Maharashtra Politics : विधानसभेचं अधिवेशन एक दिवसानं पुढे ढकललं! ‘या’ 3 गोष्टींमुळे विशेष अधिवेशन वादळी ठरणार

Maharashtra Assembly Special Session News :2 आणि 3 जुलैऐवजी आता 3 आणि 4 जुलै रोजी म्हणजेच येत्या रविवारी आणि सोमवारी विधानसभेचं विशेष अधिवेशन पार पडेल.

Maharashtra Politics : विधानसभेचं अधिवेशन एक दिवसानं पुढे ढकललं! 'या' 3 गोष्टींमुळे विशेष अधिवेशन वादळी ठरणार
विधान भवन...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 11:32 AM

मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या (Maharashtra Assembly Special Session 2022) विशेष अधिवेशनासंबंधी मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभेचं (Maharashtra Legislative assembly) विशेष अधिवेशन हे एका दिवसानं पुढं ढकलण्यात आलं आहे. 2 आणि 3 जुलैऐवजी आता 3 आणि 4 जुलै रोजी म्हणजेच येत्या रविवारी आणि सोमवारी विधानसभेचं विशेष अधिवेशन (Special Session) पार पडेल. रविवारी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड होईल. त्यानंतर सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. यावेळी एकनाथ शिंदे यांना बहुमत सिद्ध करावं लागेल.

कोण होणार विधानसभा अध्यक्ष?

महाविकास आघाडी सरकारच्या काळात नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून महाराष्ट्राला विधानसभा अध्यक्ष मिळालेला नव्हता. विधानसभा उपाध्यक्ष म्हणून नरहरी झिरवळ यांच्याकडे कारभार सोपवण्यात आलेला होता. आता शिंदे सरकार सत्तेता आल्यानंतर या विशेष अधिवेशनात सगळ्यात आधी विधाानसभा अध्यक्षांची निवड पार पडेल.

विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव चर्चेत आहे, तर दुसरीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचंही नाव चर्चेत आहे. आता यापैकी कुणाची निवड विधानसभा अध्यक्षपदी होते, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

का आहे विधानसभा अध्यक्ष  निवड महत्त्वाची?

विधानसभा उपाध्यक्ष यांनी शिंदे गटातील 16 आमदारांचं निलंबन करण्याबाबत नोटीसा पाठवल्या होत्या. या नोटीसीविरोधात शिंदे गटानं सुप्रीम कोर्टात दाद मागितली. तसंच झिरवळ यांच्याविरोधातही शिंदे गटानं अविश्वास प्रस्ताव आणलेला होता. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षांची निवड महत्त्वाची मानली जातेय.

एकनाथ शिंदे गट आता व्हिप काढून विधानसभा अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेचा व्हीप काढू शकतात. हा व्हिप जर उद्धव ठाकरे समर्थक आमदारांनी मानला नाही, तर त्यांच्या 16 आमदारांवरही निलंबनाची कारवाई होण्याची भीती व्यक्त केली जातेय. या सर्व नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचं विशेष अधिवेशन, विधानसभा अध्यक्षांची निवड आणि त्यानंतर विश्वासदर्शक ठराव या तीन महत्त्वाच्या बाबी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

वाचा महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स : Eknath Shinde vs Shiv sena LIVE Updates

‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.