सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, काँग्रेसचं शिष्टमंडळ सोनिया गांधींच्या भेटीला
महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यावरुन भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे. या सर्व राजकारणात आता काँग्रेसनेही आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे (Congress Leaders Meet Sonia Gandhi). त्यासाठी प्रदेश काँग्रेसचं शिष्टमंडळ आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.
नवी दिल्ली : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यावरुन भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे. या सर्व राजकारणात आता काँग्रेसनेही आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे (Congress Leaders Meet Sonia Gandhi). त्यासाठी प्रदेश काँग्रेसचं शिष्टमंडळ आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत, त्यानंतर काँग्रेसची नेमकी भूमिका स्पष्ट होईल (Congress Leaders Meet Sonia Gandhi).
या शिष्टमंडळात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश आहे. काँग्रेसच्या या तीन नेत्यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांचीही (NCP Sharad Pawar) भेट घेतली होती. शरद पवारांनीच त्यांना सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करण्याचा सल्ला दिला. राज्यातील सद्य स्थिती पाहता कुठला निर्णय घ्यायला हवा त्याबाबत सोनिया गांधी मार्गदर्शन करु शकतील, असं शरद पवार यांनी सांगितलं. त्यानंतर काँग्रेसचं हे शिष्टमंडळ नवी दिल्लीसाठी रवाना झालं आणि आज ते सोनिया गांधी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा करणार आहे.
युतीत पेच कायम
दुसरीकडे, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांनंतर राजकीय वातावरण तापलेलं आहे (BJP-Shivsena Alliance). निवडणुकांनंतर युतीने बहुमताचं सरकार स्थापन करणे अपेक्षित होते, मात्र तसं न होता आता युतीतच फूट पडल्याचं चित्र आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीच्या ठरलेल्या 50-50 च्या फॉर्म्युल्याप्रमाणे अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मागितलं आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा कुठलाही फॉर्म्युला ठरला नसल्याचं सांगितलं. त्यामुळे युतीमध्ये तेढ निर्माण झाली आहे.
आता शिवसेनेने सरकार स्थापनेसाठी भाजपवर दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी शिवसेनेने विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठीही सुरु केल्या आहेत. मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली आहे, तर भाजप मात्र या विषयावर उडवाउडवीचे उत्तरं देत आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात नेमकं कुणाचं सरकार स्थापन होणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.