेव्हा काहींना वाटायचं, की हे खातं देऊन त्यांचे पंख छाटले. जेव्हा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची संकल्पना ही मी मांडली, त्यांना घेऊन बसलो, त्यांना सांगितलं की माझी इच्छाय की हा महामार्ग व्हावा. तिथे प्रत्यक्ष ग्राऊंटवर जाऊन ज्या व्यक्तीनं तिथल्या समस्या सोडवल्या. तिथले अडथळे दूर केले. ज्या व्यक्तीनं यात सातत्यानं काम केलं, त्या व्यक्तीचं नाव एकनाथ शिंदे आहे. आरोग्यमंत्री म्हणूनही त्यांनी अतिशय उत्तम काम एकनाथ शिंदे यांनी केलं.

    एकनाथ शिंदे हे एक वेगळं रसायन आहे. 24X7 काम करणारा हा नेता आहे. निवडणूक असते, क्राईसिस असतो तेव्हा 72X21 असं तिहेरी वेळा काम करताना हा नेता दिसतो. एकनाथ शिंदेंमध्ये प्रचंड माणुसकी आहे. सगळ्यांसाठी धावून जाणं, ही शिकवण धर्मवीर आनंद दिघे यांना दिली. ज्याचा कुणी नाही, त्याचे दिघे साहेब होते. याच शिकवणीमुळे ते सामान्य माणसासाठी काम करताना शिंदेसाहेब दिसतात.

    महालक्ष्मी एक्स्प्रेस जेव्हा पुरात अडकली होती, तेव्हा साप बोटीत घुसेल याची पर्वा न करता शिंदे साहेबांनी पुरात काम केलं. कोल्हापुरातही त्यांनी मदतीचं मोलाचं काम केलं. दिवसाला चारशे पाचशे लोकांना ते भेटतात.

    शिंदे पब्लिकचा माणूस आहे. पब्लिकमध्ये ते रमतात. लोकं जमली आजूबाजूला की ते त्यांच्या समस्या सोडवल्याशिवाय राहत नाही.

    धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी एकनाथ शिंदेसाहेबांना उर्जा दिली, प्रेम दिलं, आणि स्वतःच्या घरापेक्षाही समाजाचा विचार केला पाहिजे, ही भावना रुजवली. शिंदे यांना शेतीचीही आवड आहे. ते गावी जातात. शेती करतात, स्ट्रॉबेर, सफरचंदाची शेती करतात. तिथे जाऊन पुन्हा तयार होतात.

    कार्यकर्त्यासाठी सहा तास प्रवास करुन दहा मिनिटं थांबले, पुन्हा सहा तास प्रवास करुन चिपळूणहून आले, ही एकनाथ शिंदे यांची कार्यकर्त्याप्रती असलेली भावना आहे.

    56 व्या वर्षी एकनाथ शिंदेंनी बीएची पदवी घेतली. दहावीपर्यंत शिक्षण केलं. मध्ये शिक्षण सुटलं. पण ते नंतरत 77 टक्के गुण मिळवून पूर्ण केलं.

    मविआ सरकार अनैसर्गिक आहे, ते टिकणार नाही, मी कविता म्हटली होती की मी पुन्हा येईन, त्यावरही माझी टिंगल उडवली, पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो, एकटा नाही आलो, यांना सोबत घेऊन आलो…

    ज्यांनी माझी टिंकल टवाळी केली, त्यांचा मी बदला घेणार आहे. बदला हा आहे, की मी त्यांना माफ केलंय. प्रत्येकाची वेळ येते.

    दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, काच के खिलोने हवा मे उछाले नहीं जाते.. कोशिश करने से हर मुश्लिल होती है आसान, तकदीर के भरोसे काम टाले नहीं जाते..

    घरी बसणयाचा आदेश दिला असता तरी घरी बसलो असतो.

    राज ठाकरेंनी अतिशय सुंदर पत्र लिहिलं. त्यांना उत्तर द्यायचा विचार केला. पण मला शब्द सुचले नाहीत. फोनवरुन मी त्यांचे आभार मानले. लवकरच त्यांची भेट घेणार आहे.

    आपण एकमेकांचे राजकीय विरोधक आहोत. एकमेकांचे सत्रू नाही आहोत.

    हे सरकार पण ईडीच आहे, एकनाथ आणि देवेंद्र….

    आमच्या एकएकेका नेत्यावर 30-30 केस टाकल्या होत्या. माझी गाडी देवदर्शनाला भाड्याने नेली आणि 5000 दिली नाही, यावरुन केस केली..

    गिरीष भाऊंवरच मोक्काच लावणार होता, बरं झालं असतं लावलं असतं तर… पण जाऊ द्या..

    दक्षिणेसारखी महाराष्ट्रात परिस्थिती नाही, महाराष्ट्रातील राजकारण दक्षिणेसारखं ‘खून के प्यासे टाईप’ नाही

    तानाशाही दिल्लीतलं सरकार करतं म्हणता आणि फेसबुकवर एक पोस्ट टाकली तर महिनाभर जेलमध्ये ठेवता, महिला खासदाराला हनुमान चालीसेवर 12 दिवस जेलमध्ये ठेवता, हे योग्य नाही

    बदल्याच्या भावनेनं, आकसेनं हे सरकार काम करणार नाही, काही गोष्टी स्थगित होतील, पण मेरीटवरच!

    हा नेता महाराष्ट्राच्या सगळ्यांसाठी उपलब्ध असेल, एका फोनवर हा नेता उपलब्ध असेल

    राज्यपालांचं पत्र आल्यानंतर जोपर्यंत विश्वास प्राप्त होत नाही, तोपर्यंत कॅबिनेट घ्यायची नसते, हा संकेत आहे

    नामांतराचा विषय असो किंवा इतर काही निर्णय असतील, या कॅबिनेटमध्ये घेतलेले निर्णय लागू करण्याचं काम हे सरकार या ठिकाणी करेल!

    पाहा व्हिडीओ :

  • 04 Jul 2022 11:43 AM (IST)

    Floor test in Maharashtra live : एकनाथ शिंदे बहुमत चाचणी जिंकले! विरोधात किती, तटस्थ किती?

    CM Eknath Shinde floor test LIVE Update : एकनाथ शिंदे यांची बहुमत चाचणी जिंकली!

    1. एकनाथ शिंदे यांच्या बाजून किती मतं? 164
    2. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात किती मतं? 99
    3. तटस्थ मतं किती? 3
  • 04 Jul 2022 11:37 AM (IST)

    CM Eknath Shinde floor test LIVE Update : कैलास गोरंट्याल अब तक छप्पन्न! मतदानावेळी डायलॉगबाजी

    CM Eknath Shinde floor test LIVE Update : ईडी, राज्यपाल यांच्यावर कैलाश गौरंट्याल यांचा भाजपवर हल्लाबोल, एकनाथ शिंदे यांच्या विरोधात कैलाश गोरंट्याल यांचं मतदान, अब तक 56 म्हणत कैलाश गोरंट्याल यांना भाजपवर निशाणा

    पाहा व्हिडीओ :

  • 04 Jul 2022 11:33 AM (IST)

    CM Eknath Shinde floor test LIVE Update : विरोधातल्या मतांची मोजणी सुरु!

    CM Eknath Shinde floor test LIVE Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधातील मतांची शिरगणना सुरु, राष्ट्रवादीच्या नेत्यांचं एकनाथ शिंदेच्या विरोधात मतदान, बहुमत चाचणीत एकनाथ शिंदेंनी मिळवली 164 मतं, विरोधातली मतं किती? याची गणना सुरु

    पाहा व्हिडीओ :

  • 04 Jul 2022 11:28 AM (IST)

    CM Eknath Shinde floor test LIVE Update : मतदान केल्यानंतर राणांचं ‘जय बजरंग बली’

    CM Eknath Shinde floor test LIVE Update :  एकनाथ शिंदे यांना मतदान केल्यानं अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्याकडून जय बजरंग बलीची घोषणा, रवी राणांकडून एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात मतदान, एकनाथ शिंदे यांच्याकडून बहुमत चाचणीची अग्निपरीक्षा पास, 164 मतं मिळवण्यात एकनाथ शिंदे यांना यश, रत्नाकर गुट्टे यांच्या जय भगवान यांच्या नावाची घोषणा

    पाहा व्हिडीओ :

  • 04 Jul 2022 11:25 AM (IST)

    CM Eknath Shinde floor test LIVE Update : एकनाथ शिंदे यांनी पार केली बहुमत चाचणी!

    CM Eknath Shinde floor test LIVE Update : एकनाथ शिंदे यांनी पार केली बहुमत चाचणी! 145+ मतं मिळवण्यात एकनाथ शिंदे यांना यश, शिंदे गटाकडून सभागृहामध्ये एकच जल्लोष, बहुतमच चाचणीत एकनाथ शिंदे यशस्वी

    पाहा व्हिडीओ :

  • 04 Jul 2022 11:22 AM (IST)

    Maharashtra floor test : शिरगणना सुरु! एकनाथ शिंदे यांची आघाडी

    Maharashtra floor test : एकनाथ शिंदे यांना 100+ जास्त मतं, पाठिंबा वाढताच, 145च्या बहुमतापासून अवघी काही मतं दूर

    पाहा व्हिडीओ :

  • 04 Jul 2022 11:16 AM (IST)

    CM Eknath Shinde floor test LIVE Update : बंडखोर संतोष बांगर भाजपच्या रविंद्र चव्हाण यांच्या बाजुला

    CM Eknath Shinde floor test LIVE Update : शिवसेनेचे नवे बंडखोर संतोष बांगर भाजपच्या रविंद्र चव्हाण यांच्या बाजुला

    संतोष बांगर यांच्या बंडखोरीने उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का

    कालपर्यंत ठाकरेंसोबत आता अचानक संतोष बांगर यांच्याकडून शिंदे यांना पाठिंबा

    बहुमत चाचणीच्या अगोदर संतोष बांगर शिंदे गटात सामील

    पाहा व्हिडीओ :

  • 04 Jul 2022 11:11 AM (IST)

    CM Eknath Shinde floor test LIVE Update : बहुमत चाचणीसाठी शिरगणनेला सुरुवात!

    CM Eknath Shinde floor test LIVE Update : सुरुवातीच्या शिरगणेत एकनाथ शिंदेच्या बाजूने मतदानाला सुरुवात, एकनाथ शिंदे यांची आघाडी, आज 164 पेक्षाही जास्त मतं शिंदेंना मिळणार का? याकडे राज्याचं लक्ष

    पाहा व्हिडीओ :

  • 04 Jul 2022 11:08 AM (IST)

    Video : कामकाज सुरु झाल्यानंतर आदित्य ठाकरे विधान भवनात

    CM Eknath Shinde floor test LIVE Update : विधानसभेच्या सभागृहाचे दरवाजे बंद होण्याच्या अवघे काही क्षण आधी आदित्य ठाकरे सभागृहात पोहोचले

    11 वाजून गेल्यानंतर आदित्य ठाकरे विधान भवनात पोहोचले

    आवाजी मतदानाच्या वेळी आदित्य ठाकरे गैरहजर

    विरोधकांनी केलेल्या पोलच्या मागणीमुळे आता होणार शिरगणना

    पाहा व्हिडीओ :

  • 04 Jul 2022 11:04 AM (IST)

    LIVE Video : बहुमत चाचणीला सुरुवात! थेट सभागृहातून लाईव्ह

    बहुमत चाचणीची प्रक्रिया सुरु, विरोधकांकडून पोलची मागणी, पाहा नेमकं सभागृहात काय घडतंय?

    पाहा व्हिडीओ :

  • 04 Jul 2022 11:01 AM (IST)

    CM Eknath Shinde floor test LIVE Update : अधिवेशनाचं कामकाज सुरु!

    CM Eknath Shinde floor test LIVE Update : विधानसभेचं कामकाज सुरु, सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला शिंदे यांच्याबाबत विश्वासदर्शक ठराव,

    आवाजी मतदानाने ‘होय’ म्हणत मतदान

    विरोधकांकडून पोलची मागणी

    सभागृहात आता पुन्हा शिरगणना (हेडकाऊंट) केली जाणार

  • 04 Jul 2022 10:56 AM (IST)

    CM Eknath Shinde floor test LIVE Update :भाजपकडून आमदारांना व्हीप जारी

    CM Eknath Shinde floor test LIVE Update : भाजपकडून आमदारांना व्हीप जारी, एकनाथ शिंदे यांना मतदान करण्यासाठी व्हीप जारी, याआधी शिंदे गटाच्या भरत गोगावलेंकडून व्हीप जारी, तर दुसरीकडे सुनील प्रभू यांच्याकडूनही व्हीप जारी करण्यात आल्यानं कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता

  • 04 Jul 2022 10:45 AM (IST)

    Video : 7 दिवस आधी बोललेच शब्द विसरले संतोष बांगर?

    CM Eknath Shinde floor test LIVE Update : बंडखोरीआधी संतोष बांगर यांनी केलेलं वक्तव्य आता चर्चेत, सात दिवस आधीच म्हणाले होते, मेलो तरी शिवसेना सोडणार नाही आणि आता सात दिवसांनंतर हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्याकडून बंडखोरी!

    बंडखोरांविरोधातच मोर्चा काढलेल्या संतोष बांगर यांनी काय म्हटलं होतं?

    पाहा व्हिडीओ :

  • 04 Jul 2022 10:43 AM (IST)

    संतोष बांगर यांचीही बंडखोरी! शिंदेंकडे आता 40 सेना आमदार

    Santosh Bangar : संतोष बांगर यांच्या बंडखोरीमुळे शिंदेकडील शिवसेना आमदारांची संख्या आता 40 वर पोहोचली

    स्वतः एकनाथ शिंदे हे संतोष बांगर यांना घेऊन विधान भवनात पोहोचले

    एकनाथ शिंदे सर्व बंडखोर आमदारांसह विधान भवनात दाखल

    आता एकनाथ शिंदे यांच्या एकूण 40 शिवसेना आमदार तर अपक्ष 9 आमदारांचा पाठिंबा

    शिवसेनेकडे आता उरले फक्त 15 आमदार

    गुवाहाटीतच एकनाथ शिंदे यांच्याकडे होते 39 शिवसेना आमदार

    दोन तृतीआंशपेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याचं शिंदे गटाचा विजय स्पष्ट

  • 04 Jul 2022 10:39 AM (IST)

    Nana Patole : ‘शिंदेना बहुमत मिळेलच, आज फक्त औपचारीकता’

    CM Eknath Shinde floor test LIVE Update : एकनाथ शिंदे यांना बहुमत चाचणी पार करण्यात कोणतीही अडचण नाही, हे कालच स्पष्ट झाल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. आज फक्त औपचारीकता बाकी आहे, असं ते म्हणाले.

  • 04 Jul 2022 10:37 AM (IST)

    CM Eknath Shinde floor test LIVE Update : बहुमतानंतर मुख्यमंत्री शिंदे कुठे-कुठे जाणार?

    1. हुतात्मा चौकात संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करणार
    2. शिवाजी पार्कमधील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करणार
    3. चैत्यभूमीला जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन करणार
    4. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा एकनाथ शिंदे ठाण्याला जाणार
    5. ठाण्यात ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत होणार
    6. आनंद दिघे यांचं समाधीस्थान असलेल्या शक्ती स्थळाचं दर्शन घेणार
  • 04 Jul 2022 10:29 AM (IST)

    Santosh Bangar : हिंगोलीचे आमदार संतोष बांगर शिंदे गटात सामील

    Santosh Bangar Hingoli Shiv sena MLA : उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसलाय. हिंगोलीचे संतोष बांगर हे एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील झालेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदारांच्या बसमध्ये बसल्यानं चर्चांना उधाण आलंय. आज बहुमत चाचणीआधी उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसल्याचं स्पष्ट झालंय. कालपर्यंत हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे विधानसभा  अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी शिंदेच्या विरोधात मतदान केलं होतं. मात्र आता तेही बंडखोरांसमोर दिसलेत.

    विश्वासदर्शक ठरावात 164 पेक्षा जास्त मतं घेणार असा विश्वास शिंदे समर्थकांकडून व्यक्त केला जात होता. त्यातील एक वाढीव मत हे संतोष बांगर यांचं असणार हे आता स्पष्ट आहे.

    संतोष बांगर यांनी बंडखोरांवर सडकून टीका केली होती. ठाकरेंशी एकनिष्ठ असल्याचं त्यांनी म्हटलंय. संतोष बांगर हे दादा भुसे यांच्यासोबत उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. शिंदे यांचा निरोपही संतोष बांगर यांनी सांगितला होता. संतोष बांगर हे हिंगोलीत स्वतःच्या मतदारसंघात होते. बंडखोरी करणार नाही, असं संतोष बांगर यांच्याबाबत सांगितलं जातं होतं. मात्र आज हा मोठा धक्का मानला जातोय.

  • 04 Jul 2022 10:27 AM (IST)

    रविवारी सील केलेलं शिवसेनेचं कार्यालय उघडलं!

    रविवारी सील केलेलं शिवसेनेचं कार्यालय उघडण्यात आलं आहे. सुनील प्रभू यांच्यासह अजय चौधरी, आमदार उदयसिंह राजपूती या कार्यालयात दिसून आलेत. आमदार रमेश कोरगावकरही यावेळी कार्यालयात उपस्थित होते.

  • 04 Jul 2022 10:24 AM (IST)

    CM Eknath Shinde floor test LIVE Update : बहुमत चाचणीआधी व्हीप विरुद्ध व्हीप लढाई!

    CM Eknath Shinde floor test LIVE Update : शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून व्हीप जारी करण्यात आलाय. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात असलेल्या आमदारांसाठीही सुनील प्रभु यांच्याकडून व्हीप जारी कऱण्यात आला आहे. बहुमत चाचणीआधी व्हीप विरुद्ध व्हीप अशी लढाई सुरु आहे. त्यामुळे आमदार नेमका कुणाचा व्हीप मानणार? असा प्रश्न आजही आहे.

    विधीमंडळ सचिवालयाकडून शिंदेच गटनेते असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतरही जर शिवसेनेच्या 16 आमदारांनी शिंदे गटाचा व्हीप मानला नाही, तर त्यानंतर या 16 आमदारांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. आजचं बहुमत हे निव्वळ औपचारी आहे. फक्त या बहुमत चाचणी कोण कुणाला मतदान करतं, हे पाहणं महत्त्वाचंय.

  • 04 Jul 2022 10:20 AM (IST)

    फडणवीस उद्या नागपुरात जाणार! आतापासून स्वागताची तयारी…

    Devendra Fadnavis : नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे. ते उद्या नागपुरात जाणार आहेत. त्यासाठी नागपूर शहरात ठिकठिकाणी होर्डिंग लावण्यात आलेत. उपमुख्यमंत्री झाल्या नंतर पहिल्यांदाच नागपुरात उद्या फडणवीस यांचं आगमन होईल.  मुख्यमंत्री पदाचे दावेदार असताना सुद्धा पार्टीच्या आदेशाने उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं, त्यामुळे पक्ष आधी नंतर पद अश्या आशयाचे भावनिक होर्डिंग लागवण्यात आलेत. फडणवीस मुख्यमंत्री झाले नाही याची काही कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी झटकण्यासाठी जोरदार स्वागत केल जाणार आहे. विमानतळ ते फडणवीस यांच्या निवास स्थान पर्यंत रॅली काढण्यात येणार आहे.

  • 04 Jul 2022 10:17 AM (IST)

    Video : विधानभवन परिसरातून थेट LIVE

    CM Eknath Shinde floor test LIVE Update : विधान भवनात आमदार येण्यास सुरुवात

    विधानसभेत आज होणार बहुमत चाचणी

    एकनाथ शिंदेंची बहुमत सिद्ध करण्यासाठी आज अग्निपरीक्षा

    चोख सुरक्षा व्यवस्थेत आमदारांना विधान भवनात आणण्यास सुरुवात

    पाहा व्हिडीओ :

  • 04 Jul 2022 10:13 AM (IST)

    Pravin Darekar : पवार जे बोलतात नेहमी त्याच्या उलट घडतं- प्रवीण दरेकर

    सहा महिन्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता प्रवीण दरेकरांनी फेटाळली. शरद पवार जे बोलतात त्याच्या बरोबर उलट घडतं, असंही ते म्हणाले आहेत. त्यामुळे पुढची काही दशकं हे सरकार काम करत राहिल, असाही विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय. पवार म्हणाले होते, की आमदार मुंबईत आल्यावर त्यांचं मतपरिवर्तन होईल. पण तसं काही झालं का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या सरकारला धक्का लागण्याची कोणतीही शक्यता नाही, असं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय.

  • 04 Jul 2022 10:09 AM (IST)

    अग्निपरीक्षा काल होती, आज जिंकणारच- दरेकर

    शिंदे सरकारवरचा विश्वास आज संमत होईल, असं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. कालच्या पेक्षा आज जास्त मतं घेण्यात आम्हाला यश येईल, असा आम्हाला विश्वास वाटतो आहे, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. आज संपूर्ण महाराष्ट्र खूश, समाधानी आणि आनंदी आहे, असं दरेकर म्हणालेत. अडीच वर्षांत मविआने जनतेला समाधानी ठेवलं नाही, असंही दरेकर म्हणाले. आज 164 पेक्षा जास्त आमदार आम्हाला मतदान करील, अशी शक्यता प्रवीण दरेकरांनी व्यक्त केली आहे. उत्स्फूर्तपणे आमदार शिंदेंना पाठिंबा देतील, असंही दरेकर म्हणालेत.

  • 04 Jul 2022 10:06 AM (IST)

    बहुमत चाचणीनंतर एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळी जाणार

    बहुमत चाचणीनंतर एकनाथ शिंदेंचा पुढला प्लान ठरला

    बहुमत चाचणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळी जाणार

    आज 11 वाजता होणार शिंदे सरकारची अग्निपरीक्षा

  • 04 Jul 2022 09:59 AM (IST)

    बाळासाहेब थोरात यांची शरद पवारांशी फोनवरुन चर्चा

    बाळासाहेब थोरात यांनी शरद पवारांशी फोनवरुन चर्चा केली. महाविकास आघाडी एकत्र काम केलं जो विरोधी पक्षनेता निवडला जाणार तो महाविकास आघाडी म्हणून निवडला जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडी विरोधी पक्षनेता कुणाला निवडायचं, हे महाविकास आघाडी म्हणून निवडले पाहिजे, अशी भूमिका काँग्रेसने घेतल्याचं थोरात यांनी यावेळी पवारांना सांगितलं.

  • 04 Jul 2022 09:57 AM (IST)

    भाजप आमदारांची बस विधान भवनाच्या दिशेने रवाना

    भाजप आमदारांची बस विधान भवनाच्या दिशेने रवाना

    थोड्याच वेळात आमदार विधान भवनात पोहोचणार

    आज शिंदे सरकारची बहुमत चाचणी

    विधान भवन परिसराला छावणीचं स्वरुप, पोलीस बंदबस्तात वाढ

  • 04 Jul 2022 09:44 AM (IST)

    Ajit Pawar : अजित पवार विधान भवनात दाखल

    11 वाजता विधानसभेत सभागृहाचं कामकाज सुरु होणार आहे. पण त्याच्या दीड तास आधीच अजित पवार विधान भवनात दाखल झाले आहेत. आज शिंदे सरकार यांची बहुमत चाचणी पार पडेल. या चाचणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. दरम्यान, अजित पवार यांनी रविवारी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीनंतर राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन करता चौफेर फटकेबाजी आपल्या भाषणातून केली होती.

  • 04 Jul 2022 09:35 AM (IST)

    Sanjay Raut : भाजपला फक्त शिवसेना फोडायची होती, ती त्यांनी फोडली

    Sanjay Raut : भाजपला फक्त शिवसेना फोडायची होती, त्यांनी ती फोडून दाखवली, असा गंभीर संजय राऊतांनी केलाय. भाजपने केलेली ही तात्पुरती तजवीज आहे, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला. देशाचं राजकारण रक्तरंजित होत चालली आहे, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांची केली.

    शरद पवार जे म्हणत आहेत, त्यानुसार मध्यावधी निवडणुकांचा महाराष्ट्राला सामोरं जावं लागेल, गुजरातसोबत महाराष्ट्रातही निवडणुका होऊ शकतात, अशी माझी माहिती आहे, असं विधान संजय राऊत यांनी केलंय.

    2019 मध्ये शिवसेनेला डावललं, 2022 मध्ये फोडलं, याचा अर्थ तुम्हाला शिवसेनेलं दुबळं करणं, तोडणं, हेच कारण आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

    जिथे ठाकरे तिथे शिवसेना, हे समीकरण आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. चार खासदारांनी भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे शिंदेची तडजोड करणार का, यावर बोलताना राऊतांनी हे मोठं विधान केलं.

    पाहा व्हिडीओ :

  • 04 Jul 2022 09:27 AM (IST)

    Sanjay Raut : विधीमंडळातल्या लढाया आता चालूच राहतील- राऊत

    CM Eknath Shinde floor test LIVE Update : विधीमंडळातल्या लढाया आता चालूच राहतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं.  ज्याच्या हाती ससा, तो पारधी, या म्हणीचा दाखला देत  विधानसभा अध्यक्ष सत्ताधाऱ्यांच्या पद्धतीनं निर्णय घेत असतो, असं राऊत म्हणाले. पक्षाच्या विरुद्ध बाहेर कारवाया केल्या, शरद यादव यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं, अस राऊतांनी म्हटलंय. शरद यादव यांना संसदेत नाही, तर संसदेच्या बाहेर पक्षविरोधी कारवाई केली होती. हाच न्याय आम्ही लावायला गेलो, तेव्हा आम्हाला तो मिळाल नाही, असंही ते म्हणाले. जो खुर्चीवर आहे, त्यानं त्याच्या मर्जीनं न्याय द्यायचा, याला मी संसदीय लोकशाही मानत नाही, असाही टोला राऊतांनी लगावला. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिलेला निर्णय विधानसभा अध्यक्षांनी तो निर्णय बदलल्याचंही ते म्हणाले. हे काही रामशास्त्रांचं राज्य नाही, ही राजकीय चढाओढ आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

    मूळ पक्ष शिवसेना आहे. आपण शिवसेना पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. तुमचा पक्ष ओरीजनल कसा असू शकतो, हे आधी तुमच्या मनाला विचारा आणि मग कायद्याला विचारा, असा प्रश्न संजय राऊतांनी यावेळी उपस्थित केला. कोर्टात लढा सुरु असताना विधीमंडळात निवडणूक घेणं घटनाबाह्य, असा आरोप राऊतांनी केली. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

    विधीमंडळात शिवसेना कमजोर झाली असेल, पण ग्रामीण भागात, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात अजूनही शिवसेना ताकदवान आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. विधीमंडळात आमच्या पक्षात फूट पडली आहे, हे देखील राऊतांनी या पत्रकार परिषदेत बोलताना मान्य केलं.

    ज्या पद्धतीनं सभागृहात ईडीच्या नावानं गर्जना सुरु होत्या, त्यावरुन तुम्हाला कळलं असेल, असं म्हणत त्यांनी बंडखोरांवर निशाणा साधला. पण आम्हाला याची पर्वा नाही, अशा अनेक प्रसंगातून आम्ही गेलेलो आहोत, असं ते म्हणालेत.  शिवसेना पक्ष पुन्हा पुन्हा फोडण्याचा प्रयत्न होतो, पण शिवसेना पुन्हा उभी राहते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

    जोपर्यंत मुंबईत शिवसेना ताकदीनं उभी आहे, तोपर्यंत दिल्लीचे इरादे पूर्ण होणार नाही, असा थेट इशारा त्यांनी केंद्रातील भाजप सरकारला दिला. महाराष्ट्राचे दिल्लीला तीन तुकडे करायचे आहेत, त्यातील एक तुकडा मुंबईचा आहे, असाही दावा त्यांनी यावेळी केला.

    मुंबईच्या धनसत्तेवर काही लोकांना ताबा हवाय, त्यासाठी काहींना शिवसेनेला कमजोर करायचंय. या सगळ्यांचं सूत्र या फोडाफोडीमागे आहे.आजही शिवसैनिकी रस्त्यावर येतील आणि लढा देतील, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय.

    पाहा व्हिडीओ :

  • 04 Jul 2022 09:22 AM (IST)

    CM Eknath Shinde floor test LIVE Update : अजय चौधरी यांनी दीपक केसरकर यांना सुनावलं

    Ajay Choudhary : अजय चौधरी यांचं केसरकर यांना टोला लगावला आहे. दीपक केसरकरांनी आम्हाला कोणती खरी शिवसेना हे शिकवू नये दीपक केसरकर हे आधी राष्ट्रवादीत होते, सात आठ वर्षांपूर्वी आलेल्या केसरकरांनी आम्हाला शिकवू नये, असं अजय चौधरी यांनी म्हटलंय.  प्रथा, परंपरा यांना केराची टोपली दाखवून महाराष्ट्राचं राजकारण गढूळ केलं जात असल्याची टीकाही अजय चौधरी यांनी यावेळी केलं. गटनेते पदावरुन हटवल्यानंतर अजय चौधरी हे टीव्ही 9 मराठीसोबत बोलत होते. शिवसेना बंडखोरांच्या विरोधात न्यायालयात लढा देईल, असंही ते म्हणालेत.

  • 04 Jul 2022 09:09 AM (IST)

    बहुमत चाचणीआधी विधानसभा अध्यक्षांची EXCLUSIVE प्रतिक्रिया

    Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी टीव्ही 9 मराठीसोबत EXCLUSIVE बातचीत केली. आज विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार, सभागृहाचं काम व्यवस्थित चालेल, असं ते म्हणाले. सभागृहाचं कामकाज संविधानात दिलेल्या तरतूदीनुसार चालत असतं, वेगवेगळे प्रश्न ऊपस्थित करून संविधानाचा अपमान करण्यात येतोय. मी घेतलेला किंवा सभागृहाचा निर्णय हा कायद्याच्या अख्त्यारीत आहेत. ज्युडीशरीचा पर्याय असून यापूर्वीही असे निर्णय झाल्याचं ते म्हणालेत. एकनाथ शिंदे हेच गटनेते असल्याचं शिक्कामोर्तब विधीमंडळ सचिवालयातून रविवारी रात्री उशिरा करण्यात आलेलं होतं. त्यावर त्यांनी हे महत्त्वाचं विधान केलंय. जनता हे सरकार पाच वर्षांसाठी निवडून देते, 2024 मध्ये निवडणुका आहेत, मला आजची फ्लोरची परिस्थिती पाहून वाटत नाही की परिस्थिती ठिक नाहीये, सगळं ठीक आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  मी कुणाचेया बाजूने निर्णय देत नाही, योग्य तो निर्णय अध्यक्ष म्हणून देतो, असंती ते म्हणाले.

  • 04 Jul 2022 09:01 AM (IST)

    विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदेकडे दिसलं स्पष्ट बहुतम! आज फक्त औपचारीकता

    CM Eknath Shinde floor test LIVE Update : एकनाथ शिंदेंसोबतचे बंडखोर आमदार आणि भाजपचे आमदार, तसंच इतर छोटे पक्ष आणि अपक्ष असे मिळून बहुमत मिळवण्यात विधानसभा अध्यक्षांच्या निवडीत शिंदेंना यश आलं होतं. नेमकं या निवडणुकीत कुणी कुणाला मतदान केलं होतं, ते जाणून घ्या..

    पाहा व्हिडीओ

  • 04 Jul 2022 08:55 AM (IST)

    सहा महिन्यांनी मध्यावधी निवडणुका लागणार? पवारांच्या भाकितावर काय म्हणाले केसरकर?

    गुजरात आणि महाराष्ट्राच्या निवडणुका एकत्र लागू शकतात, अशी शक्यता शरद पवारांनी वर्तवली आहे. वर्षाच्या अखेरीस गुजरातचया निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आताच राजकीय भूकंप झाला. महाविकास आघाडी सरकार पडलं. त्यानंतर बंडखोर शिवसेना आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केलंय. या नाट्यमय घडामोडीत आता हे नवं सरकार किती दिवस टिकणार यावरुन तर्क वितर्क लढवले जात आहेत. त्यावर शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलंय. नेमकं ते काय म्हणालेत?

    पाहा व्हिडीओ :

  • 04 Jul 2022 08:48 AM (IST)

    CM Eknath Shinde floor test LIVE Update : संदीप देशपांडे यांचा ठाकरेंवर निशाणा

    ट्वीट करत संदीप देशपांडे यांचा आदित्य आणि उद्धव ठाकरे पितापुत्रांना टोला

    व्यंगचित्र पोस्ट करत संदीप देशपांडेंचा फुटलेल्या शिवसेनेवरुन हल्लाबोल

    पाहा ट्वीट :

  • 04 Jul 2022 08:40 AM (IST)

    CM Eknath Shinde floor test LIVE Update : आज बहुमत चाचणी! मंत्रिमंडळ विस्तार कधी?

    आज शिंदे-फडणवीस सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करायचं आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय मिळवलाय. पण आज त्यांची खरी कसोटी लागणार आहे. सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरु होणार आहे. दरम्यान, विश्वासदर्शक ठराव आपण बहुमतापेक्षा जास्त आकड्यानं जिंकणार’ असा विश्वास एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. बहुमत चाचणीनंतर सगळ्यांची नजर ही मंत्रिमंडळ विस्ताराकडे असणार आहे. त्यासाठी आतापासून लॉबिंगला सुरुवात झाली आहे.

    वाचा खास रिपोर्ट : जळगावचा पॉवरफुल्ल नेता कोण? गुलाबराव पाटील की महाजन, कुणाला मिळणार मंत्रिपद?

  • 04 Jul 2022 08:08 AM (IST)

    CM Eknath Shinde floor test LIVE Update : शिंदे गट’नेते’, ठाकरेंना धक्का!

    एकनाथ शिदेंनाच गटनेते पदासाठी सचिवालयानेच मान्यता दिल्याने सेनेसमोर आता नेमका काय प्रश्न निर्माण झालाय, ते पाहूया

    एकनाथ शिंदे शिवसेनेच्या गटनेतेपदी कायम, भरत गोगावलेंची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती

    • प्रतोद भरत गोगावले यांचा व्हिप शिवसेनेच्या सर्व 55 आमदारांना लागू असेल
    • सेनेच्या 16 आमदारांनी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत व्हीपचं उल्लंघन केल्याचा शिंदे गटाचा दावा
    • 16 आमदारांनी व्हीपचं उल्लंघन केल्यानं त्यांचं सदस्यत्व धोक्यात येण्याची शक्यता
    • गटनेतेपद देखील रद्द केल्यानं आमदार अजय चौधरी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार
    • विधीमंडळ सचिवालयाला नियुक्ती रद्द करण्याचा अधिकार नाही, शिवसेनेचा दावा
    • शिवसेना आणि शिंदे गटातील कायदेशीर लढाई आणखी तीव्र होण्याची शक्यता
  • 04 Jul 2022 08:06 AM (IST)

    गटनेते पदाची मान्यता काढल्यानंतर काय म्हणाले शिवसेनेचे अजय चौधरी?

    Ajay Chaoudhari : गटनेते पदावरुन महाराष्ट्रात राजकारण तापलं, एकनाथ शिंदेच गटनेते असल्याचा सचिवालयाचा निर्णय, सचिवालयाच्या निर्णयावर अजय चौधरींची पहिली प्रतिक्रिया –

    सचिवालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही, सचिवालयाला गटनेते पदाची मान्यता रद्द करण्याचा अधिकार नाही, शिवसेनेची लढाई सुप्रीम कोर्टात सुरू राहणार, असं शिवसेनेच्या अजय चौधरींनी म्हटलंय.

    एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरुन हकालपट्टी केली होती. त्यानंतर त्यांनी तत्काळ अजय चौधरी यांची गटनेचेपदी निवड केली होती.

  • 04 Jul 2022 08:04 AM (IST)

    CM Eknath Shinde floor test LIVE Update : आजच्या महत्त्वाच्या 3 मोठ्या राजकीय घडामोडी

    महत्त्वाच्या तीन मोठ्या राजकीय घडामोडी :

    • उद्धव ठाकरेंना मोठा धक्का… एकनाथ शिंदेच गटनेते असल्याचं विधीमंडळ सचिवालयाकडून पत्र
    • शिंदे सरकारची आज बहुमत चाचणी.. ‘विश्वासदर्शक ठराव आपण बहुमतापेक्षा जास्त आकड्यानं जिंकणार’ मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
    • तर राष्ट्रवादी आमदारांच्या बैठकीत शरद पवारांनी 6 महिन्यात मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिलेत
  • 04 Jul 2022 07:35 AM (IST)

    CM Eknath Shinde floor test : आज फक्त औपचारीकता! काय होणार विधानसभेत?

    CM Eknath Shinde floor test LIVE Update : विधान सभेच्या विशेष अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी घडलेल्या घडामोडींची तीव्र पडसाद अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि अखेरच्या दिवशी उमटण्याची दाट शक्यता आहे. आज बहुमत चाचणीही होणार आहे. आता महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे गट विरुद्ध शिवसेना ही लढाई कोर्टात गेली आहे. नेमकं आज कोणकोणत्या घडामोडी महत्त्वाच्या असणार आहेत, त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समीर भिसे यांनी…

    पाहा व्हिडीओ :

  • 04 Jul 2022 07:24 AM (IST)

    Shiv sena News : बंडखोरीनंतर शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची बैठक

    CM Eknath Shinde floor test LIVE Update : आज शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांची दुपारी 12 वाजता सेना भवनमध्ये बैठक होणार आहे. तर संध्याकाळी 7 वाजता मुंबईतील विभागवार पदाधिकाऱ्यांची बैठक मातोश्रीवर होणार आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर या बैठकींचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

  • 04 Jul 2022 07:14 AM (IST)

    CM Eknath Shinde floor test LIVE Update : बहुमत चाचणी म्हणजे काय?

    What is Floor Test : फ्लोअर टेस्ट म्हणजेच बहुमत चाचणीद्वारे विद्यमान सरकारकडे बहुमताचा आकडा आहे की नाही हे ठरवतात. निवडून आलेले लोकप्रतिनिधी आपल्या मताद्वारे सरकारचं भवितव्य ठरवलं जातं. राज्यात विधानसभेत बहुमत चाचणी होते. केंद्र सरकारची बहुमत चाचणी लोकसभेत होते. बहुमत चाचणी ही पारदर्शक प्रक्रिया आहे. त्यात राज्यपालांचा हस्तक्षेप नसतो. विधानसभेत आमदारांना व्यक्तिश: उपस्थित राहावे लागते. तसेच सर्वांच्या समोर मतदान करावं लागतं. त्यांनी विधानसभेत उपस्थित राहावे म्हणून पक्षाचा व्हीप काढला जातो.

    बहुमत चाचणी कुणाकडून केली जाते?

    बहुमत चाचणीत राज्यपालांचा कोणताही राजकीय हस्तक्षेप नसतो. बहुमत चाचणी घेण्याचा राज्यपाल केवळ आदेश देतात. ही बहुमत चाचणी पार पाडण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांची असते. विधानसभा अध्यक्ष नसतील तर प्रोटेम स्पीकर नियुक्त केला जातो. प्रोटेम स्पीकर हा हंगामी विधानसभा अध्यक्ष असतो. तोच निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला गोपनियतेची शपथ देत असतो.

    व्हीप म्हणजे नेमकं काय?

    व्हीप म्हणजे पक्षादेश असतो. व्हीप पाळणं आमदारांना बंधनकारक असतं. व्हीप काढण्यात आला तरी मतदान करायचं की नाही हा निर्णय आमदारांचा असतो. पण पक्षाच्या आदेशानुसार मतदान केलं नाही तर व्हीपचं उल्लंघन केलं म्हणून आमदारांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते.

  • 04 Jul 2022 07:11 AM (IST)

    CM Eknath Shinde floor test LIVE Update : काय आहे बहुमत चाचणीचं गणित?

    Maharashtra Assembly Special Session : विधानसभेचं सध्याचं समीकरण नेमकं कसं आहे, ते जाणून घ्या..

    विधानसभेचे एकूण सदस्य- 288

    • दिवंगत सदस्य- 01
    • तुरुंगातील सदस्या- 02
    • सध्याची सदस्य संख्या- 285
    • बहुमताचा आकडा- 143
    • भाजप- 106
    • शिंदे-सेना- 39
    • शिवसेना- 16
    • राष्ट्रवादी- 51
    • काँग्रेस- 44
  • 04 Jul 2022 07:09 AM (IST)

    CM Eknath Shinde floor test LIVE Update : बहुमत चाचणीच्या पूर्वसंध्येला बैठकसत्र

    बहुमत चाचणीच्या पूर्वसंध्येला भाजप आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह एकनाथ शिंदे यांनी आमदारांना मार्गदर्शन केलं. ताज प्रेसिडंट हॉटेलमध्ये यावेळी आमदारांची बैठक पार पडली.

    एकनाथ शिंदे आणि फडणवीसांची रणनिती :

  • 04 Jul 2022 07:00 AM (IST)

    Saamana : ..तर भारतमाता त्यांना माफ करणार नाही!

    Saamana Editorial : सामना अग्रलेखातून एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीवर निशाणा साधण्यात आला आहे. शिवरायांच्या साक्षीने बाळासाहेब ठाकरे यांच्या शपथा घेऊन पाप कुणी करत असेल तर भारतमाता त्यांना माफ करणार नाही, असं म्हटलंय. काळ मोठा कठीण आला आहे हे खरे, पण हा काळाकुट्ट काळही निघून जाईल, असा विश्वास शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून व्यक्त करण्यात आलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यापासून महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, असाही टोला या अग्रलेखातून लगावण्यात आलेला आहे.

  • 04 Jul 2022 06:52 AM (IST)

    CM Eknath Shinde floor test LIVE Update : शिंदे सरकार सहा महिन्यात कोसळणार?

    गुजरात आणि महाराष्ट्राच्या निवडणुका एकत्रच होऊ शकतात, असं म्हणत एकनाथ शिंदे सरकारवर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी महत्त्वाचं भाकीत वर्तवलं आहे. शिंदे सरकार सहा महिन्यात कोसळू शकतं, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह आमदारांची या बैठकीला हजेरी होती. सध्याचं राजकीय वातावरण पाहता शरद पवारांनी वर्तवलेला अंदाज किती खरा ठरतो, यावरुन तर्क वितर्कांना उधाण आलंय.

    वाचा शरद पवारांनी वर्तवलेल्या भाकिताची इनसाईड स्टोरी :  शरद पवारांनी दिले मध्यावधी निवडणुकीचे संकेत, राष्ट्रवादीच्या बैठकीत काय झालं?

  • 04 Jul 2022 06:48 AM (IST)

    CM Eknath Shinde floor test LIVE Update : एकनाथ शिंदे यांच्याकडे नेमके किती आमदार?

    CM Eknath Shinde floor test : एकनाथ शिंदे यांच्याकडे एकूण 39 बंडखोर शिवसेना आमदारांचा पाठिंबा आहे. तसंच भाजपच्या 106 आमदारांसह इतर छोटे पक्ष आणि अपक्षही एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आहेत. बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या विरोधानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षच भाजपसोबत युती करत असल्याचा दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांचा गट आणि भाजप यांचं संख्याबळ बहुमताच्या म्हणजेच 145च्या संख्येपक्षा जास्त असल्याचं विधानसभा अध्यक्ष निवडणुकीतच रविवारी समोर आलेलं होतं.

  • 04 Jul 2022 06:41 AM (IST)

    CM Eknath Shinde floor test LIVE Update : उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का

    एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसलाय. अजय चौधरी यांची केलेली शिवसेनेच्या गटनेते पद नेमणुकीची मान्यताच रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे हेच गटनेते असल्याचंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आता एकनाथ शिंदे गटाकडून जारी होणारा व्हीपच शिवसेनेच्या सर्व आमदारांना पाळावा लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेचे 16 उर्वरीत आमदार नेमकी काय भूमिका आज सभागृहात घेणार, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

    वाचा सविस्तर रिपोर्ट : एकनाथ शिंदेच गटनेते, चौधरींची मान्यता रद्द, तर गोगावलेच प्रतोद, विधीमंडळाचा मोठा निर्णय

  • 04 Jul 2022 06:35 AM (IST)

    CM Eknath Shinde floor test LIVE Update : आज बहुमत चाचणी! एकनाथ शिंदे यांची अग्निपरीक्षा

    एकनाथ शिंदे यांना आज विधानसभेत बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार आहे. सकाळी 11 वाजता विधानसभेतील सभागृहाचं कामकाज सुरु होईल. आज दिवस महाराष्ट्रातीला राजकारणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जातोय. शिवसेनेतील आमदारांना फोडून आपल्यासोबत घेत, आपण शिवसेना आहोत असा दावा केलेल्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद भाजपकडून देण्यात आलं. त्यानंतर आता त्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.

Published On - Jul 04,2022 6:32 AM

Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.