BJP MLA corona | राष्ट्रवादी आणि काँग्रेसनंतर आता भाजप आमदाराला कोरोनाची बाधा

भाजपच्या आमदाराला कोरोनाची बाधा झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील या भाजप आमदाराला कोरोना झाल्याचं आज उघड झालं आहे. Maharashtra BJP MLA corona positive

BJP MLA corona | राष्ट्रवादी आणि काँग्रेसनंतर आता भाजप आमदाराला कोरोनाची बाधा
Follow us
| Updated on: Jun 25, 2020 | 2:13 PM

भिवंडी : महाराष्ट्रातील आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसनंतर आता भाजपच्या आमदाराला कोरोनाची बाधा झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील या भाजप आमदाराला कोरोना झाल्याचं आज उघड झालं आहे. या आमदारांचा आजच कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांना ताप आणि घसा खवखवण्याचा त्रास होता. लक्षणे दिसल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी केली असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. (Maharashtra BJP MLA corona positive)

यापूर्वी ठाकरे सरकारमधील तीन मंत्र्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. सर्वात आधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मग सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. या तिघांनीही कोरोनावर मात केली आहे.

तीनच दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. संध्याकाळी चारच्या सुमारास धनंजय मुंडेंना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडताना धनंजय मुंडे यांनी हात उंचावून आणि हात जोडत डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले होते. रुग्णालयातून डिस्चार्ज दिला असला तरी नियमानुसार पुढील 14 दिवस धनंजय मुंडे यांना होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे.

त्याआधी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही कोरोनावर मात केली. अशोक चव्हाण यांना 4 जून रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे 25 मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु (Ashok Chavan recovers from COVID) होते.

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची वाढ 

राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण वाढत असलं तरी दुसरीकडे कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. राज्यात काल दिवसभरात तब्बल 3 हजार 890 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 42 हजार 900 वर पोहोचली आहे. यापैकी 73 हजार 792 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 62 हजार 354 रुग्णांवर उपचार सुरु आहे.

(Maharashtra BJP MLA corona positive)

संबंधित बातम्या 

धनंजय मुंडे यांना कोरोना, ठाकरे सरकारमधील काही मंत्रीही सेल्फ क्वारंटाईन

Dhananjay Munde Corona Free | धनंजय मुंडेंची कोरोनावर मात, हात जोडून डॉक्टर, नर्ससह आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार   

सामान्यांची एकच, मग धनंजय मुंडेंची दोन वेळा कोरोना चाचणी का?, किरीट सोमय्यांचा सवाल  

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.