काही गोष्टी तुमच्याकडून शिकलो, विधानसभेत देवेंद्र फडणवीस अजितदादांना असं का म्हणाले?

विधानसभेत उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्ही 7-7 वेळा निवडून आलात. आम्ही कमी आलोय. पण काही गोष्टी तुमच्याकडूनच शिकलो.

काही गोष्टी तुमच्याकडून शिकलो, विधानसभेत देवेंद्र फडणवीस अजितदादांना असं का म्हणाले?
Image Credit source: विधानसभा
Follow us
| Updated on: Dec 20, 2022 | 11:37 AM

नागपूरः काही गोष्टी मी तुमच्याकडूनच शिकलो, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अजित पवार यांना लगावला. हिवाळी अधिवेशनात विधानसभेत (Vidhansabha) एका मुद्द्याला उत्तर देताना फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज विधानसभेत विकासकामांच्या स्थगितीचा मुद्दा चांगलाच गाजला. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे-भाजप (Shinde BJP) सरकार आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील विकासकामांना स्थगिती दिल्याचा आरोप अजित पवार यांनी केला.

अजित पवार म्हणाले, सहा महिन्यांपूर्वी शिंदे-फडणवीस यांचं सरकार आलं. त्यापूर्वीच्या सरकारच्या काळात बजेटमध्ये जी कामं मंजूर झाली होती. व्हाइट बुकमध्ये जी कामं आली होती. त्या सगळ्या कामांना स्थगिती देण्यात आली.

लोकशाही मार्गाने मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो. आतापर्यंत अनेक सरकारं बदलली. पण व्हाइट बुकमध्ये आलेली कामं थांबलेली पाहिली नव्हती. ही महाराष्ट्रातलीच कामं आहेत, गुजरात, तेलंगणातली कामं नाहीत. ती का थांबवली, असा सवाल अजित पवार यांनी केला.

उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्ही 7-7 वेळा निवडून आलात. आम्ही कमी आलोय. पण काही गोष्टी तुमच्याकडूनच शिकलो.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार आलं तेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, त्यावेळी आमची सगळी कामं रोखण्याचं काम तुम्ही केलं होतं.

माझ्या स्वतःच्या मतदार संघातली कामं त्यावेळी तुम्ही रोखली होती. सगळ्यांची कामं रोखली. अडीच वर्ष भाजपच्या लोकांना एक नवा पैसा तुम्ही दिला नाही.

पण आम्ही बदल्याची भावना ठेवणार नाही. ज्या काही स्थगित्या दिल्या होत्या, त्यातल्या 70 टक्के स्थगिती रद्द केली आहे. 30 टक्के स्थगिती यासाठी ठेवली आहे की, त्यामध्ये निधी वाटप करताना तरतुदीचा कुठलाही नियम पाळण्यात आलेला नाही.

पाहा पवार आणि फडणवीसांमधली खडाजंगी…

जिथे 2 हजार कोटीची तरतूद आहे, तिथे 6 हजार कोटी वाटलेले आहेत. आमदनी अठन्नी आणि खर्चा रुपैया अशी अवस्था आहे. त्यामुळे हिशोब पाहून बजेट मंजूर होईल.

आवश्यक त्या तरतूदी ठेवल्या आहेत. त्याही संदर्भात योग्य निर्णय आम्ही अवश्य घेऊ. भेदभाव ठेवण्यात येणार नाही, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.