‘लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यू हा बोगसपणा’, खासदार सुजय विखे-पाटलांची भूमिका

लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यू बोगसपणा आहे, याची आवश्यकता नाही. कुणालाही दंड करण्यात येऊ नये. लग्न समारंभ होत राहतील आणि झालेच पाहिजेत. समारंभाजाला गर्दीची मर्यादा ठेवली तरी लोकांचं प्रेम असतं ते येत असतात. मात्र, लोकांनीही लग्नाला आल्यानंतर नियम पाळावे, मास्क घालावा. पंतप्रधान मोदीही तेच सांगत आहेत, असं सुजय विखे पाटील म्हणाले.

'लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यू हा बोगसपणा', खासदार सुजय विखे-पाटलांची भूमिका
सुजय विखे-पाटील, लॉकडाऊन
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 4:27 PM

अहमदनगर : राज्यात आणि मुंबईत कोरोना (Corona Outbreak) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच नव वर्षाच्या स्वागतसाठी विविध कार्यक्रम आणि समारंभाचं आयोजन करण्यात येण्याची शक्यता आहे. अशावेळी राज्य सरकारकडून नव वर्षाच्या (New Year) स्वागतासाठी करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना मनाई केली आहे. तसेच चौपाट्यांवर गर्दी न करण्याचं आवाहन केलं असून सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजप खासदार सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी आपलं रोखठोक मत व्यक्त केलंय. लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यू हा बोगसपणा आहे, याची काही आवश्यकता नाही, असं मत सुजय विखे यांनी व्यक्त केलं आहे.

लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यू बोगसपणा आहे, याची आवश्यकता नाही. कुणालाही दंड करण्यात येऊ नये. लग्न समारंभ होत राहतील आणि झालेच पाहिजेत. समारंभाजाला गर्दीची मर्यादा ठेवली तरी लोकांचं प्रेम असतं ते येत असतात. मात्र, लोकांनीही लग्नाला आल्यानंतर नियम पाळावे, मास्क घालावा. पंतप्रधान मोदीही तेच सांगत आहेत. आपण प्रत्येकवेळी निर्बंध टाकू शकत नाही. माणसानं जगायचं कसं? असा सवाल सुजय विखे-पाटील यांनी विचारलाय.

‘स्वत:ला सुरक्षित ठेवणे हाच एक मार्ग’

लग्न-समारंभावर उपजीविका असणारे अनेक कामगार असतात. त्यांनाही मुलंबाळं असतात. लॉकडाऊन करण्यात आला तर त्यांना कोण खाऊ घालणार? अशावेळी स्वत:च आपली जबाबदारी ओळखून, स्वत:ला सुरक्षित ठेवून लसीकरण करुन घेणं, हाच एकमेव मार्ग बाकी आहे. कोणत्याही गोष्टीचं मी समर्थन करत नाही, असंही सुजय विखे-पाटील यावेळी म्हणाले.

पार्टी-सेलिब्रेशनला बंदी

वाढत्या कोव्हिड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन पार्ट्यांना आधीच चाप लावण्यात आला आहे. रेस्टॉरंट, हॉटेल, बार, पब, रिसॉर्ट, क्लब यासारख्या कुठल्याही खुल्या किंवा बंदिस्त जागी 30 डिसेंबर ते 7 जानेवारी या काळात न्यू इयर सेलिब्रेशनसाठी जमता येणार नाही.

काय आहेत आदेश?

“30 डिसेंबर 2021 च्या मध्यरात्री बारा वाजल्यापासून 7 जानेवारीच्या रात्री बारा वाजेपर्यंत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व जागी हे आदेश लागू असतील” असं आदेशात म्हटलं आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असेल. याशिवाय महामारी कायदा 1897 आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि इतर कायदेशीर तरतुदींखालील कारवाई केली जाईल, असंही यात म्हटलं आहे.

इतर बातम्या :

शरद पवारांची परंपरा खोटं बोलण्याची, मोदींची पवारांना कोणती ऑफर? वाचा सविस्तर

Sugarcane Sludge : ऊसाचे गाळप कासवगतीने, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा पाथरी येथे रास्तारोको

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.