Rajan Salvi : आमदारांचं मतपरिवर्तन होईल, असा विश्वास पवारांना वाटत असेल तर मलाही विजयाची खात्री, राजन साळवींचं मोठं विधान
पुढे साळवी म्हणाले की, बंडखोर आमदारांनी जर मला मतदान केलं गेलं नाही तर आमदारांना निलंबनाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल. सभागृहात आमदारांचं मतपरिवर्तन होईल, असा विश्वास पवारांना वाटत असेल, तर मलाही खात्री वाटतं की आमचा विजय नक्कीच होईल. शिवसेनेतून 39 आमदार फुटले असले तरी त्यांच्या गटाला अद्याप अधिकृत मान्यता मिळालेली नाही.
मुंबई : राज्यात विशेष अधिवेशन आजपासून सुरू होत असून हे मुंबईत (Mumbai) पार पडणार आहे. आज विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी (Election) शिवसेनेकडून व्हीप लागू करण्यात आले आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रतोद असलेल्या सुनील शिंदे यांनी एक व्हीप काढून शिवसेनेच्या सर्व आमदारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी (Rajan Salvi) यांना मतदान करण्याचा व्हीप काढलायं. एकनाथ शिंदे गटाकडून प्रतोद भारत गोगावले शिंदे आणि फडणवीस सरकारचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान करावे, असे सांगण्यात आले. यावर आता महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनी मोठे विधान केले आहे.
राजन साळवी यांचे अत्यंत मोठे विधान
राजन साळवी tv9 ला बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडीने मला उमेदवारी दिली आहे. शिवसेनेचे सगळेच आमदार मला मतदान करणार आहेत. शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदारही मला मतदान करतील आणि मला निवडून आणतील हा मला विश्वास आहे. शिवसेनेचाच व्हीप सर्व सेना आमदारांसाठी बंधनकारक असणार आहे. शिवसेनेसोबतच माझ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसहीसोबत आहे, मी जिंकेन याची मला पूर्ण खात्री आहे. शिवसेनेच्या व्हीपनुसार बंडखोर आमदारांना मलाच मतदान करावे लागणार आहे.
तर…शिवसेना आमदारांवर होणार कारवाई
पुढे साळवी म्हणाले की, बंडखोर आमदारांनी जर मला मतदान केलं गेलं नाही तर आमदारांना निलंबनाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल. सभागृहात आमदारांचं मतपरिवर्तन होईल, असा विश्वास पवारांना वाटत असेल, तर मलाही खात्री वाटतं की आमचा विजय नक्कीच होईल. शिवसेनेतून 39 आमदार फुटले असले तरी त्यांच्या गटाला अद्याप अधिकृत मान्यता मिळालेली नाही. एकनाथ शिंदे ज्यादिवशी सूरता गेले तेंव्हाच त्यांचे विधिमंडळ गटनेते पद काढून घेण्यात आले होते. यामुळे आता विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीमध्ये नेमके काय होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार नेमकी काय भूमिका घेतात, हे बघण्यासारखे आहे.