Monsoon Session Live : आज पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस (Monsoon Session Live Updates) आहे. तीन दिवसांच्या सुट्यानंतर आज पुन्हा एकदा पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session Live) सुरुवात झाली आहे. त्यापूर्वीचे दोन दिवस वादळी ठरले आहेत. विविध मागण्यांवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. विरोधकांकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षांनी देखील विरोधकांच्या प्रश्नाला तोडीस तोड उत्तर दिले. आज आधिवेशनाचा तिसरा दिवस आहे (maharashtra monsoon session 2022 Live). सभागृहात आज अनेक महत्त्वांच्या प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. विरोधक आज देखील सत्ताधाऱ्यांना विविध प्रश्न उपस्थित करत धारेवर धरण्याची शक्यता आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा आज सभागृहात पुन्हा एकदा गाजू शकतो. जाणून घेऊयात पावसाळी अधिवेशनाची प्रत्येक अपडेट
एकनाथराव शिंदे, तुम्ही नाव शिवसेनेचं घेताय आणि सर्व निर्णय व कार्यक्रम भाजपचे राबवताय. गेल्या दीड दोन महिन्यातील असा एक निर्णय दाखवा, असा एक निर्णय दाखवा जो तुम्ही तुमच्या स्वत:च्या मनाने घेतलाय. तुम्हीच घेतलेले सर्व निर्णय ते तुमच्याकडून बदलून घेत आहेत, असा टोला भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदेंना लगावलाय.
जनतेतून थेट सरंपच निवड विधेयक; छगन भुजबळ लाईव्ह
ठाकरे सरकारमध्ये असताना एकनाथ शिंदे यांनीच थेट सरपंच निवडीला विरोध केला – अजित पवार
जनतेतून थेट सरपंच निवडीचं विधेयक मुख्यमंत्र्यांनी मांडलं
जेतनेतून थेट सरपंच निवडीला विरोधकांचा विरोध