Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अधिवेशनाची सुरुवात राजीनाम्याने, शेवट बदलीने, देवेंद्र फडणवीसांच्या आक्रमकतेला अभ्यासाची जोड

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्त्वातील विरोधी पक्ष भाजपने सत्ताधारी ठाकरे सरकारला (Thackeray Sarkar) बॅकफूटवर ढकलल्याचं स्पष्ट चित्र आहे.

अधिवेशनाची सुरुवात राजीनाम्याने, शेवट बदलीने, देवेंद्र फडणवीसांच्या आक्रमकतेला अभ्यासाची जोड
Sanjay Rathod_Devendra Fadnavis_Sachin Vaze
Follow us
| Updated on: Mar 10, 2021 | 12:30 PM

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्त्वातील विरोधी पक्ष भाजपने सत्ताधारी ठाकरे सरकारला (Thackeray Sarkar) बॅकफूटवर ढकलल्याचं स्पष्ट चित्र आहे. कारण अर्थसंकल्पीय अधिवेशनाची (Maharashtra assembly budget session) सुरुवात संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या राजीनाम्याने, तर शेवट API सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या बदलीने झाला आहे. विरोधी पक्षाच्या पाठपुराव्याचं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या प्रशासकीय पकडीचं हे यश आहे. (Maharashtra budget session start with Sanjay Rathod resignation end with Sachin Vaze transfer Devendra Fadnavis speech)

कायद्याची जाण, प्रशासकीय पकड, वेगवेगळ्या विषयांचा आवाका आणि आक्रमकता  या जोरावर देवेंद्र फडणवीसांनी या अधिवेशनात चौकार-षटकार ठोकल्याचं चित्र आहे. त्याचाच परिणाम म्हणून संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला, तर बदली झालेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

पहिला षटकार – संजय राठोड यांचा राजीनामा

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात तत्कालिन वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. त्यामुळे अधिवेशनात सरकारची  कोंडी होणार हे निश्चित होतं. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा अधिवेशनापूर्वी म्हणजे 28 फेब्रुवारीला राजीनामा घेतला.  संजय राठोड यांच्या ऑडिओ क्लिपपासून ते पूजा चव्हाणच्या मेडिकल रिपोर्टपर्यंत भाजपने सर्व मांडणी नियोजित करुन, संजय राठोड यांचा राजीनामा घ्यायला ठाकरे सरकारला भाग पाडलं.

विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन

दुसरा दणका –  सचिन वाझे यांची बदली 

दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनीच मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात अंत्यत अभ्यासू मांडणी सभागृहात केली. इतकंच नाही तर त्यांची अजूनही प्रशासनावर किती पकड आहे, याची चुणूक यानिमित्ताने दाखवली. मनसुख हिरेन यांची चोरीला गेलेली गाडी सचिन वाझेंकडेच होती, सचिन वाझे हे मनसुख हिरेन यांना ओळखत होते हे फडणवीसांनी पुराव्यासह दाखवलं. त्यासाठी त्यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल यांचा जबाबच सभागृहात वाचून दाखवला. इतकंच नाही तर थेट फडणवीसांनी थेट CDR मिळवून, ठाकरे सरकारला खुलं आव्हान दिलं. सचिन वाझे यांनी मनसुख हिरेन यांची हत्या घडवल्याचा त्यांच्या पत्नीचा आरोप आहे, हे ठणकावून सांगत, फडणवीसांनी वाझेंना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.

देवेंद्र फडणवीस यांची कायद्याची उत्तम जाण ही त्यांची जमेची बाजू आहेच, पण वेगवेगळ्या विषयांचा आवाका आणि आक्रमकताही यामुळे ठाकरे सरकार बॅकफूटवर गेलं.

गृहमंत्र्यांची घोषणा

सचिन वाझेंना क्राईम ब्राँचमधून दुसऱ्या ठिकाणावर पाठवणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत घोषित केले. तर, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सचिन वाझेंच्या अटकेची मागणी केली. मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी भाजपनं मंगळवारी विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील केली होती.

महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन

सन 2021 अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार दि. 01 मार्च 2021 ते दिनांक 10 मार्च 2021 पर्यंत विधान भवन, मुंबई येथे होत आहे. राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना करून या अधिवेशनाचे नियोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. 8 मार्च रोजी राज्याचा 2021-22 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

संबंधित बातम्या 

सचिन वाझेंना क्राईम ब्रँचमधून काढणार; अनिल देशमुख यांची मोठी घोषणा 

संजय राठोड यांचा राजीनामा, आता वनमंत्रिपदाची धुरा कोणाला?

(Maharashtra budget session start with Sanjay Rathod resignation end with Sachin Vaze transfer Devendra Fadnavis speech)
दादांच्या बीड दौऱ्याला दांडी अन् फॅशन शोला हजेरी, बघा नेमकं काय खरं?
दादांच्या बीड दौऱ्याला दांडी अन् फॅशन शोला हजेरी, बघा नेमकं काय खरं?.
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास.
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.