राज्यमंत्रिमंडळ विस्तार, जयदत्त क्षीरसागर, अनिल परब यांची नावं चर्चेत

मुंबई : लोकसभा निवडणूक निकालानंतर केंद्रातील मंत्रिमंडळ आणि महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला स्थान मिळणार याची उत्सुकता असतानाच, इकडे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कुणाचा समावेश होणार याबाबतही आडाखे बांधणे सुरु झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद वाट्याला येऊ शकतं. शिवसेनेच्या वाट्याला काय? शिवसेनेला […]

राज्यमंत्रिमंडळ विस्तार, जयदत्त क्षीरसागर, अनिल परब यांची नावं चर्चेत
Follow us
| Updated on: May 28, 2019 | 5:02 PM

मुंबई : लोकसभा निवडणूक निकालानंतर केंद्रातील मंत्रिमंडळ आणि महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला स्थान मिळणार याची उत्सुकता असतानाच, इकडे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कुणाचा समावेश होणार याबाबतही आडाखे बांधणे सुरु झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद वाट्याला येऊ शकतं.

शिवसेनेच्या वाट्याला काय?

  • शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद मिळू शकते.
  • विधानपरिषदेतील शिवसेनेचे गटनेते अड. अनिल परब यांची मंत्रिपदी वर्णी लागू शकते.
  • राष्ट्रवादी काँग्रेसमधून नुकतेच शिवसेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपद देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात येण्याची शक्यता आहे. क्षीरसागर बीडमधील आहेत. मराठवड्यात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न होतील.

राज्यात मंत्रिमंडळ विस्तार अपेक्षित असताना शिवसेनेतील परिस्थिती.

सध्या शिवसेनेकडे पाच कॅबिनेट आणि पाच राज्यमंत्री पदे आहेत

  • एकनाथ शिंदे, MSDRC ( सार्वजनिक बांधकाम) मंत्री, तसेच डॉ. दीपक सावंत यांच्या आरोग्य खात्याचा पदभार शिंदे यांच्याकडे आहे.
  • सुभाष देसाई, उद्योग मंत्री
  • रामदास कदम, पर्यावरण मंत्री
  • दिवाकर रावते, परिवहन मंत्री

राज्यमंत्री

  • अर्जुन खोतकर
  • रवींद्र वायकर
  • दादा भुसे
  • संजय राठोड
  • विजय शिवतारे

लोकसभा निवडणूक निकाल

निवडणूक आयोगाने 2019 ची मतमोजणी संपल्यानंतर अंतिम निकालाची घोषणा केली. भाजपप्रणित एनडीएने 352 जागा मिळवत पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. तर काँग्रेसला केवळ 52 जागांवर विजय मिळाला. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. यामध्ये त्यात वाढ झाली असली, तरी स्वत: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचाच अमेठीत पराभव झाला. राहुल गांधी दोन जागेवर उभे होते, त्यापैकी केरळमधील वायनाड इथे त्यांचा मोठा विजय झाला.

लोकसभा निकाल

दरम्यान, लोकसभा निकालात महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीने 48 पैकी 41 जागी यश मिळवलं. यामध्ये भाजपने 23 तर शिवसेनेने 18 जागी विजय मिळवला. काँग्रेसला अवघी 1 तर राष्ट्रवादीला नवनीत राणांसह 5 जागा मिळाल्या. वंचित बहुजन आघाडीकडून लढणाऱ्या एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी औरंगाबादची जागा काबीज केली.

देशाचा निकाल

  • भाजप + = 352
  • काँग्रेस + = 87
  • इतर + = 103
  • एकूण = 542

महाराष्ट्राचा निकाल

  • भाजप – 23
  • शिवसेना- 18
  • राष्ट्रवादी – 5
  • काँग्रेस – 1
  • वंचित आघाडी – 1
  • एकूण – 48

संबंधित बातम्या  

आदित्य ठाकरे शिवसेनेकडून उपमुख्यमंत्रीपदाचा चेहरा?

Ajit Pawar Exclusive : ‘मावळमधील पराभवाची जबाबदारी अजित पवारची’   

Balu Dhanorkar | महाराष्ट्रात काँग्रेसचा एकमेव खासदार नेमका कसा जिंकला?    

राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम, पृथ्वीराज चव्हाण अध्यक्षपदाच्या शर्यतीत 

स्पेशल रिपोर्ट : वांद्रे ते वरळी, आदित्य ठाकरेंसाठी मतदारसंघ कोण सोडणार? 

महाराष्ट्राचा महापोल : उद्या निवडणूक झाल्यास महाराष्ट्रातील चित्र काय? 

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.