फडणवीस यांच्या भेटीला शिंदे गटाचे आमदार आणि मनसेचे नेतेही, सागर बंगल्यावर काय घडतंय?; मंत्र्यांच्या शपथविधीआधी घडामोडी वाढल्या
येथील राजभवनात मंत्री मंडळाचा विस्तार होणार असल्याचे म्हटले जात आहे. आतापर्यंत मुंबईतील राजभवनात नव्या सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाला होता,अपवाद केवळ एकदाच झाला होता. शिवसेनेतून १९९१ साली छगन भुजबळ फूटल्यानंतर भुजबळ आणि राजेंद्र गोड यांचा शपथविधी नागपूरात झाला होता.
महाराष्ट्रात विधानसभेच्या निकाल लागल्यानंतर १२ दिवसांनी सरकार स्थापन झाले. परंतू मंत्री मंडळाच्या विस्तार अद्यापही झालेला नाही. शिवसेना एकनाथ शिंदे गटात आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीत त्यामुळे आमदारांची मंत्री पदासाठी धावपळ सुरु झालेली आहे.उद्या रविवारी नागपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयी रॅली होणार आहे. त्यानंतर नागपूरच्या राजभवनात दुपारी मंत्री मंडळाचा पहिला विस्तार होणार आहे. दिल्लीत पक्ष श्रेष्टींना कोणाला मंत्री करायचे याचे अधिकार एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना दिले आहेत. तरीही या विस्तारात आपले नाव यावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर शिंदे गटाचे आणि मनसेचे देखील आमदार पोहचल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज्यात सरकार स्थानापन्न झाले तरी अद्यापही मंत्री मंडळाचे खाते वाटप झालेले नाही. त्यामुळे महायुतीत कोणाला किती खाती मिळतात याकडे लक्ष लागलेले आहे. भाजपाचे सर्वाधिक आमदार असल्याने भाजपाचे सर्वाधिक २० आमदार मंत्री असणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि अजित दादा गटाचे आमदारांचा क्रमांक लागणार आहे. भाजपाच्या दिल्लीतील पक्ष श्रेष्टींनी अजून नावे ठरविली नसल्याने मंत्री मंडळ विस्ताराला वेळ लागल्याचे म्हटले जात होते. शिंदे गटातील आधीच्या मंत्र्यांपैकी काही मंत्र्यांचा पत्ता कट होणार असल्याचे म्हटले जात आहे. आज शिंदे गटाच्या आणि मनसेच्या आमदारांनी मंत्री पदासाठी सागर बंगल्यावर धाव घेतली आहे.
सागर बंगल्यावर कोण कोण आले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर सातार येथील शिवेंद्रराजे भोसले, कोल्हापूरचे आमदार राहुल आवाडे, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार प्रकाश सोळंके, भाजपचे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिंदे गटाचे संजय शिरसाठ, माजी मंत्री संजय राठोड, आमदार कुमार आयलानी, मनसे नेते राजू पाटील, आमदार संतोष दानवे, आमदार नमिता मुंदडा यांनी धाव घेतली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे जर डाळ शिजली नसल्याने सजय राठोड आणि संजय शिरसाट यांनी सागर बंगल्यावर धाव घेतल्याचे म्हटले जात आहे.