सरकारचं काय चाललंय? एक आमदार धमकी देतो, दुसरा बंदूक काढतो, तिसरा धमक्या देतो-वरुण सरदेसाई
शिवसेना नेते वरुण सरदेसाई यांनी शिंदे सरकारवर भाष्य केलंय.
बीड: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये चालू काय हे कळत नाही, एक आमदार धमकी देतो, दुसरा बंदूक काढतो, तिसरा धमक्या देतो, असं म्हणत शिवसेना नेते वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी शिंदेगटावर निशाणा साधलाय. कोकणातील जनता शिवसेनेशी बांधिल आहे. आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) उस्फुर्त प्रतिसाद मिळतोय. मुंबई महानगर पालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल, असंही ते म्हणाले आहेत.