‘देवेंद्रजींसह सर्वांना हात जोडून विनंती’, नितीन गडकरींचं भाजप नेते, कार्यकर्त्यांना महत्वाचं आवाहन
कोरोना काळात आधी स्वत:ची तब्येत सांभाळा, कुटुंबियांना जपा आणि शक्य होईल तसं सगळी कामं ऑनलाईन करा, असं आवाहन गडकरी यांनी केलं आहे.
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी होताना पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. अशावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अन्य भाजप नेते, कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती केलीय. कोरोना काळात आधी स्वत:ची तब्येत सांभाळा, कुटुंबियांना जपा आणि शक्य होईल तसं सगळी कामं ऑनलाईन करा, असं आवाहन गडकरी यांनी केलं आहे. (Nitin Gadkari’s important advice to BJP leaders including Devendra Fadnavis)
गडकरींचा फडणवीसांना प्रेमळ सल्ला
देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. त्यावरुन गडकरी यांनी फडणवीसांना प्रेमळ सल्ला दिलाय. ‘देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच गडचिरोली दौरा केला. आवश्यक आहे जणं. पण त्यावेळी त्यांच्या गाडीत किती लोकं होती? आता सर्व काम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने करा. आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सोय आहे. उगाच कुणाच्या घरी जाऊ नका. त्यांच्याशी फोनवर संपर्क साधा. तुम्ही जेवढं लाईटली घेत आहात तेवढं हे साधं नाही. आपण अनेक कार्यकर्ते गमावले आहेत’, अशा शब्दात गडकरी यांनी फडणवीसांना दौरे टाळण्याची विनंती केलीय.
‘आपला जीव वाचला तर पुढे काही करता येईल’
आता अन्य रस्ते, पुल, पक्षाची जी कामं असतील ती महत्वाची आहेतच. पण ती कामंही घरुन घरा. आता येणाऱ्या काळात कार्यकर्त्यांना गमावणं हे आपल्याला परवडणारं नाही. ही पार्टी वगैरे जी काम आहेत ती महत्वाची आहेत. पण आधी आपला जीव वाचला तर पुढे काही करता येणार आहे. त्यामुळे आता पहिली प्रायॉरिटी ही आपला जीव, आपलं कुटुंब. दुसरी आपल्या घराच्या सगळ्या आर्थिक व्यवस्था आणि मग तीसरी प्रायॉरिटी आपला पक्ष, समाज. भावनेच्या भरात आपण अनेक बाबी विसरुन जातो. पण तसं करुन चालणार नाही, असं आवाहनही गडकरी यांनी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना केलंय.
अशोक चव्हाणांचा गडकरींना फोन का?
राज्यात ऑक्सजिनचा तुटवडा भासत असल्यामुळे बाहेर राज्यातून ऑक्सिजन आणला जात आहे. अशावेळी नांदेडला ऑक्सिजन पुरवठा करणारा एक टँकर विशाखापट्टणच्या एका ट्रान्सपोर्टरने पळवून नेला. त्याबाबत अशोक चव्हाण यांचा आपल्याला फोन आला. त्या ट्रान्सपोर्टरने आपल्याकडे 15 लाख रुपयांची मागणी केल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. त्यानंतर त्याचे टँकर जप्त केले. मी रात्री 12 – 1 वाजता त्या ट्रान्सपोर्टला फोन केला आणि त्याला दाब टाकला. त्याला सांगितलं ही हे बरोबर नाही. नाहीतर तुमच्यावर कारवाई करु, असं गडकरी यांनी सांगितलं.
भाजप नागपूर महानगर कार्यकारिणी बैठकीच्या समारोपप्रसंगी कार्यकर्त्यांशी संवाद. https://t.co/RDy0RpBSVi via @YouTube
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) May 9, 2021
संबंधित बातम्या :
ऑक्सिजन टँकर काळाबाजारावर अशोक चव्हाणांचा गडकरींना फोन, गडकरींचा थेट विशाखापट्टनमला, पहा काय घडलं?
नागपुरातील प्रत्येक ऑक्सिजन टँकरसोबत आता पोलीस! गडकरींची माहिती, मुंबई महापालिका आयुक्तांचंही कौतुक
Nitin Gadkari’s important advice to BJP leaders including Devendra Fadnavis