‘सापाच्या पिलाला 30 वर्षे दूध पाजलं, पिल्लू वळवळ करत होतं, आता ते आमच्यावर फुत्कारतंय’, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवत महाविकास आघाडीही भाजपला जशास तसं प्रत्युत्तर देणार असल्याचं स्पष्ट केलंय. भुजबळ यांच्या रामटेक बंगल्यावर झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी भाजपला थेट सापाची उपमा दिलीय.

'सापाच्या पिलाला 30 वर्षे दूध पाजलं, पिल्लू वळवळ करत होतं, आता ते आमच्यावर फुत्कारतंय', उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीची बैठकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 11:41 PM

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget Session) पूर्वसंध्येलाच हे अधिवेशन किती तापणार हे स्पष्ट झालंय. कारण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा आपला इरादा स्पष्ट केलाय. त्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवत महाविकास आघाडीही भाजपला जशास तसं प्रत्युत्तर देणार असल्याचं स्पष्ट केलंय. भुजबळ यांच्या रामटेक बंगल्यावर झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी भाजपला थेट सापाची उपमा दिलीय.

‘..मग दाऊदच्या मुसक्या का आवळत नाहीत?’

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावरील आरोपांवरुन भाजपनं अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला घेरण्याची तयारी केलीय. अशावेळी आज भुजबळांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारमधील नेते, मंत्री आणि आमदारांची उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. सध्या देशात एक विकृती आहे. एक घृणास्पद राजकारण सुरु आहे. विकृतीपेक्षा घाणेरडेपणा पाहायला मिळतोय. हिम्मत असेल तर दाऊदला शोधून का आणत नाहीत. तिकडे पाकिस्तानला जाऊन नवाज शरिफचा केक खाता, थडग्यांवर माथा टेकवता, मग दाऊदच्या मुसक्या का आवळत नाही? असा तिखट सवाल मुख्यमंत्र्यांनी भाजपला विचारलाय.

Mahavikas Aghadi 1

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीची महत्वाची बैठक

माझे 170 मोहरे फोडून दाखवाच, ठाकरेंचं आव्हान

‘आज इकडे धाड पाडत आहेत, तिकडे धाड पाडत आहेत, याला अटक करत आहेत, त्याला अटक करत आहेत. मात्र, आता हे खपवून घेतलं जाणार नाही. आपली एकजूटच आपली ताकद आहे. आम्ही कुणावर वार करत नाही, पण कुणी वार केला तर आम्ही सोडणार नाही’, असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी भाजपला दिलाय. त्याचबरोबर सरकार पाडणार, सरकार पाडणार म्हणतात. माझे 170 मोहरे फोडून दाखवाच. मला सोडून ते तुमची गुलामगिरी पत्करणार नाहीत, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजला थेट आव्हान दिलंय.

इतर बातम्या :

‘मिर्चीची सवय लागली असेल तर सामान्यांच्या कराच्या पैशाची चहा गोड कशी लागणार?’, अतुल लोंढेंचा फडणवीसांचा टोला

VIDEO: संजय राठोड, दाऊद ते मलिक, फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतले 7 मोठे मुद्दे, ठाकरे सरकारची घेराबंदी?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.