सर्व आमदारांचं एकत्र फोटोसेशन, फडणवीसांची दांडी, नाना पटोले म्हणाले, आमदारांची झोप झाली नसेल!

 हिवाळी अधिवेशनादरम्यान आज सर्वपक्षीय आमदारांचं एकत्र फोटोसेशन (All MLAs Photo session) झालं. विधानभवनाच्या बाहेर सर्वपक्षीय आमदारांनी या फोटोसेशनला हजेरी लावली.

सर्व आमदारांचं एकत्र फोटोसेशन, फडणवीसांची दांडी, नाना पटोले म्हणाले, आमदारांची झोप झाली नसेल!
Follow us
| Updated on: Dec 20, 2019 | 12:09 PM

नागपूर :  हिवाळी अधिवेशनादरम्यान आज सर्वपक्षीय आमदारांचं एकत्र फोटोसेशन (All MLAs Photo session) झालं. विधानभवनाच्या बाहेर सर्वपक्षीय आमदारांनी या फोटोसेशनला हजेरी लावली. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरला. सर्वपक्षाचे सर्व आमदार उपस्थित असताना, देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थित राहणं अपेक्षित होतं, मात्र ते फोटोसेशनला (All MLAs Photo session) आलेच नाहीत. याशिवाय देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू असलेले भाजप आमदार आशिष शेलारही फोटोसेशनला न थांबता परतले. कदाचित देवेंद्र फडणवीसांची अनुपस्थिती पाहून ते निघून गेले असावेत अशी चर्चा विधानभवनाबाहेर सुरु होती.

विधानसभा सदस्यांना फोटोसेशनसाठी सूचना दिली होती, पण काही सदस्यांची कदाचित झोपच उघडली नसेल,  झोपेतून उठले नसतील म्हणून काही आमदार आले नाहीत, असं म्हणत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी फोटोसेशनसाठी अनुपस्थित आमदारांबाबत नाराजी व्यक्त केली.

आशिष शेलार फोटोसेशन अर्धवट सोडून गेले

दरम्यान, भाजप आमदार आशिष शेलार हे फोटोसेशनसाठी आले होते, मात्र ते मधूनच निघून गेले. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री वेळेत आले नाहीत, असं म्हणत शेलार निघून गेले.

विधानसभेत औचित्याचा मुद्दा

दरम्यान सभागृहात काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत, आज फोटोसेशनला सर्वांसोबत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले असते तर बरं झालं असतं असं मत व्यक्त केलं.

फोटोसेशनला कोण कोण अनुपस्थित?

दरम्यान या फोटोसेशनला भाजपचे महत्त्वाचे नेते अनुपस्थित होते. यामध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार यासह फडणवीसांचे निकटवर्तीय नेते या फोटोसेशनला आले नाहीत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.