नागपुरातील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात, सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होणार

आज सभागृहात नवनिर्वाचित मंत्री आणि सदस्यांचा परिचय करुन दिला जाणार आहे. त्यासोबतच आज अधिवेशनात काही नवीन विधेयक मांडली जाणार आहे.

नागपुरातील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात, सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होणार
नागपूर अधिवेशन
Follow us
| Updated on: Dec 16, 2024 | 8:30 AM

Maharashtra Assembly Winter Session : आजपासून नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. आज सोमवार (१६ डिसेंबर) पासून ते शनिवारी (२१ डिसेंबर) या कालावधीत हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. आज सभागृहात मोठ्या संख्याबळासह पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सत्ताधाऱ्यांच्या बाकावर पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे विरोधकांचे संख्याबळ कमी असले तरी पहिल्याच दिवशी विधिमंडळात खडाजंगी पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात

नागपुरातील हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. आज सभागृहात नवनिर्वाचित मंत्री आणि सदस्यांचा परिचय करुन दिला जाणार आहे. त्यासोबतच आज अधिवेशनात काही नवीन विधेयक मांडली जाणार आहे. त्यामुळे फडणवीस सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन अनेक मुद्द्यांनी गाजणार आहेत.

विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद दिलं जाणार का?

आज होणाऱ्या अधिवेशनात २० विधेयक मांडण्यात येणार आहेत. कापूस, सोयाबीनचे पडलेले दर, ईव्हीएम या मुद्द्यावर हिवाळी अधिवेशन गाजणार आहे. आजपासून सुरु होणारे हिवाळी अधिवेशन महायुती सरकारचे पहिले अधिवेशन असल्याने त्याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. या अधिवेशनात सरकार आणि विरोधी पक्षांच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. या अधिवेशनात विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद दिलं जाणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.

कापूस, सोयाबीनचे पडलेले दर, ईव्हीएम मुद्द्यांवर चर्चा

दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपुरात हिवाळी अधिवेशन होत असल्याने राज्यभरातून नेतेमंडळींसह त्यांचे कुटुंब, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी त्यासोबत अनेक पाहुणेही दाखल झाले आहेत. त्यामुळे आता पुढील सहा दिवस संपूर्ण शहरात राजकीय चर्चा रंगताना दिसणार आहे. महायुती सरकारच्या स्थापनेनंतर 15 व्या विधानसभेचे नियमित होणारे हे पहिलेच अधिवेशन असेल. या अधिवेशनात लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी, कृषी उत्पादनांसाठी हमीभाव, रोजगार आणि इतर अनेक बाबींबर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा आहे. तसेच सरकारकडून यावर काहीतरी ठोस निर्णय घेतले जावे, अशीही अपेक्षा केली जात आहे.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.