Maharashtra Cabinet Expansion 2022 : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, शिंदे गटात कुणाला मंत्रीपद? जाणून घ्या…

Maharashtra Cabinet Expansion 2022 :  कुणाला कोणतं मंत्रीपद मिळणार, कुणाला कॅबिनेट मंत्रीपद मिळणार, याचीची चर्चा रंगली होती. आजअखेर यावर पुर्नविराम लागला. शिंदे गटाली कोणत्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळालंय? जाणून घ्या...

Maharashtra Cabinet Expansion 2022 : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, शिंदे गटात कुणाला मंत्रीपद? जाणून घ्या...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्रीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 1:16 PM

मुंबई :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दोनच मंत्री शिंदे-फडणवीस सरकारमध्ये असल्यानं त्यांच्यावर टीका होत होती. मात्र, आता मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion 2022) पार पडला असून यामध्ये शिंदे गटाच्या अनेक आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये दीपक केसरकर, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील यांचा समावेश आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार शिंदे गटाच्या आमदारांनी बंड केल्यानंतर पडलं. त्यानंतर शिंदे गटाकडे एक-एक आमदार फुटून गेले. यावरुन या आमदारांना विशेष ऑफर म्हणजेच मंत्रीपदाची ऑफर दिल्याचंही बोलल्या गेलं. तेव्हापासून मंत्रीपदाची चर्चा आहे. कुणाला कोणतं मंत्रीपद मिळणार, कुणाला राज्यमंत्रीपद, कुणाला कॅबिनेट मंत्रीपद मिळणार, याचीची चर्चा रंगली होती. आजअखेर यावर पुर्नविराम लागला असून शिंदे गटाली आमदारांना मंत्रीपदात स्थान मिळालंय. कुणाला मंत्रपद मिळालंय जाणून घ्या…

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार

मंत्रिमंडळ विस्तार – शिंदे गटाचे मंत्री

  1. संदिपान भूमरे
  2. तानाजी सावंत
  3. गुलाबराव पाटील
  4. दीपक केसरकर
  5. शंभुराजे देसाई
  6. दादा भुसे
  7. उदय सामंत
  8. अब्दुल सत्तार
  9. संजय राठोड

शिंदे गटातील मंत्र्यांची संपूर्ण माहिती, त्यांची राजकीय कारकिर्द जाणून घ्या…

शिंदे गटाचे मंत्री – गुलाबराव पाटील

कारकिर्द

  1. 1999 – विधानसभेवर पहिल्यांदा निवडून गेले
  2. 2004 – विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा विजयी
  3. 2009 – विधानसभेला पराभव, शिवसेना उपनेतेपदी निवड
  4. 2014 – विधानसभा निवडणुकीत विजयी
  5. 2016-2019 – फडणवीसांच्या मंत्रिमंडळात सहकार राज्यमंत्री म्हणून कामकाज
  6. 2019 – विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा विजय जानेवारी
  7. 2020 – ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी

शिंदे गटाचे मंत्री – दीपक केसरकर

कारकिर्द

  1. काँग्रेसी विचारसरणीचा पुरस्कार करत काँग्रेसमधून राजकारणाला सुरुवात
  2. सावंतवाडी पालिकेतून राजकीय कारकीर्द सुरु
  3. काँग्रेसमध्ये असताना राष्ट्रवादीचे नेते प्रवीण भोसलेंशी जवळीक
  4. 2009 ची विधानसभा निवडणूक टर्निंग पॉईंट ठरली
  5. प्रवीण भोसलेंना शह देत राष्ट्रवादीकडून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी
  6. केसरकरांना आमदार म्हणून निवडून आणण्यात नारायण राणेंची महत्वाची भूमिका
  7. 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर शिवसेनेत प्रवेश
  8. 2014च्या विधानसभेत शिवसेनेकडून आमदार म्हणून निवडून आले
  9. 2014 च्या फडणवीस सरकारमध्ये केसरकरांवर गृहराज्यमंत्री पदासह अर्थ व वित्त विभागाची जबाबदारी
  10. महाविकास आघाडी स्थापन झाल्याने शिवसेनेवर नाराज होऊन शिंदे गटात सामील

शिंदे गटाचे मंत्री – उदय सामंत

कारकिर्द

  1. 2004मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर पहिल्यांदा आमदार
  2. 2004पासून रत्नागिरीतून सलग चार वेळा आमदार
  3. 2009 साली राष्ट्रवादीच्या तिकीटावर आमदार
  4. 2013 ते 2014 नगरविकास राज्यमंत्री
  5. 2013 ते 2014 पालकमंत्री
  6. 2014च्या आधी पुन्हा शिवसेनेत प्रवेश
  7. 2019 मध्ये मविआ सरकारमध्ये उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

शिंदे गटाचे मंत्री – संदिपान भुमरे

कारकिर्द

  1. संदिपान भुमरे हे औरंगाबादमधील शिवसेनेचे दिग्गज नेते
  2. भुमरे यांचा जन्म 13 जुलै 1963 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड बुद्रुक येथे झाला
  3. शिक्षण इयत्ता दहावीपर्यंत झालं आहे
  4. एक मुलगा आणि दोन मुली आहेत.
  5. शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे.
  6. 1995 पासून ते पैठण मतदारसंघातून सलग पाच वेळा ते विधानसभेवर आमदारपदी निवडून आले आहेत.
  7. ठाकरे कॅबिनेटमध्ये त्यांच्यावर फलोत्पादन आणि रोजगार हमी विभागाचे मंत्री आहेत.

शिंदे गटाचे मंत्री – दादा भुसे

कारकिर्द

  1. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार
  2. शिवसेनेसाठी मोलाचा वाटा
  3. मालेगावमधील हिरे घराण्याच्या वर्चस्वाला भुसेंकडून हादरा
  4. पहिल्या विधानसभा निवडणुकीत पराभव
  5. 2004 मध्ये पहिल्यांदा आमदार
  6. तेव्हापासूीन सलग आमदार
  7. 2019 ठाकरे सरकारमध्ये कृषीमंत्री

शिंदे गटाचे मंत्री -तानाजी सावंत

कारकिर्द

  1. 2015मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत दाखल
  2. भाजप आणि युती सरकारच्या काळात विधान परिषदेवर निवडून आले
  3. फडणवीस सरकारच्या काळात त्यांना जलसंधारण खातं मिळालं
  4. 2019 ला उस्मानाबादमधील परंडा भूम मतदार संघातून विजयी

शिंदे गटाचे मंत्री – अब्दुल सत्तार

कारकिर्द

  1. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार
  2. मविआ सरकारमध्ये महसूल आणि ग्रामविकास खात्याचे राज्यमंत्री
  3. कॉंग्रेसच्या मंत्रीमंडळात काही महीने कॅबिनेट मंत्री
  4. 2001 साली विधानपरिषदेवर आमदार

शिंदे गटाचे मंत्री – शंभूराज देसाई

कारकिर्द

  1. साताऱ्याच्या पाटण विधानसभा मतदार संघातून तीन वेळा आमदार
  2. मविआ सरकारमध्ये गृहराज्यमंत्री म्हणून काम
  3. पाच वेळा विधानसभा तालीका अध्यक्ष म्हणून काम
  4. उत्कृष्ट संसदपट्टू म्हणून गौरव
  5. बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे अध्यक्ष
  6. 1995 ते 1999 युती सरकारमध्ये सहकार परिषेदेचे अध्यक्ष

शिंदे गटाचे मंत्री – संजय राठोड

कारकिर्द

  1. संजय राठोड हे शिवसेनेचे विदर्भातील बडे नेते आहेत
  2. शिवसेनेचे नेते संजय राठोड हे पहिल्यांदा 2004 साली यवतमाळमधील दिग्रस विधानसभा मतदार संघातून विजयी झाले.
  3. त्यानंतर 2009 आणि 2014 अशा दोन्ही वेळा पुन्हा संजय राठोड आमदार म्हणून विधानसभेत गेले.
  4. फडणवीसांच्या 2014 साली राठोड यांच्याकडे यवतमाळच्या सहपालकमंत्रिपदासह महसूल राज्यमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली.
  5. 2019 मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा, त्यांच्याकडे वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्रिपदाचा भार सोपवण्यात आला.
  6. संजय दुलीचंद राठोड हे महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आहेत.
  7. ते दिग्रस विधानसभा मतदार संघातून 2004 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते.
  8. 2009 मध्ये पुन्हा निवडून आले.
  9. 2014 मध्ये त्यांची महाराष्ट्राचे राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली. त्यांना महसूल विभाग देण्यात आला.
  10. यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांची जबाबदारीदेखील देण्यात आली.
  11. 30 डिसेंबर 2019 रोजी त्यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले होते.
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.