मुंबई: आज पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे (Maharashtra Assembly Monsoon Session Live) . गेले चार दिवस वादळी ठरले आहेत. विविध प्रश्न उपस्थित करून विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांना तोडीसतोड प्रत्युत्तर देण्यात आले. चौथ्या दिवशी (Assembly Monsoon Session Live) मुंबईतील खड्डे आणि ट्राफिकचा प्रश्न चांगलाच गाजला. गेले चार दिवस विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसत आहेत. सरकारविरोधात जोरदार घोषणबाजी करण्यात येते आहे. सध्या शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रश्न देखील चांगलाच तापला आहे. या सर्व पार्श्वभूमीर आजचा पाचवा दिवस (Monsoon Session Live) देखील वादळी ठरण्याची शक्यता आहे. आज राज्यातील विविध प्रश्नांवर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. कारण आता अधिवेशनाचे केवळ दोनच दिवस शिल्लक आहेत.