Maharashtra assembly speaker election result Live: एकनाथ शिंदे हेच गटनेते, विधिमंडळाचा निर्णय, उद्धव ठाकरेंना धक्का

| Updated on: Jul 04, 2022 | 6:36 AM

Maharashtra assembly speaker election result Live updates : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीनं आपल्या उमेदवारांची नावं घोषित केली आहेत. भाजपाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक विधान परिषद आणि राज्यसभेप्रमाणे चुरशीची ठरणार आहे. आज ही निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीचे प्रत्येक अपडेट जाणून घ्या...

Maharashtra assembly speaker election result Live: एकनाथ शिंदे हेच गटनेते, विधिमंडळाचा निर्णय, उद्धव ठाकरेंना धक्का
विधानसभा विशेष अधिवेशन | LIVE UPDATEImage Credit source: TV9 Marathi

मुंबई : आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होतेय. यासाठी ठाकरे समर्थक आणि शिंदे समर्थक यांच्यात संघर्ष होण्याची शक्यताय. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीनं आपल्या उमेदवारांची नावं घोषित केली आहेत. भाजपाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक विधान परिषद आणि राज्यसभेप्रमाणे चुरशीची ठरणार आहे. आज ही निवडणूक पार पडणार आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 03 Jul 2022 10:58 PM (IST)

    शिवसेनेचा रडीचा डाव, कोणत्या घटनेबद्दल बोलतायेत, दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया

    मुंबई- शिवसेना नेते कुठल्या संविधानाबद्दल बोलतायेत, माहित नाही. पक्षाच्या घटनेला ते घटना मानत असतील तर तसे नाही. याबाबत आम्ही जो अर्ज विधिमंडळाला अर्ज केला होता. त्याला विधिमंडळ सचिवालयाने उत्तर दिले आहे. त्याला विधानसभा सचिवांनी उत्तर देत एकनाथ शिंदे हेच गटनेते आहेत आणि भरत गोगावले हे प्रतोद आहेत, यावर शिक्कामोर्तब केले आहे. कोर्टही एका विशिष्ठ मर्यादापलिकडे विधिमंडळ कामकाजात हस्तक्षेप करु शकत नाही, असे शिंदे समर्थक आमदारांचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिलीय. त्यांना काय वाटतं त्यापेक्षा कायदा श्रेष्ठ आहे, असेही ते म्हणाले आहेत. लोकशाहीत आकड्यांना महत्त्व असतं, ते आकडे ज्यांच्याकडे असतात, तेच योग्य असते. असेही ते म्हणाले.

  • 03 Jul 2022 10:53 PM (IST)

    अखेरच्या क्षणापर्यंत कायदेशीर लढा देऊ – अजय चौधरी

    मुंबई – विधानसभा उपाध्यक्षांनी शिवसेनेच्या गटनेतेपदी आपल्या नावाला  मंजुरी दिली होती. याबाबत शिवसेनेची अधिकृत बैठक झाली होती. गटनेते ठरवण्याचा अधिकार हा विधीमंडळाला कसा, असा प्रश्न अजय चौधरी यांनी उपस्थित केला आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे, त्यामुळे याचा निर्णय तिथेच होईल, असे चौधरी यांनी सांगितले आहे. अखेरच्या क्षणापर्यंत याविरोधात न्यायायलीन लढा देऊ, असे चौधरी यांनी सांगितले आहे.

  • 03 Jul 2022 10:47 PM (IST)

    संविधानाची खिल्ली उडवण्याचा प्रकार, विधिमंडळ निर्णयाविरोधात कोर्टात जाणार -अरविंद सावंत

    मुंबई – हा तर संविधानाची खिल्ली उडवण्याचा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे. गटनेता नेमण्याचा अधिकार हा पक्षप्रमुखाला असतो. ही कारवाी बेकायदेशीर असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. या विरोधात कोर्टात आव्हान देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. संविधानाला पायदळी तुडवून हा निर्णय घेण्यात आल्याची संतप्त प्रतिक्रिया अरविंद सावंत यटांनी दिली आहे. देशाची वाटचाल ही हुकुमशाही कडे जात असल्याचे हे उदाहरण आहे,  अशी प्रतिक्रिया सावंत यांनी दिली आहे.

  • 03 Jul 2022 10:43 PM (IST)

    एकनाथ शिंदे हेच गटनेते, विधिमंडळाचा निर्णय, उद्धव ठाकरेंना धक्का

    मुंबई- एकनाथ शिंदे हेच विधीमंडळ गटनेते आहेत, यावर विधिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे अजय चौधरी यांचे गटनेतेपद रद्द करण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानण्यात येतो आहे. काही वेळापूर्वीच हा निर्णय पारित करण्यात आला आहे. विधिमंडळ सचिवालयानं याला मान्यता दिली आहे.  शिंदे यांच्या गटनेतेपदाला मान्यता दिली असल्यामुळे आता भर गोगावले हेच मुख्य प्रतोद असल्याचे मान्य करण्यात आले आहे.

  • 03 Jul 2022 10:19 PM (IST)

    भाजपा कोअर कमिटीची उद्या संध्याकाळी बैठक

    मुंबई- एकनाथ शिंदे सरकारचे विश्वासमत उद्या सिद्ध झाल्यानंतर संध्याकाळी खातेवाटपाबाबत महत्त्वाची बैठक होणार आहे. उद्या संध्याकाळी सात वाजता भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. तसेच एकनाथ शिंदे आणि पियुष गोयल यांच्यातही चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

  • 03 Jul 2022 09:01 PM (IST)

    विश्वासदर्शक प्रस्ताव बहुमताने जिंकणार – एकनाथ शिंदेंना विश्वास

    एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी आमदारांना उद्याचा प्लॅन समजावला आहे. तसेच बहुमत चाचणी आपणच जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. शिंदे समर्थक आणि भाजपा आमदारांच्या बैठकीत हा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला आहे. उद्यापासून सर्व आमदारांना मतदारसंघात जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच या आमदारांना वाय सुरक्षा असेल. त्यामुळे मतदारसंघातही त्यांना समस्या उद्भवणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

  • 03 Jul 2022 08:21 PM (IST)

    अजित पवार विरोधी पक्षनेते होण्यास अनुत्सुक, सूत्रांची माहिती

    मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक सध्या मुंबईत सुरु आहे. या बैठकीत विरोधी पक्षनेते पद अजित पवार यांनी घ्यावे, यासाठी सगळ्यांचा आग्रह असल्याचे मानले जात आहेत. मात्र अजित पवार यासाठी तयार नसल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक होते आहे. थोड्याच वेळात पत्रकार परिषद होईल, त्यात घोषणा होण्याची शक्यता आहे.

  • 03 Jul 2022 07:59 PM (IST)

    शिवसेनेचे चार खासदार फडणवीसांना भेटले

    मुंबई- शिवसेनेचे चार खासदार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटल्याची माहिती टीव्ही9 ला सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेसोबत युती करा, अशी मागणी या चार खासदारांनी केली आहे. यामुळे शिवसेनेचे खासदार हे फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते आहे. आता एकनाथ शिंदे गट राज्यात भाजपासोबत गेल्यानंतर आता केंद्रातही शिवसेनेने सत्तेत सहभागी व्हायला हवे, अशी खासदारांची भूमिका आहे. उद्धव ठाकरेंनी आता याबाबत निर्णय घ्यायला हवा, अशी शिवसेनेच्या काही खासदारांची भूमिका आहे.

  • 03 Jul 2022 07:58 PM (IST)

    शिंदे समर्थक आणि भाजपा आमदारांच्या बैठकीला सुरुवात

    मुंबई– विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर आता उद्या बहुमत चाचणी सभागृहात होणार आहे. त्यासाठी ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये शिंदे समर्थक आमदार आणि भाजपा आमदारांची एकत्र बैठक सुरु झाली आहे.  या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित आहेत.

  • 03 Jul 2022 07:24 PM (IST)

    राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत पंकजा मुंडेंना स्थान मिळेल-सुरेश धस

    मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या सरकारतर्फे राज्यपालनियुक्त 12 आमदारांची नवी नावे देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या यादीत पंकजा मुंडे यांनाही स्थान मिळेल, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे भाजपाचे नेते सुरेश धस यांनी म्हटले आहे. पक्षात निर्णय होत असतात, असेही त्यांनी म्हटले आहे.

  • 03 Jul 2022 06:59 PM (IST)

    गोव्याच्या हॉटेलमध्ये हेरगिरी करणारे राष्ट्रवादीचे पदाधिकारी

    पणजी– शिंदे गटाच्या आमदारांचं वास्तव्य असलेल्या गोव्यातील ताज कन्व्हेन्शन हॉटेलमध्ये ओळख लपवून राहणाऱ्या दोघांना पणजी पोलिसांनी अटक केली होती.  सोनिया दोहन आणि श्रेयस कोतियाल अशी या दोघांची नाव आहेत. विशेष म्हणजे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत. हेरगिरी करत असल्याच्या संशयावरून पणजी पोलिसांनी दोघांवर कारवाई केली होती. दरम्यान आज न्यायालयाने प्रत्येकी 20 हजारांच्या जातमुचलक्यावर सोनिया दोहन आणि श्रेय कोथियाल या दोघांचीही जामिनावर मुक्तता केलीय.

  • 03 Jul 2022 06:48 PM (IST)

    39 आमदारांविरोधात नव्या विधानसभा अध्यक्षांकडे शिवसेनेची याचिका – अरविंद सावंत

    मुंबई- शिवसेनेच्या 39 आमदारांनी व्हीपविरोधात मतदान केले. त्यासाठी नव्या विधानसभा अध्यक्षांकडे याचिका केली आहे. या आमदारांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. मान्यता असलेल्या पक्षाचे आदेशच चालतात, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना या पक्षालाच मान्यता आहे, असे अरविंद सावंत यांनी सांगितले आहे. शिंदे गटाचे अस्तित्व काय, त्यांना मान्यता आहे का, असा प्रश्न अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे. पक्षाचे प्रमुख हे गटनेत्यांची निवड करतात. कायद्यानुसार शिंदेंना गटनेते म्हणून मान्यता नाही.

  • 03 Jul 2022 06:41 PM (IST)

    नवी मुंबईतील शिवसैनिक पाठिंब्यासाठी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला

    मुंबई- नवी मुंबईतील शिवसैनिकानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. शिवसेनेमध्ये  बंडाळी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरताना दिसतायेत. आज त्याचाच प्रत्यय मातोश्रीवरही पाहायला मिळाला.  नवी मुंबईतील शिवसैनिक मातोश्रीवर आले आणि त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत पाठिंबा दर्शवला आहे.

  • 03 Jul 2022 06:34 PM (IST)

    शिंदे समर्थक-भाजपा आमदारांची थोड्याच वेळात एकत्र बैठक

    मुंबई– विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर आता उद्या बहुमत चाचणी सभागृहात उद्या होणार आहे. त्यासाठी थोड्याच वेळा ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये शिंदे समर्थक आमदार आणि भाजपा आमदारांची एकत्र बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदारांना संबोधित करणार असल्याची माहिती आहे.

  • 03 Jul 2022 06:24 PM (IST)

    पंतप्रधानांचा ड्रीम प्रोजेक्ट बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा

    मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात येत आहे. नवं सरकार मुंबई ते अहमाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला गती देणार असल्याची माहिती आहे. या साठीचा खर्च एकनाथ शिंदे सरकार करणार असल्याचीही माहिती आहे.

  • 03 Jul 2022 06:16 PM (IST)

    उद्याच्या बहुमत चाचणीत आमचाच विजय – गुलाबराव पाटील

    मुंबई- मतदारसंघातील लोकांना पहिल्यांदाच १५ ते २० दिवसांनी भेटतो आहे. ते माझ्या पाठिशी उभे आहेत, हा धीर आहे. मतदारसंघातील कामे आणि विकास याच्याकरता ध्यास घेतला आहे. तो पूर्ण करण्यासाठी त्यांचा पाठिंबा आहे. आज १६४ मते मिळाली. दोन जण अनुपस्थित होते. उद्या फक्त औपचारिक प्रक्रिया आहे. व्हीपबाबत कोर्टात निर्णय होईल. असे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे.

  • 03 Jul 2022 05:52 PM (IST)

    विरोधी पक्षनेत्यासंबंधात राष्ट्रवादीची थोड्याच वेळात बैठक

    मुंबई – उद्याच्या बहुमत चाचणीबाबत राष्ट्रवादीची  बैठक मुंबईत वाय बी सेंटरमध्ये होते आहे. विरोधी पक्षनेत्याचा निर्णयही यात होणार आहे. अजित पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. शरद पवार हेही बैठकीला उपस्थित असणार आहेत.  अमरावतीच्या प्रकरणात जे सत्य आहे ते समोर आले आहे, ते दाबून ठेवण्याचा प्रयत्न झाला नव्हता, आता एनआयएचा तपास सुरु आहे, अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

  • 03 Jul 2022 05:02 PM (IST)

    मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांच्या अडचणी वाढणार, संजय पांडेंना ईडीची नोटीस

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता आहे. संजय पांडे यांना ईडीचे समन्स पाठवण्यात आले आहे. 5 जुलैला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जुन्या एका मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांना हे आदेश देण्यात आले आहेत. त्यांची मुंबई पोलीस आयुक्तपदाची कारकीर्द ही वादग्रस्त ठरली होती.

  • 03 Jul 2022 04:59 PM (IST)

    व्हीपबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील – देवेंद्र फडणवीस

    मुंबई – विधीमंडळातील नेता हा बहुमतानेच निवडता येतो. तो अल्पमताने निवडता येत नाही. अशा प्रकारची कारवाई कायद्याने ग्राह्य धरता येणार नाही.  त्या कारवाईच्या आधारावर व्हीप दिला असेल तर लागू होत नाही. बहुमत असलेल्यांनी कायद्याप्रमाणे ठराव केलाय तोच लागू होईल. मात्र याबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्ष करतील. त्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. त्यावर जास्त बोलता येणार नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.

  • 03 Jul 2022 04:55 PM (IST)

    गेल्या सरकारमधील कुहेतूने घेतलेले निर्णय रद्द करु – देवेंद्र फडणवीस

    मुंबई- मागच्या सरकारचे कुठलेही निर्णय हे सरसकट रद्द करणार नाही, किंवा त्यांची तपासणी करणार नाही. मात्र जे निर्णय चुकीचे आहेत, शंकेला वाव आहे, कुहेतूने घेतलेले असे निर्णय रद्द करु, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

  • 03 Jul 2022 04:50 PM (IST)

    आरेमधील कारशेडचा विरोध काही प्रमाणात स्पॉन्सर्ड – फडणवीस

    मुंबई- आरेमधील होणारा विरोध हा काही प्रमाणात स्पॉन्सर्ड आहे, पर्यावरणवाद्यांचा सन्मान करतो, त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. पण ग्रीन ट्रिब्युनलने परवानगी दिल्यानंतर जो प्रकल्प सुरु झाला. झाडे कापलेली आहेत. २५ टक्के प्रकल्प पूर्ण झाला. आता झआडे कापण्याची गरज नाही. आता जर काम सुरु केले तर वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण होऊ शकेल.

  • 03 Jul 2022 04:44 PM (IST)

    विश्वासमताचा प्रस्ताव बहुमताने जिंकू -देवेंद्र फडणवीस

    मुंबई- आमच्याकडे बहुमत आहे, विश्वासमताचा ठराव उद्या भक्कम मतांनी जिंकणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.  राहुल नार्वेकर यांची देशात सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. आमच्याकडे बहुमत आहे, हे सिद्ध झाले आहे. अमरावतीची घटना ही क्रूर आहे. याचा मास्टर माईंड आणि आरोपी पकडण्यात आले आहेत. याचे काही बाहेरचे कनेक्शन आहे का, हेही समोर येईल. यातील आणखी काही मुद्दे, समोर आणले जातील.

  • 03 Jul 2022 04:26 PM (IST)

    अभिनंदन प्रस्तावावर बोलण्याची संधी सुनील प्रभूंनाच, तेच शिवसेनेचे प्रतोद असल्याची ही मान्यता-भास्कर जाधव

    मुंबई – विधानसभा अध्यक्षांच्या अभिनंदनीय प्रस्तावावर शिवसेनेचे प्रतोद म्हणून विधानसभा अध्यक्षांनी बोलण्याची संधी सुनील प्रभू यांनाच दिली, ती भरत गोगावले यांना मिळाली नाही, याचाच अर्थ शिवसेनेचे मुख्य प्रतोद हे सुनील प्रभू हेच आहेत, हे अधोरेखित होते, असा युक्तिवाद भास्कर जाधव यांनी केला आहे. विद्यमान उपाध्यक्ष आणि विद्यमान अध्यक्ष अशा दोघांनी शिवसेनेचे पक्षप्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची निवड केली आहे, असेही ते म्हणाले. भरत गोगावले यांनी दिलेले पत्र आफ्टर थॉट असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.  हे पत्र लिहून आणा हे सभागृहात कुणी खुणावलं हे आपण स्वतः पाहिलं आहे, असेही भास्कर जाधव म्हणाले आहेत.  यावेळी त्यांनी राज्यपालांवरही टीका केली. काही दिवसांपूर्वी अस्तित्वात आलेल्या सरकारला  ताबडतोब अध्यक्षपदाची निवड करण्याची संधी राज्यपालांनी दिली. राज्यपाल महोदयांनी घटनेची बुज चांगल्या प्रकारे दाखवली, लोकशाहीचा मान राज्यपालांनी राखला नवीन आजची निवडणूक पार पडली, असा उपहासात्मक टोला भास्कर जाधव यांनी राज्यपालांना लगावलाय

  • 03 Jul 2022 04:00 PM (IST)

    राज्यावर दुबार पेरणीचं संकट, सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी- नाना पटोले

    मुंबई- राज्यात पावसानं दांडी मारल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. दुबार पेरणीचं संकट आहे. उद्या सभागृहात हा प्रश्न उपस्थित करणारआणि शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी सर्वे सुरु करा, अशी मागणी करणार असल्याचे  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारला मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

  • 03 Jul 2022 03:02 PM (IST)

    शिवसेनेच्या अघोषित 16 आमदारांवर कधीही कारवाई, प्रसाद लाड यांचे वक्तव्य

    मुंबई- शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या 16 आमदारांवर कधीही कारवाई होऊ शकते, असे भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. विधानसभा अध्यक्षांनी शिंदे यांच्या 39 जणांचा गट शिवसेनेचा असल्याच घोषित केले आहे. तर इतर 16 जण हे अघोषित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही कारवाई होऊ शकते असे प्रसाद लाड म्हणाले आहेत.

  • 03 Jul 2022 02:46 PM (IST)

    मुख्यमंत्री शिंदे समर्थक आमदार आणि भाजपा आमदारांची संध्याकाळी बैठक

    मुंबई- विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर आता उद्या बहुमत चाचणी सभागृहात उद्या होणार आहे. त्यापूर्वी आज संध्याकाळी ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये शिंदे समर्थक आमदार आणि भाजपा आमदारांची एकत्र बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदारांना संबोधित करणार असल्याची माहिती आहे.

  • 03 Jul 2022 02:36 PM (IST)

    राष्ट्रवादीच्या विरोधी पक्षनेत्याचे नाव संध्याकाळी ठरेल – जयंत पाटील

    मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्याची निवड आज संध्याकाळी शरद पवार यांच्या उपस्थितीत होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे. बंडखोर आमदारांवर कारवाई होईल, ती येत्या काही काळात होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

  • 03 Jul 2022 02:34 PM (IST)

    सगळे पेच सुटतील, विधानसभा अध्यक्षांचे सूचक वक्तव्य

    मुंबई- सगळे पेच सुटतील, असे सूचक वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. सभागृह संवैधानिक तरतुदींप्रमाणे आणि नियमांप्रमाणे चालते असेही त्यांनी म्हटले आहे.

  • 03 Jul 2022 02:32 PM (IST)

    शिवसेनेनं व्हीपबाबत उपाध्यक्षांना अध्यक्ष निवडीपूर्वी दिलेले पत्रच योग्य -सुनील प्रभू

    मुंबई – अजय चौधरी यांनी शिवसेनेचा व्हीप पाळला नाही, हे पत्र विदानसभा उपाध्यक्षांना दिलं, आणि एका ज्येष्ठ नेत्यानं हे लक्षात आणून दिलं हे महत्वाचं आहे, असे शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सांगितले. शिवसेनेच्या आमदारांनी व्हीप न पाळल्याने राजन साळवी यांचा पराभव झाल्याचे प्रभू यांनी सांगितले. ज्या विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर त्यांना शिंदे गटातून देण्यात आलेलं पत्र तांत्रिकदृष्ट्या चूक असल्याचे सुनील प्रभू यांनी सांगितले.

  • 03 Jul 2022 02:25 PM (IST)

    शिवसेनेचे खासदार फुटणार नाहीत- खासदार हेमंत पाटील

    नांदेड – आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे काही खासदार फुटणार असल्याची सध्या जोरात चर्चा सुरू आहे, मात्र हिंगोलीचे शिवसेनेचे  खासदार हेमंत पाटील यांनी ह्या चर्चात तथ्य नसल्याचा दावा केलाय. रात्रीच पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या खासदारांची बैठक घेतली त्या बैठकीला 16 खासदार उपस्थित होते अशी माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिलीय. नांदेडमध्ये बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मतदारसंघात आयोजित सेनेच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी  हेमंत पाटील बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतच असलेल्या  खासदार हेमंत पाटील यांनी या मेळाव्याला हजेरी लावत बंडखोरांचा समाचार घेतला. यावेळी  त्यांनी खासदार फुटीच्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत.

  • 03 Jul 2022 02:16 PM (IST)

    विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असेल- नाना पटोले

    मुंबई- शिवसेनेच्या व्हीपबाबत जो मुद्दा उपस्थइत झाला आहे, त्याच्यावर ११ जुलैला सुनावणी होणार आहे. त्यावेळी राज्यपालांच्या भूमिकेवरही चर्चा होईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. जो निर्णय विधानसभा उपाध्यक्षांच्या कक्षेतील होता, तो कोर्टात गेला असल्याचेही त्यांनी सांगितले. ११ जुलैला याचा कोर्टात निर्णय होईल, असेही नाना पटोले यांनी सांगितले. विरोधी गटात जो मोठा असेल त्याचा विरोधी पक्षनेता होईल, असे सांगत राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेतेपद जाईल, असे पटोले यांनी सांगितले.

  • 03 Jul 2022 02:12 PM (IST)

    एकाही बंडखोर आमदाराने डोळ्यात डोळे घालण्याची हिंमत केली नाही- आदित्य ठाकरे

    मुंबई- शिवसेनेच्या बंडखोर आमदारांपैकी एकाही आमदाराने डोळ्यात डोळे घालून बघण्याची हिंमत केली नाही, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. हे आमदार जेव्हा त्यांच्या मतदारसंघात जातील, तेव्हा काय करतील असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला. बंडखोर आमदारांवर जो कोट्यवधींचा खर्च केला, तो कुठून आला असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आमचा व्हीप पहिल्यांदा उपाध्यक्षांकडे दिला होता, त्यांनी तो मान्य केला आहे. आता याचा निर्णय कोर्टातच होईल. नैतिकतेच्या चाचणीत शिंदे बंडखोर नापास झाले आहेत, असे त्यांनी सांगितले.

  • 03 Jul 2022 02:09 PM (IST)

    विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 13 जण अनुपस्थित

    मुंबई- विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांना 164 मने मिळाली तर राजन साळवी यांना 107 मते मिळाली आहेत.

    कोणत्या 13 सदस्यांनी मतदान केले नाही, तर सपाचे दोन आमदार आणि एमआयएमचे एक आमदार तटस्थ राहिले.

    1. नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस (तुरुंगात)

    2. अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस (तुरुंगात)

    3. निलेश लंके, आमदार, राष्ट्रवादी

    4. दिलीप मोहिते, आमदार, राष्ट्रवादी

    5. दत्ता भरणे, आमदार, राष्ट्रवादी

    6. बबन शिंदे, आमदार, राष्ट्रवादी

    7. अण्णा बनसोडे, आमदार, राष्ट्रवादी

    8. लक्ष्मण जगताप, आमदार भाजपा (आजारी)

    9. मुक्ता टिळक, आमदार, भाजपा (आजारी)

    10. प्रणिती शिंदे, आमदार, काँग्रेस

    11. मुफ्ती इस्माईल , आमदार, एमआयएम

    12. रमेश लटके (दिवंगत)

    13. नरहरी झिरवळ ( उपाध्यक्ष मतदान करु शकत नाहीत)

  • 03 Jul 2022 02:00 PM (IST)

    तुम्ही जावयाची काळजी घ्या, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे आवाहन

    मुंबई- विधानसभा अध्यक्ष झालेल्या राहुल नार्वेकर हे विधानसभेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे जावई आहेत. या सासरे आणि जावई यांच्या नात्याबद्दल अनेकांच्या बोलण्यातून उल्लेख झाला. जावई आमच्याकडे लक्ष देतील असे वक्तव्य शुभेच्छा देताा अजित पवार आणि जयंत पाटील यांनी केले. शेवटी अभिनंदन प्रस्तावावर बोलताना आपणच जावयाची काळजी घ्या, असे आवाहन नवे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नेत्यांना केले आहे.

  • 03 Jul 2022 01:50 PM (IST)

    16 सेना आमदारांनी शिंदे गटाचा व्हीप न पाळ्याचंही विधानसभा अध्यक्षांनी रेकॉर्डवर घेतलं!

    Maharashtra assembly speaker election : शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून एक पत्र आलं असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं.

    शिवसेना विधीमंडळ प्रतोद यांच्या पत्राप्रमाणे शिवसेना विधीमंडळांच्या 16 सदस्यांची विरोधी मतदान केलं आहे, त्याची नोंद घेण्याची मागणी करण्यात आली. त्याप्रमाणे नोंद घेतल्याची माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली.

    भरत गोगावले यांची नेमणूक मुख्य प्रतोद म्हणून एकनाथ शिंदे यांनी केली होती. भरत गोगावले हे एकनाथ शिंदेच्या बंडखोर गटातील एक असून शिंदेंची गटनेते पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्यानंतर शिंदेंनी भरत गोगावलेंची मुख्य प्रतोद म्हणून नेमणूक केलेली होती.

  • 03 Jul 2022 01:40 PM (IST)

    Video : विधानसभा अध्यक्षांचं अभिनंदन करताना अजित पवारांची तुफान फटकेबाजी

    राहुल नार्वेकर यांच्यासह अजित पवार यांचा चंद्रकात पाटील, एकनाथ शिंदे, गिरीश महाजन यांच्यावरही जोरदार निशाणा,

    अजित पवारांच्या दिलखुलास भाषणाने सभागृहात एकच हशा, पाहा अजित पवारांचं सभागृहातील भाषण अनकट

    अजित पवारांची विधानसभेत तुफान फटकेबाजी :

  • 03 Jul 2022 01:35 PM (IST)

    Maharashtra assembly speaker election : दीपक केसरकरांचा सुनील प्रभू यांना अप्रत्यक्षपणे टोला

    Maharashtra assembly speaker election : आमचे आजचे अध्यक्ष पुढे जाऊन लोकसभेचेही अध्यक्ष होऊ शकतात, दीपक केसरकर यांनी राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन करताना जागवल्या सावंतवाडीच्या आठवणी, सावंतवाडी लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याच्याही दिल्या शुभेच्छा

    व्हीपबद्दल चर्चा करण्याचा आजचा दिवस नाही, दीपक केसरकरांचा अप्रत्यक्षपणे सुनील प्रभू यांना टोला

    आम्ही व्हीपवर आज बोलणार नाही, विधीमंडळ पक्ष म्हणून आम्हीही व्हीप काढलेला आहे, पण त्यावर आम्ही बोलणार नाही- दीपक केसरकर

  • 03 Jul 2022 01:32 PM (IST)

    फडणवीसांना अडीच वर्षांआधीच सांगितलेलं, आदित्य ठाकरेंचा टोला

    Maharashtra assembly speaker election : फडणवीसांना अडीच वर्षांआधीच सांगितलेलं, आदित्य ठाकरेंचा टोला, तेव्हा ऐकलं असतं तर आता परिस्थिती कदाचित पलटलेलीही असतील, अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना आदित्य ठाकरेंचं वक्तव्य

    सगळ्या अर्थांनी राहुल नार्वेकर यांचं वजन वाढलंय, आदित्य ठाकरेंचा टोला, आता कुलाब्याच्या घरी चालत जाऊ नका, नाहीतर मनावर घ्याल, आदित्य ठाकरेंचा टोला

    आता बच्चन साहेबांच्या भाषेत सांगायचं तर परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन यांचं पालन तुम्ही कराल, अशी आशा बाळगतो, असं आदित्य ठाकरेंनी राहुल नार्वेकरांबाबत बोलताना म्हटलंय.

    राजकारणाची पातळी खूप खाली चाललीये, हे तरुणांना न पटणारं आहे, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.

  • 03 Jul 2022 01:29 PM (IST)

    नाना पटोलेंकडून विधानसभा अध्यक्षांचं अभिनंदन

    Maharashtra assembly speaker election : सर्व छोट्या पक्षांना, आमदारांना आणि सदस्यांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळावी अशी इच्छा व्यक्त करताना नाना पटोलेंनी केलं विधानसभा अध्यक्षांचं अभिनंदन

  • 03 Jul 2022 01:27 PM (IST)

    यशोमती ठाकूर यांची भाजपवर खोचक टीका

    यशोमती ठाकूर यांचा भाजपवर टोला, आऊटसोर्स मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते असा कारभार असल्याची टीका

    यशोमती ठाकूर यांचा टोला :

  • 03 Jul 2022 01:23 PM (IST)

    Maharashtra assembly speaker election : सभागृहाची शिस्त वाढवली पाहिजे- जयंत पाटील

    Maharashtra assembly speaker election : जयंत पाटील यांच्याकडून राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, जागा सोडणे, समोरची भाषणं करताना मध्येमध्ये बोलणे, भाषणं करत असताना मध्येमध्ये बोलणे, याबाबतची शिस्त वाढवली पाहिजे, असंही त्यांनी म्हटलंय.

    वयाच्या 27 व्या वर्षी सभागृहात आलो, तेव्हा भाषण सुरु असताना अध्यक्ष उभे राहिलो की तिथेच उभे राहिलो, समज द्यावी, हा शब्द कदाचित कुणाला आवडणार नाही, हिरव्या कारपेटवर पाय ठेवून आपण आत येतो, तेव्हा शिस्तीचं पालन केलंच पाहिजे, असं ते म्हणालेत.

    भाषण करताना पूर्ण भाषण करुन देण्यासाठी पूर्ण भाषण करुन देण्यासाठी काय करायचं, यासाठी काहीतरी शिस्त पाळली गेली पाहिजे.

    जावई हे कुंडलीतलं दशम स्थान कसं चुकीचं आहे, हे कसं दाखवण्याची संधी देवेंद्रजी आपल्यासमोर आले. नार्वेकरसाहेब आम्हाला न्याय देतील, असा विश्वास आम्ही व्यक्त करतो, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय.

  • 03 Jul 2022 01:16 PM (IST)

    Sudhir Mungantiwar : अजित पवारांना सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

    Maharashtra assembly speaker election : राहुल नार्वेकरांना आदित्य ठाकरे गुरुदक्षिणा म्हणून उरलेले सदस्यही देऊ शकतात

    सुधीर मुनगंटीवार यांचा विधानसभा अध्यक्षांच्या अभिनंदन ठरावावेळी बोलताना टोला

    काँग्रेसलाही सुधीर मुनगंटीवार यांचा निशाणा

    अध्यक्षपदासाठी माझं नाव सुचवलं, याबाबत माझं नाव सुचवलं, याबद्दल आभार, सुधीर मुनगंटीवार यांचा अजित पवारांना टोला

    अजित पवारांवर सुधीर मुनगंटीवार यांचा पलटवार

    अजित पवार जयंत रावांच्या कानात काहीच सांगू नका, त्यांच्या कानात सांगणं धोकाय, सुधीर मुनगंटीवार यांचा निशाणा

    काही वाटलं तर आमच्या कानात सांगा, अजित पवारांना सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य

  • 03 Jul 2022 01:10 PM (IST)

    Bachchu Kadu : झेंडा सोडून अजेंडा हाती घ्यायला हवा- बच्चू कडू

    विकासासाठी झेंडा सोडून अजेंडा हाती घ्यावा लागेल- बच्चू कडू

    अपक्ष, छोट्या पक्षांना त्यांचा मुद्दा बोलण्याची संधी मिळाली पाहिजे- बच्चू कडू

    353 अजामीनपात्र केला असून तो जामीनपात्र करावा अशी मागणीही बच्चू कडू यांनी यावेळी केली.

  • 03 Jul 2022 01:08 PM (IST)

    बच्चू कडू यांच्या भाषणाआधी भास्कर जाधव यांचा आक्षेप

    अबू आझमी यांनी नमूद केलेल्या भाषणावर भास्कर जाधव यांचा आक्षेप

    मुस्लिम आणि हिंदू असा भेद नाही, असं भास्कर जाधव यांचं उत्तर

    अबू आझमींवर भास्कर जाधव यांची टीका

    अबू आझमींना मुस्लिम नाव काढल्याचा उल्लेख केल्यावरुन गदारोळ

    औरंगबादचं नाव संभाजीनगर केल्याच्या निर्णयामुळे अबू आझमींची महाविकास आघाडीवर टीका

  • 03 Jul 2022 01:01 PM (IST)

    विधानसभा अध्यक्षपद राज्यपालांनी अडवून धरलं होतं- अबू आझमी

    विधानसभा अध्यक्षपद राज्यपालांनी अडवून धरलं होतं

    हे पद बहुमतापेक्षाही घटनेनं चालणं जास्त चालणं गरजेचंय

    अबू आझमी यांची विधानसभेत महत्त्वाची भूमिका

    मोठे पक्ष आपली कामं बरोबर करवून घेतात, पण छोट्या पक्षांची अवस्था वाईट आहे- अबू आझमी

    आम्हाला बोलण्याची संधीही मिळत नाही, आम्ही बोलायला उभे राहिलो की दोन मिनिटांत घंटी वाजवली जाते- अबू आझमी

    आम्ही महाविकास आघाडीला समर्थन दिलं, याचं वाईट वाटतंय- अबू आझमी

    औरंगाबादचं नाव बदलून तुम्हाला काय संदेश द्यायचाय- अबू आझमी

    पुराने कोई शहर का नाम बदल देने से क्या होगा, नया कोई शहर बसाईए तो कोई बात हो, अबू आझमींचा टोला

    अबू आझमींचं भाषण सुरु असताना  अभिनंदन ठरावावर बोलण्याचं विधानसभा अध्यक्षांचं आवाहन

  • 03 Jul 2022 12:57 PM (IST)

    Maharashtra assembly speaker election : सुनिल प्रभूंनी शिवसेनेच्या वतीनं सभागृहात काय म्हटलं?

    Maharashtra assembly speaker election : तरुण अध्यक्ष म्हणून गौरव आहे, असं सुनील प्रभू यांनी म्हटलंय. सुनील प्रभू यांनी म्हटलंय की, आधी तुम्ही शिवसेनेत होतात, त्यानंतर तुम्ही राष्ट्रवादीत गेलात. नंतर भाजपात गेलात. कायदा समजून सांगण्याच्या प्रयत्नात तुम्ही होतात, तुम्ही कायदामंत्री व्हाल, असं वाटलं होतं. पण दुर्दैव आहे. नशिबाचे फेरे कधीही फिरू शकतात. नियती कुणावर कधीही आघात करु शकतो. ज्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहत होतो, त्यांनी उपमुख्यमंत्री पाहतोय. कायदामंत्री म्हणून पाहत होतो, त्यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून पाहतोय. आम्हाला देवेंद्रजींबद्दल दुःख वाटतंय, असं सुनील प्रभू म्हणाले.

    आमचा व्हीप झुगारून 39 सदस्यांनी आमचा व्हीप झुगारला आहे, हेही मला यानिमित्तानं नमूद करावंसं वाटतं. या लोकशाहीचा सन्मान आणि अभिमान म्हणून सर्वोच्च पदावर बसलात, यासाठी सगळ्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही याचा वापर कराल, असा विश्वास व्यक्त करतो. त्यामुळे किती दिवस तुम्ही या खूर्चीवर बसाल, हे दुर्दैवानंं मला नमूक करावंसं वाटतं, असंही त्यांनी म्हटलंय.

  • 03 Jul 2022 12:50 PM (IST)

    Maharashtra assembly speaker election : बाळासाहेब थोरात यांच्याकडून अभिनंदन प्रस्ताव

    Maharashtra assembly speaker election : शिवसेना, राष्ट्रवादी आणि आता भाजप असा प्रवास केलेल्या नार्वेकरांचे सगळ्यांशी जवळचे संबंध आहेत. तुम्ही काँग्रेसच का बाजूला ठेवली, हे काही कळलं नाही, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी अभिनंदन करताना म्हटलं. तुम्ही सगळ्यांना सांभाळून घ्याल, अशी खात्री मला वाटते, असंही ते म्हणालेत.

  • 03 Jul 2022 12:46 PM (IST)

    विश्वनाथ आनंदही अमित शाहांना घाबरला? भुजबळांचं खोचक विधान

    Chagan Bhujbal : मला एक मेसेज आल्याचं म्हणत छगन भुजबळ यांनी जोरदार टोला हाणला.

    विश्वनाथजी आनंद सगळ्यांना बुद्धिबळात हरवलं, तर त्यांना विचारलं की तुम्ही खेळाल का.. तर आनंद म्हणाले की मी आता खेळणार नाही, अमित शाह असा डाव टाकतात की कोणत्या सोंगट्या कुठे जातात, हे कळत नाही, असं म्हणत छगन भुजबळ यांनी टोला लगावलाय.

  • 03 Jul 2022 12:32 PM (IST)

    Maharashtra assembly speaker election : अजित पवारांकडून राहुल नार्वेकरांचं अभिनंदन

    Maharashtra assembly speaker election : महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून मी राष्ट्रवादीच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो, असं अजित पवार यांनी म्हटलंय. आतापर्यंत सर्व अध्यक्षांनी न्याय देण्याचं काम केलेलंय. राहुल नार्वेकरांकडून सगळ्यांना न्याय मिळेल आणि विकासाचं चाकं अधिक गतीमान होतील, असा विश्वास मी व्यक्त करतो, असं अजित पवार म्हणाले. दिग्गजांनी विधानसभेच्या अध्यक्षपदी काम केलंय. मधल्या काळात नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर नरहरी झिरवळ यांना प्रभारी अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांनीही या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, असंही अजित पवारांनी यावेळी नमूद केलंय.

    राजकीय जीवनात चढ उतार असतात, हे सगळ्यांनी पाहिलंय. कामकाज निःपक्षपणे चाललं पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलंय. नार्वेकरांच्या रुपानं एक तरुण, अभ्यासू व्यक्तिमत्त्व सभागृहाला अध्यक्ष म्हणून मिळालंय. असं ते म्हणाले. राहुल नार्वेकर हे आधी शिवसेनेत होते. त्यावेळेस मला कानावर आलं होतं, आदित्य ठाकरेंचे जवळचे सहकारी म्हणून कायद्याचं बरचसं ज्ञान तुम्ही आदित्य ठाकरेंना देण्याचा प्रयत्न केला. अशा लोकांवर आम्हीही लक्ष ठेवून असतो. नंतर जेव्हा मावळमध्ये मला उमेदवार पाहिजे होता, तेव्हा मी तुम्हाला विनंती केली आणि तुम्हाला उमेदवारी दिली. नंतर मोदींची जबदरस्त लाट असताना नार्वेकर तिथे पराभूत झाले. पण तेव्हा ते हुश्शार होते, त्यांनी सांगितली की हरलो तर कुठेतरी सदस्य राहिलो पाहिजे, असं ते म्हणाले होते. नंतर प्रवक्ते म्हणूनही त्यांनी चांगलं काम केलं.

    राहुल नार्वेकर पक्षाच्या नेतृत्त्वाच्या इतके जवळ झाले, शिवसेनेत असताना आदित्यच्या जवळ, आमच्यात आल्यावर मला आपलंसं केलं, भाजपात गेल्यावर देवेंद्रजींच्या जवळ आले, आता एकनाथ शिंदे साहेब तुम्ही पाहून घ्या.. असा टोला अजित पवारांनी लावलाय.

    मोदी येण्याआधी भाजप या राज्याच येण्याची काहीच शक्यता नव्हती. आता आमच्याकडूनच तिथं गेलेली जास्त लोकं भाजपात गेलेली दिसतात. समोर आमच्याकडचीच दिसतात. हे पाहून मला भाजपातील मूळ मान्यवरांचं वाईट वाटतं. पहिली लाईनच जरी तुम्ही पाहिली, तरी तुमच्या लक्षात येईल. दीपक केसरकर काय चांगले प्रवक्ते झालेत, त्यावेळी आम्ही शिकवलेलं कुठे वाया गेलेलं नाही, असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला होता.

    फडणवीसांनी शिंदेच्या मुख्यमंत्रीपदाची घोषणा करतात भाजपची लोकं इतकी रडायला लागली, की गिरीश तर फेटा सोडून डोळ्यालाच लावतो की काय असं झालं होतं. सगळ्यांना मोठा धक्का बसला होता. कुणी काहीही म्हटलं तरी सगळ्यांच्या मनात धाकधूक आहेच. प्रत्येकानं सदसदविवेक बुद्धीला विचारून सांगा, की मनाला शांती झालीये का… असा प्रश्न त्यांनी विचारला.

    चंद्रकात पाटील यांना बाका वाजवू नये, त्यांना मंत्रिपद मिळेल की नाही, याची काही शाश्वती नाहीये, असाही टोला अजित पवारांनी लगावला.

    एकनाथ शिंदे तुम्ही एकदा माझ्या कानात जरी सांगितलं असतं, तर आम्हीच तुम्हाला तिथे बसायला सांगितलं असतं. होय की नाही आदित्य? .. असा प्रश्न विचारत अजित पवार यांनी सगळ्या सभागृहात एकच हशा पिकवला होता.

  • 03 Jul 2022 12:19 PM (IST)

    Maharashtra assembly speaker election : विधानसभा अध्यक्षांची भूमिका एका न्यायमूर्तीसारखी- फडणवीस

    Maharashtra assembly speaker election :  राहुल नार्वेकर देशातील तरुण विधानसभा अध्यक्ष  आहेत, मी त्यांचं अभिनंदन करतो. विधानसभा अध्यक्षांची भूमिका एका न्यायमूर्तीसारखी आहे. हे कठीण काम आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. कायदेमंडळाला कायद्यात निष्णात असलेले अध्यक्ष मिळाले आहेत. याआधीच्या अध्यक्षांनीही उत्तम काम केलेलं आहे. त्याचंही मी स्मरण आणि अभिनंदन करतो. वरच्या सभागृहाचे सभापती आणि खालचे अध्यक्ष, हे नातं सासरे आणि जावयाचं आहे, हा एक योगायोग आहे. पण पुलं म्हणतात, जावई आणि सासऱ्याचं एकमत होणं कठीण आहे. जावयाचा उल्लेख असा करतात, की जावई म्हणजे सासऱ्याच्या पत्रिकेतला दशम ग्रह आहे. पण असं नाहीये, त्यांचं प्रेम आहे सासऱ्यावर, असंही फडणवीस यांनी अभिनंदनाचा ठराव करताना केला.

    नार्वेकर कुटुंब हे सावंतवाडीचं आहे. गोव्यातही त्यांचं वास्तव्य राहिलंय. अनेक वर्षांपासून ते मुंबईत राहिलेत. आपल्या वडिलांच्या समाजकारणाचा वारसा तुम्हाला मिळाला आहे, असंही फडणवीस यांनी यावेळी म्हटलं. 15 वर्ष आपण वकिली केली. अनेक संस्थांचे कायदेशीर सल्लागार म्हणून आपण काम केलं. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं योगदान आपण आता देणार आहात, यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग महाराष्ट्राच्या जनतेला होईल, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलाय. दोन्ही बाजूंना न्याय देत उत्तम प्रकारचे अध्यक्ष म्हणून तुम्ही काम कराल, अशा शुभेच्छा देतो.

  • 03 Jul 2022 12:16 PM (IST)

    Maharashtra assembly speaker election : हा भाजपच्या मनाचा मोठेपणा- एकनाथ शिंदे

    Maharashtra assembly speaker election : सत्तेतून पायउतार होऊन पहिल्यांदाच लोकं बाहेर गेली, माझ्यासोबत आठ ते नऊ मंत्री सत्तेतून पायउतार झाले, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, एकनाथ शिंदे हा बाळासाहेब आणि एकनाथ शिंदे यांचा एक सर्वसामान्य सैनिक होता. ज्यांनी ज्यांनी मला सांगितलं की आमच्या संपर्कात 10-20 आहेत. त्यांना सांगितलं की तुम्ही नावं सांगा, मी त्यांनी चार्टर्ड विमानाने परत पाठवतो. कुणावरही जबरदस्तीचा प्रयत्न झालेला नाही. 115 लोक त्यांच्याकडे होते. माझ्याकडे 50 लोक असताना, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. मुख्यमंत्रीपदासाठी मला समर्थन दाखवलं, यासाठी मोदी, शाह, जेपी नड्डा यांचे मी आभार मानतो. सगळ्यांना वाटलं की फडणवीस मुख्यमंत्री बनतील. मला खरंच काही नको होतं. पण माझ्या वैचारीक भूमिकेला पाठिंबा दिला. या निर्णयामुळे या राज्यातल्या सर्व पक्षांच्या डोळ्यात अंजन घालणारा निर्णय भाजपने घेतलेला आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटंलय.

  • 03 Jul 2022 12:11 PM (IST)

    Maharashtra assembly speaker election : ‘तुम्ही झुकतं माप द्यावं, अशी आमची अपेक्षा नाही’

    Maharashtra assembly speaker election : विधानसभा अध्यक्षांनी आम्हाला झुकतं मात द्यावं, अशी आमची अपेक्षा नाही, एकनाथ शिंदे यांचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना उद्देशून विधान, विधानसभा अध्यक्षांच्या अभिनंदन ठरावावेळी राहुल नार्वेकरांना उद्देशून एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य, पारदर्शक सरकार चालवण्यासाठी मदत करण्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन

  • 03 Jul 2022 12:05 PM (IST)

    Maharashtra assembly speaker election : एकनाथ शिंदेंकडून विधानसभा अध्यक्षांचा अभिनंदन ठराव

    Maharashtra assembly speaker election :  सभागृहाचा नेता नात्यानं एकनाथ शिंदेंकडून विधानसभा अध्यक्षांच्या अभिनंदनाचा ठराव

    विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतर मोठी मानाची पदं मिळवण्याची संधी अनेकांना मिळाली- शिंदे

    ज्यांनी ज्यांनी हे पद भूषवलं त्यांचा देशपातळीवर गौरवलं गेलं- शिंदे

    हा ऐतिहासिक क्षण सगळे पाहतायत, अनुभवतायत- शिंदे | पाहा LIVE Video

  • 03 Jul 2022 12:02 PM (IST)

    Maharashtra assembly speaker election : राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी

    Maharashtra assembly speaker election : राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी

    राजन साळवी यांचा पराभव

    विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडून अध्यक्षपदी निवड

    निवड होताच भाजप आमदारांकडून जय श्री रामची घोषणा

    शिवसेनेच्या बंडखोर आमदारांकडून जय भवनी, जय शिवाजीची घोषणा, भारत माता की जय आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

  • 03 Jul 2022 11:59 AM (IST)

    Maharashtra assembly speaker election : विरोधात मतदान केलेल्या आमदारांची नोंद

    Maharashtra assembly speaker election : शिवसेनेच्या व्हीप विरोधात मतदान केलेल्या आमदारांची रेकॉर्डवर नोंद घेण्यात आल्याची उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची माहिती

    संबंधित व्हिडीओ रेकॉर्डिंगचा पुरावाही असल्याचं जाहीर

    बाळासाहेब थोरात यांच्या मागणीनंतर विधानसभा उपाध्यक्षांची सभागृहात माहिती

  • 03 Jul 2022 11:57 AM (IST)

    Maharashtra assembly speaker election : 3 मतं तटस्थ!

    Maharashtra assembly speaker election : अबू आझमी, रईस शेख यांची तटस्थ भूमिका

    तिघा आमदारांची तटस्थ भूमिका

  • 03 Jul 2022 11:53 AM (IST)

    Maharashtra assembly speaker election : अमरावतीत शिंदेंच्या बॅनरची शिवसैनिकांकडून तोडफोड

    Maharashtra assembly speaker election : अमरावती शिवसेनेत दोन गट झालेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झालेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅनरची शिवसैनिकांनी तोडफोड करण्यात आली आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख अनंत गुढे यांच्या मुलाने अमरावतीच्या राजकमल चौकात हे बॅनर लावले होते. या बॅनरवर संताप व्यक्त करण्यात आलाय.

  • 03 Jul 2022 11:47 AM (IST)

    Maharashtra assembly speaker election : बविआ आणि मनसे भाजपच्या बाजूने!

    बहुजन विकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमदारांचं भाजपच्या बाजूने मतदान

    सपाचे अबू आझामी तटस्थ

    महाविकास आघाडीकडून उभे असलेल्या शिवसेनेच्या राजन साळवींवर पराभवाचे ढग

  • 03 Jul 2022 11:45 AM (IST)

    Maharashtra Vidhan sabha speaker : राहुल नार्वेकरांचा विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत विजय निश्चित

    Rahul Narvekar: राहुल नार्वेकरांचा विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत विजय निश्चित

    राजन साळवी यांच्यापेक्षा राहुल नार्वेकर यांना अधिक मतं

    बहुमतापेक्षा अधिक मतं मिळवण्यात राहुल नार्वेकरांना यश

    164 मतं मिळवत राहुल नार्वेकरांची सरशी

    बंडखोर आमदारांची सगळी मतं राहुल नार्वेकरांच्या बाजूने

    संपूर्ण शिंदे गट राहुल नार्वेकरांच्या पाठीशी

    शिंदे गटाकडून शिवसेनेच्या व्हीपला केराची टोपली

    आता फक्त औपचारीक घोषणाची प्रतीक्षा, राहुल नार्वेकर होणार विधानसभा अध्यक्ष

    शिवसेना आता न्यायालयीन लढा लढण्याची शक्यता, व्हीप न पाळलेल्या आमदारांचं काय होणार? चर्चांना उधाण

  • 03 Jul 2022 11:38 AM (IST)

    Maharashtra assembly speaker election : भाजपच्या नार्वेकरांना 145 पेक्षा जास्त मतं

    भाजपच्या राहुल नार्वेकरांनी मिळवली 145+ मतं

    राहुल नार्वेकरांना बहुमतापेक्षा जास्तीची मतं

    भाजपच्या राहुल नार्वेकरांचा विजय जवळपास निश्चित

    एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरा आमदारांचं राहुल नार्वेकरांना मतदान

    शिंदे गटाने शिवसेनेचे व्हीप मोडला, गोगावलेंची व्हीप पाळला

    राहुल नार्वेकर यांनी मिळवली 164 मतं

  • 03 Jul 2022 11:31 AM (IST)

    Maharashtra assembly speaker election : जयंत पाटील यांचा सभागृहातून राज्यपालांवर निशाणा

    Maharashtra assembly speaker election : जयंत पाटील यांचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना जोरदार टोला

    विधान परिषदेच्या आमदारांसह विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीवरुनही महत्त्वाच विधान

    पाहा जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

  • 03 Jul 2022 11:26 AM (IST)

    Maharashtra Legislative assembly Special Session Live Update : शिवसेनेचा व्हीप बंडखोर आमदारांनी पाळला नाही

    शिवसेनेचा व्हीप बंडखोर आमदारांनी पाळला नाही

    शिंद गटाच्या आमदारांकडून शिवसेनेच्या व्हीपला केराची टोपली

    शिंदे गटातील बंडखोर आमदारांचं भाजपच्या राहुल नार्वेकरांना मतदान

    राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी निवडणूक येण्याची दाट शक्यता

  • 03 Jul 2022 11:21 AM (IST)

    Maharashtra Legislative assembly Special Session Live Update : मतमोजणी सुरु असेपर्यंत सभागृहाचे दरवाजे बंद राहणार

    Maharashtra Legislative assembly Special Session Live Update : मतमोजणी सुरु असेपर्यंत सभागृहाचे दरवाजे बंद

    फडणवीस, जयंत पाटील यांच्या आक्षेपानंतर दुसऱ्यादा मतमोजणी सुरु

    पाहा विधानसभेच नेमकं काय घडतंय?

  • 03 Jul 2022 11:18 AM (IST)

    Maharashtra Legislative assembly Special Session Live Update : मतमोजणीत चूक होतेय- जयंत पाटील

    Maharashtra Legislative assembly Special Session Live Update : मतमोजणीत चूक होतेय- जयंत पाटील

    देवेंद्र फडणवीस यांचं जयंत पाटील यांचं अनुमोदन

    मतमोजणीत गोंधळ होत असल्यावरुन आक्षेप

    सभागृहात मतमोजणीवरुन गोंधळ

    पाहा व्हिडीओ :

  • 03 Jul 2022 11:14 AM (IST)

    Maharashtra Legislative assembly Special Session Live Update : अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेला सुरुवात

    Maharashtra Legislative assembly Special Session Live Update : आवाजी मतदानाला पोलने आव्हान

    आता मतमोजणी केली जाणार

    नाव आणि अनुक्रमांत आमदारांना उच्चारावं लागणार

    पोलला विधानसभा उपाध्यक्षांचा हिरवा झेंडा

    आता हेडकाऊंट होणार

    आमदारांना जागेवरच उभं राहून नाव आणि अनुक्रमांच उच्चारावा लागणार

    10 मिनिटांसाठी सभागृहाचे दरवाजे बंद राहणार

    पाहा व्हिडीओ :

  • 03 Jul 2022 11:11 AM (IST)

    अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आता पोल होणार

    चेतन तुपेंकडून राजन साळवींचा प्रस्ताव

    चंद्रकांत पाटील यांच्याकडून राहुल नार्वेकरांचा प्रस्ताव

    आमदारांना प्रस्तावाच्या बाजूने अथवा विरोधात मतादन करावं लागणार

    आमदारांनी नावं व अनक्रमांक जागेवर उभं राहून उच्चारावं

    विरोधकांनी पोल मागितल्यानं आता आवाजी मतदानाच्या पुढची प्रक्रिया सुरु

  • 03 Jul 2022 11:06 AM (IST)

    Maharashtra Legislative assembly Special Session Live Update : देवेंद्र फडणवीसांचा नाना पटोलेंना टोला

    Maharashtra Legislative assembly Special Session Live Update : नाना पटोलेंमुळे आम्हाला आजचा दिवस पाहायला मिळाला

    देवेंद्र फडणवीसांचा नाना पटोलेंना टोला

    नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे पार पडतेय विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक

  • 03 Jul 2022 11:05 AM (IST)

    Maharashtra assembly speaker election : जयंत पाटील यांची जोरदार फटकेबाजी

    Maharashtra assembly speaker election : राज्यपालांना जयंत पाटील यांचा जोरदार टोला

    राज्यपालांनी 12 विधान परिषद आमदारांची नियुक्ती करावी, जयंत पाटील यांचं आवाहन

    एकनाथ शिंदे यांनाही जयंत पाटील यांचा टोला

  • 03 Jul 2022 11:03 AM (IST)

    दोन दिवसी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात

    अधिवेशनाच्या कामकाजास सुरुवात

    एकनाथ शिंदे यांच्याकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा परिचय

    तसंच नव्या सभासदांचाही मुख्यमंत्र्यांकडून परिचय

    पाहा व्हिडीओ :

  • 03 Jul 2022 10:58 AM (IST)

    शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेतच

    आधी हकालपट्टीची बातमी, आता सारवासारव

    शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेमध्ये असल्याचं स्पष्टीकरण

    सामना दैनिकातून दिलेली बातमी ही अनावधानाने दिल्याचं शिवसेनेचं स्पष्टीकरण

    आढळराव पाटील यांच्या पक्षविरोधात काम केल्याचा ठपका ठेवत त्यांची हकालपट्टी केल्याची देण्यात आलेली माहिती

    आता पुन्हा ते शिवसेनेमध्ये असल्याची स्पष्टीकरण देत पक्षाकडून सारवासारव

  • 03 Jul 2022 10:52 AM (IST)

    ‘ठाकरेंच्या हाती भगवा, पण त्याचा अर्थच त्यांना माहीत नाही’

    सुधीर मुनगंटीवार यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

    ठाकरेंच्या हाती भगवा, पण त्याचा अर्थच त्यांना माहीत नाही

    सुधीन मुनगंटीवार यांचा विधान भवनात पत्रकारांशी बोलताना ठाकरेंवर हल्लाबोल, पाहा नेमकं काय म्हणाले?

  • 03 Jul 2022 10:50 AM (IST)

    Congress : मविआचाच उमेदवार विधानसभेचा अध्यक्ष होणार- बाळासाहेब थोरात

    निवडणुकीत विधानसभा अध्यक्षपदी महाविकास आघाडीचा उमेदवारच विजयी होईल

    बाळासाहेब थोरात यांना विश्वास

    महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजन साळवी रिंगणात

    राजन साळवी यांची भाजपच्या राहुल नार्वेकरांशी थेट लढत

    पाहा व्हिडीओ

  • 03 Jul 2022 10:48 AM (IST)

    Video : भाजपचे सर्व आमदारही शिवसेनेप्रमाणे भगवे फेटे घालून

    भाजपचे नेतेही भगवे फेटे घालून विधानभवनात दाखल, आज विधानसभेत शिंदे गट-फडणवीसांचं जोरदार शक्तिप्रदर्शन

  • 03 Jul 2022 10:41 AM (IST)

    अजित पवारांच्या पाठोपाठ आदित्य ठाकरेही विधान भवनात दाखल

    अजित पवारांपाठोपाठ आदित्य ठाकरेही विधान भवनात दाखल

    सचिन अहिर विधान भवनात दाखल

    मिलिंद नार्वेकरही माध्यमांच्या समोर

    एवढा बंदोबस्त कशासाठी – आदित्य ठाकरेंचा बंडखोर आमदारांच्या सुरक्षेवरुन पलटवार

    कसाबलाही असं आणलं नसेल, आमदार आणि मीडियामध्ये अशी दोरी नव्हती- आदित्य ठाकरे

    कसाबच्या वेळीही आम्ही असा बंदोबस्त पाहिलेला नव्हता- आदित्य ठाकरे

    आमचा राग मुंबईवर काढू नका, आदित्य ठाकरेंचं कळकळीचं आवाहन

    मित्रपक्षांसोबत बसू आणि पुन्हा दाखवून देऊ – आदित्य

    विधीमंडळ कार्यालय आम्हीच सील केलं, चावी आमच्याकडे, आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण

  • 03 Jul 2022 10:37 AM (IST)

    अजित पवारही विधान भवनात दाखल

    Ajit Pawar : अजित पवार कोरोनातून बरे झाले आहेत. ते देखील दोन दिवसांच्या विशेष अधिवेशनासाठी अखेर उपस्थित झालेत. अजित पवार विधानसभेच्या दोन दिवसीय अधिवेशनाला येणार की नाह, यावरुन चर्चांना उधाण आलं होतं. अखेर अजित पवार हे देखील विधान सभेत अधिवेशनासाठी हजर झाले आहेत. अजित पवारांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी स्वतःला होम आयसोलेट केलं होतं. त्यानंतर आता त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्यानं अजित पवार हे देखील दोन दिवसांच्या अधिवेशनासाठी विधान भवनात दाखल झालेत.

  • 03 Jul 2022 10:31 AM (IST)

    Maharashtra assembly speaker election : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला बंडखोरांचं अभिवादन

    Maharashtra assembly speaker election : विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला बंडखोर शिवसेना आमदारांचं अभिवादन

    आधी बाळासाहेब ठाकरेंच्या पुतल्यासमोर बंडखोर आमदारांचं अभिवादन

    कुलाब्यातील बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यासमोर नतमस्तक त्यानंतर विधान भवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शिवसेनेच्या बंडखोरांचं अभिवादन

    सर्व बंडखोर आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे विधान भवनात दाखल

  • 03 Jul 2022 10:27 AM (IST)

    Maharashtra assembly speaker election : सर्व बंडखोरांसह शिंदेचा विधानभवनाच्या आत प्रवेश

    सर्व बंडखोर शिवेसना आमदार विधान भवनात दाखल

    विजयी मुद्रा करत एकनाथ शिंदे विधान भवनात दाखल

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांचे सर्व समर्थक आमदार विधान भवनात दाखल

    भगवे फेटे घालून सर्व आमदार विधान भवनात दाखल

    एकूण 51 आमदार आपल्यासोबत असल्याचा एकनाथ शिंदे यांचा दावा

    पाहा व्हिडीओ :

  • 03 Jul 2022 10:22 AM (IST)

    Video : बाळासाहेबांच्या पुतळ्याला बंडखोर आमदारांचं अभिवादन

    Maharashtra assembly speaker election : बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला बंडखोर आमदारांनी अभिवादन केलं

    मुंबईत अधिवेशनाच्या आधी कुलाब्यातील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार हे नतमस्तक झाले

    विधानसभेत सभागृहात अध्यक्षपदी भाजपचा उमेदवार विजयी होईल, असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

    पाहा व्हिडीओ :

  • 03 Jul 2022 10:17 AM (IST)

    Maharashtra assembly speaker election : भगवे फेटे घालून शक्तिप्रदर्शन

    Maharashtra assembly speaker election : शिंदे गटाच्या सगळ्या आमदारांचं शक्तिप्रदर्शन

    बाळासाहेब टाकरे यांच्या पुतळ्याला बंडखोर आमदार अभिवादन

    सर्व आमदार बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक

    बाळासाहेबांच्या पुतळ्यासमोर चोख सुरक्षा व्यवस्था

    हिंदुदृदयसम्राट यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मगच विधानभवनात जाणार- एकनाथ शिंदे

  • 03 Jul 2022 10:13 AM (IST)

    Maharashtra assembly speaker election : फडणवीस विधान भवनात दाखल

    Maharashtra assembly speaker election : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान भवनात दाखल

    विजयी मुद्रा करत फडणवीस विधान भवनात दाखल

    भगवे फेटे घालून भाजप आमदार विधान भवनात दाखल

  • 03 Jul 2022 10:12 AM (IST)

    आमदारांसह मुख्यमंत्रीही विधानभवनाच्या दिशेने निघाले! फडणवीस पोहोचले

    Maharashtra Legislative assembly Special Session Live Update : विशेष बसने शिवसेनेचे बंडखोर आमदार हॉटेलातून रवाना

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील बसमधून आमदारांसोबत रवाना

    थोड्याच वेळात विधानभवनात दाखल होणार

    चोख पोलीस बंदोबस्तात आमदारांचा ताफा विधान भवनाच्या दिशेने निघाले

  • 03 Jul 2022 10:10 AM (IST)

    Maharashtra Legislative assembly Special Session Live Update : सदाभाऊ खोत यांचा शिवसेनेला टोला

    Sadabhau Khot : शिवसेनेच्या मुखपत्राचं नाव बदलावं, सदाभाऊ खोत यांचा टोला

    शिवसेनेनं ‘सामना’चं नाव बदलावं- सदाभाऊ खोत

    सामनाचं नाव बदलून काँग्रेस राष्ट्रवादी किमान समान असं नाव करावं, खोत यांची टोलेबाजी

    हिंदुत्वाच्या विरोधात भूमिका शिवसेनेनं सामनातून घेतली, सदाभाऊ खोत यांचा आरोप

  • 03 Jul 2022 10:08 AM (IST)

    Rahul Narvekar : मविआमुळे परंपरा मोडली- नार्वेकर

    Maharashtra Legislative assembly Special Session Live Update :  महाविकास आघाडीमुळे विधानसभा अध्यक्षपदाची परंपरा मोडली आहे, भाजपचे विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार राहुल नार्वेकरांचा टोला

    मविआने उमेदावर दिल्याने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे, आतापर्यंत बिनविरोध पार पडत होती निवडणूक

    बहुमत आमच्याकडे, विजयही आमचाच होईल, राहुल नार्वेकर यांना विश्वास

    व्हीपचा प्रश्नच येत नाही, संख्याबळ आमच्याकडे आहे, राहुल नार्वेकरांचं टीव्ही 9 मराठीशी बोलताना वक्तव्य

  • 03 Jul 2022 10:05 AM (IST)

    Maharashtra Legislative assembly Special Session Live Update : व्हीपवर झिरवळांचं मोठं विधान

    Maharashtra Legislative assembly Special Session Live Update : विधानसभा अध्यक्षपदाच्या आधी नरहरी झिरवळ यांचं मोठं विधान

    शिवसेनेकडून जारी केलेला व्हीपच मान्य केला जाणार

    नरहरी झिरवळ यांचं महत्त्वाचं विधान

    टीव्ही 9 मराठीशी बोलताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचं महत्त्वाचं विधान

    शिवसेनेकडून दोन व्हीप जारी झाल्यानं नवा वाद

    एकनाथ शिंदे गटाचे भगत गोगावले आणि शिवसेनेचे सुनील प्रभू यांच्याकडून व्हीप जारी

  • 03 Jul 2022 09:57 AM (IST)

    Maharashtra assembly speaker election : बंडखोरांविषयी बोलणं थांबवलंय- राऊत

    Maharashtra assembly speaker election : उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली आम्ही शिवसेना पुढे घेऊन जाऊ, हीच शिवसेना पुढे महाराष्ट्राचं नेतृत्त्व करेल, संजय राऊत यांनी व्यक्त केला विश्वास

    बाळासाहेबांचे आशीर्वाद असते, तर तुम्ही महाराष्ट्राचे आज मुख्यमंत्री असता, राऊतांचा फडणवीसांना टोला

    जर 50 आमदारांच्या गटाला तुम्ही आज मुख्यमंत्रीपद दिलंय, तर 2019 मध्ये तुम्ही मुख्यमंत्रीपद का नाकारलं? तेव्हाही हेच बंडखोर शिवसेनेत होते ना…- संजय राऊत

    फुटिरांना तुम्ही आज खरे शिवसैनिक म्हणत आहात, ही ढोंगं बंद करा, राऊतांचा हल्लाबोल

    आम्ही तुम्हाला राज्य चालवण्यासाठी शुभेच्छा देतोय, हे आमच्या मनाचं मोठेपण आहे – राऊत

    भाजप आता अटलजींचा पक्ष राहिलाय का? संजय राऊतांचा सवाल

    मुंबईवर अतिरेकी हल्ला झालाय का? अशी विचारणा करणारे अनेक फोन देशभरातील नेत्यांचे मला आले- राऊत

    बंडखोरांना एवढं भय वाटण्याचं कारण काय? खुलेपणे समोर या, खुलेपणाने संवाद साधून दाखवा – राऊतांना

    महाराष्ट्रात ज्या घडामोडी घडवण्यात आल्या, त्या संदर्भात ममता बॅनजी, चंद्रशेखर राव यांच्याशी माझा फोन झाला आहे, चर्चा झाली आहे- राऊत

    नऊ सरकारं पाडली, पण हे नववं सरकार पाडलेलं त्यांच्या नाकी नऊ आणेल- संजय राऊत

  • 03 Jul 2022 09:54 AM (IST)

    Maharashtra assembly speaker election : विधानसभा उपाध्यक्षांच्या कार्यालयात शिवसेनेची बैठक

    Maharashtra assembly speaker election : शिवसेनेचं विधीमंडळ कार्यालय सील केल्यानंतर आता शिवसेना आमदार विधानसभा उपाध्यक्षांच्या कार्यालयात

    विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयात शिवसेनेची बैठक पार पडणार

    आज आवाजी मतदानाचे पार पडणार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक

  • 03 Jul 2022 09:47 AM (IST)

    Maharashtra assembly speaker election : विधानभवनातील शिवसेनेचं कार्यालय सील केलं!

    Maharashtra assembly speaker election : विधानभवनातील शिवसेनेचं कार्यालय सील करण्यात आलं आहे. शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गट हा संघर्ष आता अधिक ताणला जाण्याची शक्यता आहे. आधीच व्हीपवरुन शिंदे गट आणि शिवसेना यांच्या संघर्ष पेटलाय. त्यात आता आणखी एक ठिणगी पडली आहे.

  • 03 Jul 2022 09:44 AM (IST)

    Maharashtra assembly speaker election : शिंदे गटाचा व्हीप पुढीलप्रमाणे!

    एकनाथ शिंदे यांनी जारी केलेल्या व्हीपमधील शब्दानंशब्द पुढीलप्रमाणे…

    भाजपच्या राहुल नार्वेकरांना मतदान करण्याचे शिंदे गटाच्या प्रतोदांकडून व्हीपद्वारे आदेश

    शिंदे गटाकडून जारी केलेला व्हीप पुढीलप्रमाणे :

    शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालय

    ३०४/३०५ विधानभवन मुंबई ४०००३२ दुरध्वनी २२०२७३९९ विस्तार क्र. १३०२/१३०३, फॅक्स २२०२७७९८

    पक्षादेश क्रमांक: ७ / २०२२

    दिनांक : २ जुलै २०२२

    रविवार, दिनांक : ३ जुलै २०२२ रोजी विधिमंडळाच्या विधानसभेचे मुंबईत विशेष अधिवेशन भरविण्यात येणार आहे. या अधिवेशनात पहिल्या दिवशी म्हणजे दिनांक ३ जुलै २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता अध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत सरकारच्या वतीने अॅड श्री. राहुल नार्वेकर विधानसभा सदस्य हे शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत.

    वरील कामी शनिवार, दिनांक २ जुलै २०२२ रोजी, सायंकाळी ७.०० वाजता, हॉटेल ताज प्रेसिडेंट, कफ परेड, मुंबई येथे शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या सर्व सन्माननीय सदस्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये सत्तारुढ पक्षाचे विधानसभा अध्यक्ष पदाचे उमेदवार अॅङ श्री. राहुल नार्वेकर, विधानसभा सदस्य यांना प्रचंड मताधिक्क्याने निवडून आणण्यासाठी मतदान करण्याबाबत निर्णय करायचा आहे.

    यास्तव शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी अवश्य उपस्थित रहावे, असा पक्षादेश आहे.

  • 03 Jul 2022 09:36 AM (IST)

    Maharashtra assembly speaker election : सुधीर मुनगंटीवार LIVE

    Maharashtra assembly speaker election : विधानसभा अध्यक्षपदाची नेमणूक मविआने मुद्दाम केली नाही, मुनगंटीवार यांचा आरोप

    विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी व्हीप लागतच नाही

    सुधीर मुनगंटीवार यांचा दावा

    विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाचा व्हीप गरजेचा नसतो

    सभागृहात उपस्थित असलेल्यांपैकी बहुमताने निवडून दिलेला उमेदवार अध्यक्ष ठरवला जातो- मुनगंटीवार

    तेव्हा असलेल्या राज्यपालांना मुख्यमंत्री झालेल्यांना आनंद झाला नसेल, म्हणून त्यांनी पेढा भरवला नसेल

    सुधीर मुनगंटीवर यांचा शरद पवारांना टोला

    उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाचा अर्थ समजलेलाच नाही- मुनगंटीवार

    हाती भगवा मात्र हृदयात स्वार्थ, मुनगंटीवार यांचा उद्धव ठाकरेंना टोला

  • 03 Jul 2022 09:30 AM (IST)

    Eknath Shinde : शिंदे गटाच्या व्हीपची प्रत टीव्ही 9च्या हाती

    एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंनी जारी केलेलं व्हीपचं पत्र समोर

    राहुल नार्वेकरांना मतदान करा, बंंडखोर आमदारांसाठी शिंदे गटाचं व्हीप

    पाहा व्हीपमध्ये नेमकं काय म्हटलंय?

  • 03 Jul 2022 09:25 AM (IST)

    Video : शिवसेनेचे सगळे आमदार मला मतदान करतील- राजन साळवी

    Maharashtra Legislative assembly Special Session Live Update : जिंकणार मीच, महाविकास आघाडीचे विधानसभा अध्यक्षपदासाठीचे उमेदवार राजन साळवी (Rajan Salvi) यांना विश्वास

    राजन साळवी यांची टीव्ही 9 मराठीसोबत केली EXCLUSIVE बातचीत

    शिवसेनेचे सगळे आमदार आपल्यालात मतदान करतील, राजन साळवी यांचं विधान

    विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे राजन साळवी विरुद्ध भाजपचे राहुल नार्वेकर असा थेट सामना

    पाहा व्हिडीओ :

  • 03 Jul 2022 09:20 AM (IST)

    Maharashtra assembly speaker election : राजन साळवी LIVE

    मविआने मला उमेदवारी दिली आहे- साळवी

    शिवसेनेचे सगळे आमदार मला मतदान करतील- साळवी

    काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदारही मला मतदान करतील आणि मला निवडून आणतील हा मला विश्वास- साळवी

    शिवसेनेचाच व्हीप सर्व सेना आमदारांसाठी बंधनकारक- साळवी

    शिवसेनेसोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेसही सोबत आहे, मी जिंकेन याची मला खात्री आहे – साळवी

    शिवसेनेच्या व्हीपनुसार बंडखोर आमदारांना मतदान करावंच लागेल- साळवी

    बंडखोरांनी जर मतदान केलं गेलं नाही, तर आमदारांना निलंबनाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल, साळवींची इशारा

    सभागृहात आमदारांचं मतपरिवर्तन होईल, असा विश्वास पवारांना वाटत असेल, तर मलाही खात्री वाटतं की आमचा विजय होईल

    राजन साळवी यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचीत करताना व्यक्त केला विश्वास

    उद्धव ठाकरेंनी दिलेला निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य आहे – राजन साळवी

  • 03 Jul 2022 09:15 AM (IST)

    शिंदे गटाकडून व्हीप जारी, नार्वेकरांना मतदान करण्याचे आदेश

    शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून आमदारांना व्हीप जारी

    राहुल नार्वेकरांना मतदान करा, भरत गोगावले यांचे व्हीपमधून आदेश

    शिवसेनेच्या सुनील प्रभू यांच्याकडूनही आधीच शिवसेनेच्या आमदारांना व्हीप जारी

    शिवसेनेकडून राजन साळवी विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात

    शिवसेनेच्या राजन साळवींऐवजी भाजपच्या राहुल नार्वेकरांना मतदान करण्यासंदर्भात शिंदे गटाच्या आमदारांना व्हीप

    विधानसभेचं दोन दिवसीय अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता

  • 03 Jul 2022 09:01 AM (IST)

    आमदार थांबलेल्या हॉटेलला छावणीचं स्वरुप

    बंडखोर आमदारांचं ताज प्रेसिडंट हॉटेलात मुक्काम

    ताज प्रेसिडंट हॉटेलला छावणीचं स्वरुप

    आमदारांच्या सुरक्षेसाठी चोख पोलीस बंदबोस्त

    अधिवेशनासाठी बंडखोर आमदार मुंबईत दाखल

    शनिवारी मुंबई विमानतळावरुन विशेष बसने हॉटेलात आमदारांना आणलं

    आजपासून सुरु होत असलेल्या अधिवेशनासाठी सर्व बंडखोर आमदार मुंबईत

  • 03 Jul 2022 08:55 AM (IST)

    अजित पवार विशेष अधिवेशनाला गैरहजर राहणार?

    अजित पवार आज अधिवेशनाला येण्याची शक्यता कमी

    कोरोनामुळे प्रकृतीच्या कारणास्तव अधिवेशनाला येणार नसल्याची माहिती

    आजपासून विधानसभेचं दोन दिवसीय विशेष अधिवेशन

    अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पार पडणार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक

    शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा अधिवेशनात थेट सामना

  • 03 Jul 2022 08:47 AM (IST)

    सद्सद्विवेक बुद्धीने पक्षविरोधी मतदार करायचं नसतं- जयंत पाटील

    शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना व्हीप बंधनकारक- जयंत पाटील

    शिवसेना प्रमुखांनी नेमलेला व्हीप हाच खरा व्हीप- जयंत पाटील

    कायद्याने पक्षप्रमुखांनी नेमलेला व्हीपच खरा व्हीप असतो- जयंत पाटील

    सुनील प्रभू हेच खरे व्हीप राहतील- जयंत पाटील

    विधानसभा अध्यक्षपदासाठी व्हीप बंधनकारक नसतो, विधानसभा अध्यक्षपदासाठी सदसदविवेक बुद्धीने मतदान करायचं असतं, या चंद्रकात पाटील यांच्या वक्तव्यावरही जयंत पाटील यांचं उत्तर

    सदसदविवेक बुद्धीनं पक्षविरोधी मतदान करायचं नसतं, जयंत पाटील यांचा टोला

    तब्बेत बरी नसल्यानं अजित पवार मतदानाला येणार की नाही, याबाबतही साशंकता

    सकाळी 10.30 वाजता राष्ट्रवादीचे आमदार विधान भवना एकत्र जमणार, जयंत पाटील यांची माहिती

  • 03 Jul 2022 08:42 AM (IST)

    Maharashtra Legislative assembly Special Session Live Update : भाजप आमदार 9 वा. रवाना होणार

    Maharashtra assembly speaker election : हॉटेल ओबेरॉयमधील भाजप आमदार 9 वाजता विधान भवनाच्या दिशेने रवाना होणार

    विशेष बसने आमदारांना विधान भवनात नेलं जाणार

    भाजप आमदार हॉटेल ओबेरॉयमध्ये मुक्कामी

    विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची आज रणधुमाळी

  • 03 Jul 2022 08:31 AM (IST)

    Video : शिंदे आणि फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन

    शिंदे आणि फडणवीस आज शक्तिप्रदर्शन करणार आहेत

    सरकार स्थापन केल्यानंतर होत असलेल्या पहिल्यात अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जोरदार शक्तिप्रदर्शनाची शक्यता आहे.

    मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

    ताज हॉटेलबाहेर तगड्या पोलीस बंदोबस्तात सध्या आमदार ता प्रेसिडंट हॉटेलात थांबले आहेत.

    विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी हे सर्व आमदार सकाळी 10 वाजल्यानंतर विधान भवनाच्या दिशेने निघतील.

    शिंदे गट आणि भाजपचे आमदार एकत्र विधानभवनात पोहोचतील, असं सांगितलं जातंय.

    पाहा व्हिडीओ :

  • 03 Jul 2022 08:27 AM (IST)

    Maharashtra Legislative assembly Special Session Live Update : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक का होतेय?

    विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक का होते आहे हेही समजून घेणं गरजेचंय. काँग्रेसने नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष होते. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. ही निवड झाल्यानंतर गेल्या वर्षभरापूर्वी नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे विधानसभेचं अध्यक्षपदा हे रिक्त झालं होतं. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी, अशी मागणी सातत्यानं केली जात होती. मात्र अखेर आता शिंदे गट आणि भाजप यांनी एकत्र सरकार स्थापन केल्यानंतर बोलावण्यात आलेल्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडते आहे.

    4 फेब्रुवारी 2021 पासून विधानसभेचं अध्यक्षपद रिक्त होतं. आता जवळपास दीड वर्षानंतर या पदावर कुणाची निवड होते, हे पाहणं महत्त्वाचं आहे. तोपर्यंत विधानसभेचं कामकाज उपाध्यक्ष असलेल्या नरहरी झिरवळ यांनी पाहिलं होतं.

  • 03 Jul 2022 08:08 AM (IST)

    Maharashtra assembly speaker election : काँग्रेस आमदारांना थोड्याच वेळात व्हीप बजावला जाणार

    Maharashtra assembly speaker election : काँग्रेसचे आमदार 10 वाजता विधानभवनात जमणार आहेत. काँग्रेस आमदारांना एकत्र केलं जाणार असून पक्षाचे प्रतोद सुरेश वरपुडकर हे व्हीप बजावतील. यावेळी एक बैठक घेतली जाईल. या बैठकीत मतदानासंदर्भात सूचना दिल्या जातील. वरिष्ठ नेते मतदानासंदर्भात आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. काँग्रेस आमदारांना थोड्याच वेळात व्हीप बजावला जाणार असल्याचंही सांगण्यात आलंय. काँग्रेस आमदार शिवसेनेच्या राजन साळवी यांना मतदान करण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवी यांना रिंगणात उतरवण्यात आलंय.

  • 03 Jul 2022 08:01 AM (IST)

    विधानसभा अध्यक्षपदाची आज निवडणूक, 11 वा. सुरु होणार कामकाज

    विधानसभा अध्यक्षपदाची आज निवडणूक आहे. तर उद्या शिंदे यांना बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक आज होणाऱ्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनातू केली जाईल. यासाठी शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा थेट सामना आहे. भाजपने विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकरांना उभं केलंय. तर शिवसेनेकडून राजन साळवी या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. सकाळी 11 वाजता विधानसभेतील सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होईल. या अधिवेशनासाठी खास गोव्यातून बंडखोर आमदारही मुंबईत शनिवारी रात्री दाखल झाले आहेत.

  • 03 Jul 2022 07:47 AM (IST)

    Ekanth Shinde : एकनाथ शिंदे मूळ शिवसेनेवरच दावा करु शकतात का? उत्तर मिळालं!

    Eknath Shinde vs Shiv sena : एकनाथ शिंदे मूळ शिवसेनेवर दावा करु शकतात का, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालंय. तज्ज्ञांनी याबाबत स्पष्ट शब्दांत उत्तर देताना कायदेशीर बाबी आणि इतर संदर्भही दिले आहेत. एकनाथ शिंदे मूळ शिवसेनेवर दावा करु शकत नाही, असं जाणकारांचं मत आहे. असं सांगण्यामागे नेमकं यामागचं कारण काय आहे? हे जाणून घेण्यासाठी…

    पाहा व्हिडीओ

  • 03 Jul 2022 07:44 AM (IST)

    Maharashtra assembly speaker election : जिंकणार तर राहुल नार्वेकरच- महाजन

    जिंकणार तर राहुल नार्वेकरच, गिरीश महाजन यांना विश्वास

    विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत गिरीश महाजनांचं वक्तव्य

    बहुमतानं भाजपचे राहुल नार्वेकर विजयी होतील- गिरीश महाजन

    पाहा व्हिडीओ : 

  • 03 Jul 2022 07:32 AM (IST)

    Maharashtra Legislative assembly Special Session Live Update : व्हीपवरुन शिंदे गट विरुद्ध शिवसेनेत सामना!

    भाजपकडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदासाठी रिंगणात

    शिवसेनेकडून राजन साळवी विधानसभा अध्यक्षपदाच्या शर्यतीत

    कुणाचा व्हीप लागू होणार, यावरुन सामना

    राजन साळवींनाच मतदान करा, शिवसेनेकडून व्हीप जारी

    व्हीपवरुन शिंदे गट विरुद्ध शिवसेना सामना

    शिवसेनेनं काढलेला व्हीप आम्हाला लागू होत नाही, शिंदे गटाचा दावा

    शिवसेनेकडून प्रतोद सुनील प्रभू यांना जारी केला व्हीप

  • 03 Jul 2022 07:28 AM (IST)

    Maharashtra assembly speaker election : संजय राऊतांचा दीपक केसरकरांवर पलटवार

    Sanjay Raut on Deepak Kesarkar : दीपक केसरकर यांनी संजय राऊतांचा सवाल

    सामना रोखठोकमधून संजय राऊतांचा दीपक केसरकर यांच्यावर पलटवार

    शिंदे मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागेल, हाच खरा भूकंप

    संजय राऊत यांचा रोखठोक सदरातून खोचक टोला

    फडणवीस पुन्हा आले, पण ते असे अर्धवट येतील असं कुणालाच वाटलं नव्हतं- संजय राऊत

  • 03 Jul 2022 07:16 AM (IST)

    Maharashtra assembly speaker election: ‘…तर शिंदे गटाच्या आमदारांची आमदारकी पाण्यात जाणार’

    Maharashtra Legislative assembly Special Session Live Update :राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांचा बंडखोर आमदारांवर निशाणा

    ‘शिंदे गटाच्या आमदारांची आमदारकी पाण्यात जाणार’

    ‘विरोधात मतदान झालं तर येणाऱ्या काळात कोर्टात गेल्यानंतर आमदारांना निलंबित केलं जाऊ शकतं’

    राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांचं वक्तव्य

    शिवसेनेनं काढलेला व्हिप शिंदे गटाच्या आमदारांना लागू आहे की नाही, यावरुन वाद

    आमचे नेते एकनाथ शिंदे, सुनिल प्रभूंचा व्हिप आम्हाला लागू होत नाही, शिंदे गटाचा दावा

  • 03 Jul 2022 07:13 AM (IST)

    Maharashtra assembly speaker election : अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीसांनी बंडखोर आमदारांना काय म्हटलं?

    Devendra Fadnavis : बंडखोर आमदार मुंबईल आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांशी संवाद साधताना म्हटलंय, की…

    एवढी वर्ष भाजप आणि शिवसेना वेगवेगळी होती, हे कधी वाटलं नाही. थोड्या काळासाठी भाजप-सेना दूर केली. आता पुन्हा एकत्र आलो आहोत. मूळ परिवार एक झालाय. आपल्यासोबत बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांचा खरा विचार घेऊन आपल्यासोबत आलेल्या आमदारांना बळ देण्याची आपली जबाबदारी आहे. आता एकत्र वाटचाल करायचीय. महाराष्ट्राता पुन्हा गतवैभव प्राप्त करुन द्यायचंय.

  • 03 Jul 2022 07:10 AM (IST)

    Maharashtra assembly speaker election : आमदारांना उद्देशून एकनाथ शिंदे काय म्हणाले?

    Maharashtra Legislative assembly Special Session Live Update : शनिवारी रात्री सर्व बंडखोर आमदारांना उद्देशून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय, की…

    आता खऱ्या अर्थाने भाजप-सेना युतीचं सरकार आलं आहे. बाळासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं ते पूर्ण झालं. उद्धव ठाकरेंना मनातील खदखद सांगितली मात्र यश आलं नाही. नेतृत्त्वानं आमदारांचं ऐकलं नाही, म्हणून ही परिस्थिती उद्भवली. मतदारांना न्याय देऊ शकलो नाही तर आपण कसे आमदार. देवेंद्र फडणवीसांना कामाचा प्रचंड अनुभव आहे. भाजपनं बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं. फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्त्वामुळे हे शक्य झाले.

  • 03 Jul 2022 06:56 AM (IST)

    Maharashtra assembly speaker election : शिवाजीराम आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी

    Maharashtra Legislative assembly Special Session Live Update : पक्षविरोधी काम केल्याचा शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर ठपका

    माजी खासदार शिवाजीराम आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी

    एकनाथ शिंदे गटात सामील झाल्यानं पाटील यांच्यावर कारवाई

    शिवसेनेकडून रितसर पत्रक काढत हकालपट्टी केल्याची माहिती देण्यात आली आहे.

  • 03 Jul 2022 06:44 AM (IST)

    व्हीपच्या वादातून शिंदे सरकारची नय्या पार होणार?

    आज पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार

    शिवसेनेकडून दोन व्हीप लागू होण्याची शक्यता आहे

    उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रतोद असलेल्या सुनील शिंदे यांनी एक व्हीप काढून,

    शिवसेनेच्या सर्व आमदारांनी आघाडीचे महाविकास उमेदवार राजन साळवी यांना मतदान करण्याचा व्हीप काढण्यात आला

    एकनाथ शिंदे गटाकडून प्रतोद भारत गोगावले हेही शिंदे -फडणवीस सरकारचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान करावे, असा व्हीप जारी करण्याची शक्यता आहे.

    आता या दोन्ही शिवसेनेच्या वादात कायदेशीरदृष्ट्या व्हीप नेमका कुणाचा लागू होणार, हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

  • 03 Jul 2022 06:35 AM (IST)

    आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक

    ठाकरे समर्थक आणि शिंदे समर्थक यांच्यात संघर्ष होण्याची शक्यताय

    विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीनं आपल्या उमेदवारांची नावं घोषित

    भाजपाकडून राहुल नार्वेकर

    महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी

    आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक विधान परिषद आणि राज्यसभेप्रमाणे चुरशीची ठरणार आहे

    आज ही निवडणूक पार पडणार आहे.

Published On - Jul 03,2022 6:31 AM

Follow us
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.