आदिती तटकरे, मकरंद पाटील, राजेश टोपे, राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra cabinet Expansion) डिसेंबर महिन्याच्या अखेरीस होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra cabinet Expansion) डिसेंबर महिन्याच्या अखेरीस होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी (Maharashtra cabinet Expansion) शिवसेना आणि राष्ट्रवादीची यादी तयार आहे, मात्र काँग्रेसचे सर्व निर्णय दिल्लीतून होत असल्याने, त्यांना वेळ लागत असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.
दरम्यान, राष्ट्रवादीकडून मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. आदिती तटकरे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची सूत्रांची माहिती आहे. महत्त्वाचं म्हणजे माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न देता, त्यांना पक्षबांधणीची जबाबदारीसाठी प्रदेशाध्यक्षपद देण्याची शक्यता आहे.
शिवाय राष्ट्रवादीचे साताऱ्यातील नेते शशिकांत शिंदे यांनाही विधानपरिषदेवर घेऊन मंत्रिपद दिलं जाण्याची चिन्हं आहेत. शशिकांत शिंदे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. मात्र त्यांना विधानपरिषेदवर पाठवून, मंत्रिमंडळात स्थान
राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य मंत्री नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, शशिकांत शिंदे, राजेश टोपे आणि मकरंद पाटील यांची नावं मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.
शरद पवार-मुख्यमंत्र्यांची भेट
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल सह्याद्री अतिथी गृहावर भेट झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे.
शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्याबाबत चर्चा झाल्याचीही माहिती समोर आली आहे. खडसे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात खडसेंच्या मुद्यावरही रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे खडसे नेमकं कोणत्या पक्षात जाणार यावर अद्यापही प्रश्नचिन्ह कायम आहे.