महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 LIVE : ‘सागर’ वर भाजप नेत्यांची भाऊगर्दी

| Updated on: Nov 22, 2024 | 2:34 PM

Maharashtra Assembly Election Results 2024 LIVE Counting and Updates: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 तारखेला मतदान झालं असून उद्या निकाल लागणार आहेत. निकालाचं काऊंटडाऊन सुरू झालं असून उद्या कोण विजयी गुलाल उधळणार याकडे जनतेचं लक्ष आहे. निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळतील.

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 LIVE :  'सागर' वर भाजप नेत्यांची भाऊगर्दी
maharashtra electionImage Credit source: tv9 marathi

LIVE NEWS & UPDATES

  • 22 Nov 2024 02:58 PM (IST)

    ज्यांचा जास्त जागा, त्यांचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला नाही

    ज्यांचा जास्त जागा, त्यांचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला नाही आणि असा कोणताही फॉर्म्युला होणार नाही, सर्व मिळून मुख्यमंत्री ठरणार असल्याचे संजय राऊत म्हणाले.

  • 22 Nov 2024 02:53 PM (IST)

    सागर बंगल्यावर बैठकीचा महत्त्वाची बैठकीला सुरुवात

    चंद्रशेखर बावनकुळे , मंगलप्रभात लोढा,,भूपेंद्र यादव आणि रावसाहेब दानवे ,पराग शाह, कालिदास कोळंबकर, जयकुमार गोरे, मिहिर कोटे, चित्रा वाघ बैठकीत उपस्थित आहेत. उद्या मतमोजणी नंतर मुख्यमंत्र्यांचे गणित जुळवण्यासाठी भाजपचे सगळे नेते पदाधिकारी जिंकून येणाऱ्या उमेदवार जागेवरील उमेदवारांची देखील सागर बंगल्यावर उपस्थित आहेत.

  • 22 Nov 2024 02:40 PM (IST)

    रत्नागिरी- पाच विधानसभा मतदार संघातील निकाल काही तासात येणार

    रत्नागिरी जिल्ह्यातील  विधानसभा मतदार संघात मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात मतमोजणीचे 26 राऊंड, दापोली विधानसभा मतदार संघात मतमोजणीचे 28 राऊडमध्ये मतमोजणी होईल.

  • 22 Nov 2024 02:30 PM (IST)

    गुलाबराव पाटील यांच्या विजयासाठी देवाला साकडं

    जळगावच्या पाळधी येथे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील त्यांच्या विजयासाठी कार्यकर्त्याने महादेवाला साकडं घातलं आहे. पाळधी येथील महादेवाच्या मंदिरात कार्यकर्त्यांसह लाडक्या बहिणींनी पूजा अभिषेक करत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विजयासाठी साकड घातल आहे..

  • 22 Nov 2024 02:20 PM (IST)

    सर्व्हेची ऐशी की तैशी

    जे सर्व्हे करतात त्यांच्या ऐशी की तैशी,महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकेल, असा दावा संजय राऊत यांनी केला. जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देसाई यांच्यासोबत आम्ही काल सर्व जण बसलो यावर चर्चा झाली. 160 जागा आम्ही सहज जिंकू. एक्झिट पोलवर आमचा विश्वास नाही, असे ते म्हणाले.

  • 22 Nov 2024 02:09 PM (IST)

    “नाद करा.. पण आमचा कुठं?

    निलेश राणे नवनिर्वाचित आमदार असा आशयाचे लागले बॅनर.राज्यात विधानसभा निवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून उद्या मतमोजणी होणार आहे. तत्पूर्वी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मध्ये महामार्गालगत असलेल्या बांबार्ड गावात कुडाळ-मालवण मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवार असलेले निलेश राणे यांचा विजयी शुभेच्छा देण्यात आलेला बॅनर रात्री लावण्यात आला.

  • 22 Nov 2024 02:00 PM (IST)

    उद्या मतमोजणीची तयारी

    जळगाव जिल्ह्यात 11 विधानसभा मतदारसंघासाठी उद्या मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यात अकरा विधानसभा मतदारसंघात प्रत्येक मतदारसंघ निहाय होणार त्या त्या ठिकाणी मतमोजणी होईल.

  • 22 Nov 2024 01:53 PM (IST)

    तो बॉम्बआधी फुटला असता तर…

    वसई, विरारमध्ये नोटांचा बॉम्ब दिसला. तो बॉम्ब आधी फुटला असता तर मोठा स्फोट झाला असता, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुंबई भाजप सचिव सचिन शिंदे यांचा ठाकरे यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. त्यावेळी ते बोलत होते.

  • 22 Nov 2024 01:41 PM (IST)

    निकालांआधीच मुंबई भाजपला धक्का

    निकालांआधीच मुंबई भाजपला धक्का बसला आहे. मुंबई भाजप सचिव सचिन शिंदे यांचा शिवसेना यूबीटीमध्ये प्रवेश करणार आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी मशाल हाती घेणार आहे.

  • 22 Nov 2024 01:30 PM (IST)

    सागर बंगल्यावर भाजपची महत्त्वाची बैठक

    भाजपची सागर बंगल्यावर महत्त्वाची बैठक सुरु झाली आहे. भाजपचे प्रवीण दरेकर, चित्रा वाघ आणि इतर नेतेही या ठिकाणी आले आहे. तसेच मनसेचे बाळा नांदगावकर देखील सागर बंगल्यावर दाखल झाले आहे.

  • 22 Nov 2024 01:23 PM (IST)

    ठाण्यातील चित्र दुपारी दोनपर्यंत स्पष्ट होणार

    ठाण्यातील 18 विधानसभेची मतमोजणी होणाऱ्या केंद्रावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघांमध्ये वागळे इस्टेट या ठिकाणी 14 टेबल असून 26 फेऱ्या होणार आहे. दुपारी दोन पर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार आहे

  • 22 Nov 2024 01:04 PM (IST)

    नाराज उमेदवार आमच्या संपर्कात- काँग्रेस

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे अनेक उमेदवार नाराज आहेत. कारण भाजपनं त्यांच्या मतदारसंघात अपक्षांना मदत केली. त्यामुळे असे नाराज उमेदवार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

  • 22 Nov 2024 01:00 PM (IST)

    शाळेचे गेट पडून विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी दोघा शिक्षकांवर गुन्हा दाखल

    कोल्हापूर जिल्ह्यातील केरलेमध्ये शाळेचे गेट पडून विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी दोघा शिक्षकांवर गुन्हा दाखल. करवीर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल. खराब गेट सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून बाजूला करायला लावल्या प्रकरणी शिक्षकांवर गुन्हा दाखल. गेट बाजूला करत असताना लोखंडी गेट विद्यार्थ्यावर पडून सहावीत शिकणाऱ्या स्वरूप माने या अकरा वर्षीय विद्यार्थ्यांचा झाला होता मृत्यू.

  • 22 Nov 2024 12:34 PM (IST)

    शरद पवार काहीही करु शकतात – संजय शिरसाट

    “शरद पवार काहीही करु शकतात. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं सर्व पदाधिकाऱ्यांना वाटतं. अपक्षांना आमचे दरवाजे खुले. काही अपक्षांच्या संपर्कात आहोत. शरद पवारांच्या भूमिकेबद्दल सगळ्यांमध्ये संभ्रम” असं संजय शिरसाट म्हणाले.

  • 22 Nov 2024 12:18 PM (IST)

    संजय राऊत हायकमांड त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही – नाना पटोले

    संजय राऊत हायकमांड त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही. दुपारी 1 वाजता काँग्रेस उमेदवारांची ऑनलाइन बैठक होईल. सर्व उमेदवारांना 17 सी फॉर्म बंधनकारक केला. पेटोले, चेन्नीथला, थोरात उमेदवारांची बैठक घेणार. महायुतीत गडबड ते काहीतरी पाप करु शकतात असं नाना पटोले म्हणाले.

  • 22 Nov 2024 12:05 PM (IST)

    मुंबईसह ठाण्यात CNG च्या दरात वाढ, वाहन चालकांकडून नाराजी व्यक्त

    महाराष्ट्रात विधानसभेत मतदानाचा टक्का वाढला तर दुसरीकडे महानगर गॅस अर्थात CNG च्या दरात वाढ झालेली आहे. मध्यरात्रीपासून मुंबई आणि ठाणे या ठिकाणी CNG च्या दरात 2 रुपये वाढ झाली आहे. यामुळे वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबद्दल राजकारण्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. या दरवाढीचा फटका महागाई आणि वाहन धारकांना बसणार आहे.

  • 22 Nov 2024 12:02 PM (IST)

    विधानसभा निकालानंतर विजय मिरवणूक काढण्यास बंदी, गुन्हा दाखल होणार

    विधानसभा निवडणुकीत विजयानंतर विजय मिरवणूक काढण्यास पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे. निकाल लागल्यानंतर जल्लोष तसेच मिरवणूक न करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांनी सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना तंबी दिली आहे. छत्रपती संभाजी नगरातील निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत याबद्दलची माहिती दिली आहे. विजय उमेदवारांनी अति उत्साहात मिरवणूक केल्यास गुन्हा दाखल होणार आहे.

  • 22 Nov 2024 11:46 AM (IST)

    सांगोल्यातील शेकाप उमेदवाराला महायुती आणि मविआ नेत्यांचे फोन, कोणाला देणार पाठिंबा?

    पंढरपूर : सांगोल्यात शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांना महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून फोन येण्यास सुरुवात झाली आहे. महाविकासआघाडी आणि महायुतीच्या नेत्यांचे फोन आले असल्याची माहिती बाबासाहेब देशमुख यांनी दिली. शेकाप हा केडर बेस पक्ष (पार्टी )असल्याने कार्यकर्त्यांची चर्चा करून महाविकासआघाडी किंवा महायुतीला पाठिंबा द्यायचा ते ठरवणार असे बाबासाहेब देशमुख म्हणाले.

    शेतकरी कामगार पक्षाने ज्या ज्या वेळेस महाविकास आघाडीच्या नेत्यांना गरज भासली त्यावेळेस मदत केली. मात्र सांगोल्यात महाविकास आघाडीने उमेदवार दिल्याने बाबासाहेब देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता बाबासाहेब देशमुख यांनी विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. निवडून आल्यानंतर सत्कार न स्वीकारता प्रत्येक गावाचं लीड पाहून जेवढे लीड तेवढे वृक्षारोपण करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.

  • 22 Nov 2024 11:35 AM (IST)

    रत्नागिरीत मतमोजणीची तयारी पूर्ण, एकाचवेळी सुरु होणार मतमोजणी

    रत्नागिरी पाच विधानसभा मतदारसंघातील निकाल काही तासात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघात मतमोजणीची तयारी पूर्ण  झाली आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात मतमोजणीचे 26 राऊंड, दापोली विधानसभा मतदार संघात मतमोजणीचे 28 रांऊडमध्ये मतमोजणी होणार आहे. राजापूर विधानसभा मतदार संघात मतमोजणीचे 25 राऊंड, चिपळूण विधानसभा मतदार संघात 24 राऊंडमध्ये मतमोजणी होणार आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघात मतमोजणीचे सर्वात कमी राऊंड 23 राऊंडमध्ये मतमोजणी होणार आहे.

    सर्व टेबलवरची मतमोजणी एकाच वेळी सुरु केली जाणार आहे. टपाली मतदान मोजण्यासाठी वेगळा टेबल असणार आहे. तर सैन्यदलातील ईटीबीएस मतदान मोजण्य़ासाठी 1 स्वंतत्र टेबल असणार आहे.

  • 22 Nov 2024 11:33 AM (IST)

    गुलाबराव पाटील यांच्या विजयासाठी कार्यकर्त्याचे महादेवाला साकडं

    जळगावच्या पाळधी येथे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विजयासाठी कार्यकर्त्याने महादेवाला साकडं घातलं आहे. पाळधी येथील महादेवाच्या मंदिरात कार्यकर्त्यांसह लाडक्या बहिणींनी पूजा अभिषेक करत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विजयासाठी साकड घातलं आहे. लाडक्या बहिणीच्या वतीने मंत्री गुलाबराव पाटील यांचे खंदे समर्थक भूषण महाजन यांनी सपत्नीक पूजा अभिषेक केला. यावेळी पाळधी सह परिसरातील लाडक्या बहिणींची उपस्थिती होती.

  • 22 Nov 2024 11:06 AM (IST)

    Maharashtra News: निकालापूर्वीच ठाकरे गटाचे उमेदवार गजानन लवटे यांच्या विजयाचे बॅनर..

    निवडणूक निकालापूर्वीच अमरावतीच्या दर्यापूर मतदारसंघात झळकले ठाकरे गटाचे उमेदवार गजानन लवटे यांच्या विजयाचे बॅनर… गजानन लवटे प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे लावले बॅनर… दर्यापूर मतदारसंघात ठाकरे गटाचे गजानन लवटे ,शिवसेनेचे अभिजीत अडसूळ आणि युवा स्वाभिमानचे रमेश बुंदिले यांच्यात लढत..

  • 22 Nov 2024 10:37 AM (IST)

    Maharashtra News: चाळीसगावात निकालापूर्वीच झळकले विजयाचे बॅनर….

    मंगेश चव्हाण आमदार पदी पुन्हा एकदा नियुक्त झाल्याबद्दल अभिनंदनाचे बॅनर शहरात झळकले… भाजप युवा मोर्चाकडून शहरात मंगेश चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले… निकालाला एक दिवस बाकी असताना कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला… विकासाचा दुसरा अध्याय लिहिण्यासाठी सज्ज असाही बॅनर वर उल्लेख… चाळीसगाव विधानसभेत भाजपचे मंगेश चव्हाण विरुद्ध शिवसेना उबाठाचे उन्मेश पाटील यांच्यात थेट सामना रंगला होता….

  • 22 Nov 2024 10:20 AM (IST)

    Maharashtra News: छत्रपती संभाजी नगर शहरात निवडणूक निकालावर लागला 50 कोटींचा सट्टा

    छत्रपती संभाजी नगर पश्चिम, पूर्व आणि मध्य विधानसभावर लागला सट्टा… कोण निवडून येणार यासाठी सट्टा बाजार आला तेजीत…. संभाजीनगरच्या निकालाबाबत सट्टा बाजारातील बुक्की देखील संभ्रमात… कोण निवडून येईल याबाबत सट्टा बाजारातही संभ्रम… सर्वाधिक संभ्रम पश्चिम विधानसभा मतदारसंघात…

  • 22 Nov 2024 10:10 AM (IST)

    Maharashtra News: महायुतीकडून अरक्षांना पैशांची ऑफर, याचा अर्थ आम्ही जिंकत आहोत – संजय राऊत

    महायुतीकडून अरक्षांना पैशांची ऑफर, याचा अर्थ आम्ही जिंकत आहोत…. शेकाप, सपाचे आमदार देखील निवडून येत आहेत… एक्झिट पोलवर आमचा विश्वास नाही… सरकार स्थापन करण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही…. असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 22 Nov 2024 10:00 AM (IST)

    26 तारखेला आम्हीच सरकार स्थापन करू – संजय राऊत यांना विश्वास

    महाविकास आघाडी 160 जागा सहज जिंकेल. एक्झिट पोलवर आमचा विश्वास नाही. आम्ही कमीत कमी 160 जागा सहज जिंकू, 26 तारखेला आम्हीच सरकार स्थापन करू असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

  • 22 Nov 2024 09:53 AM (IST)

    मणिपूर सारख्या गंभीर विषयावर काँग्रेस राजकीय फायदा करून घेत आहे – भाजप अध्यक्ष जे पी नड्डांचा आरोप

    नवी दिल्ली  – भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र  लिहीलं आहे.  मणिपूर सारख्या गंभीर विषयावर राजकीय फायदा काँग्रेस करून घेत असल्याचा नड्डा यांचा आरोप आहे.  देशाला कमजोर करणाऱ्या शक्तींना आम्ही पाठिंबा देणार नाही, नड्डा यांनी पत्रात केलं नमूद.

  • 22 Nov 2024 09:39 AM (IST)

    विधानसभा मतमोजणीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून खबरदारी, उद्धव ठाकरेंचा उमेदवारांशी संवाद

    विधानसभा मतमोजणीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या उमेदवारांशी काल व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

    मतमोजणीवेळी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी तसंच उमेदवारांनी काय काळजी घ्यावी, यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि तज्ञांनी उमेदवार आणि प्रमुखांना मार्गदर्शन केलं.  टपाली आणि ईव्हिएम मधील मतमोजणीसंदर्भातील बारकावे,कोणत्या वेळी आक्षेप घ्यावेत, लेखी तक्रार याविषयी मार्गदर्शन करण्यात आले

    लोकसभा निवडणुकीतील उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघात झालेल्या प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी उद्धव ठाकरे आणि पक्षाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.  लोकसभेत झालेल्या प्रकारानंतर ठाकरे गट वारंवार सावध भूमिका घेताना दिसत आहे.

  • 22 Nov 2024 09:34 AM (IST)

    महायुतीचा प्लॅन बी तयार, बहुमतापासून दूर राहिल्यास काय करणार ?

    महायुतीचा प्लॅन बी तयार. बहुमतापासून महायुती दूर राहिल्यास छोट्या छोट्या घटक पक्षाची मोट बांधणार.

    छोट्या छोट्या घटक पक्षाशी महायुतीच्या नेत्यांची बोलणी सुरु असून त्यांना घेऊन महायुती सरकार बनवण्याचाही प्रयत्न असेल. सत्तेतील वाटा देऊन घटक पक्षांना जवळ ठेवणार.

  • 22 Nov 2024 09:29 AM (IST)

    अनिल परब यांना धक्का, अनधिकृत रिसॉर्टला संरक्षण देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

    रत्नागिरी- अनिल परब यांच्या दापोली येथील अनधिकृत साई रिसोर्टला संरक्षण देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्याने परब यांना मोठा धक्का. अनिल परब, सदानंद कदम यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे आता हे रिसॉर्ट पाडावे लागणार,  तसेच 25 लाख रुपये दंडही भरावा लागणार.

    आमच्या तक्रारीनंतर भारत सरकारने CRZ नियमांच्या उल्लंघनामुळे हे रिसोर्ट पाडण्याचे दिले होते आदेश. अनिल परब यांचे रिसॉर्ट तुटणार, किरीट सोमय्या यांनी दावा केला आहे

  • 22 Nov 2024 09:20 AM (IST)

    चेंबूरच्या छेडा नगर येथे पहाटे मुंबई पोलिसांच्या निर्भया वाहनाचा अपघात

    चेंबूरच्या छेडा नगर येथे पहाटे मुंबई पोलिसांच्या निर्भया वाहनाचा अपघात. घाटकोपरहून पेट्रोल भरून येत असताना पोलिस व्हॅनने ट्रेलरला दिली धडक. अपघातात २ पोलिस कर्मचारी जखमी झाले असून जयदीप पाटील आणि साहिल खामकर अशी या दोघांची नावे आहेत

  • 22 Nov 2024 09:19 AM (IST)

    विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी आणि निकाल.

    विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी आणि निकाल. काऊंटडाऊन सुरू होताच नेत्यांची धाकधूक वाढली. कोण बाजी मारणार, विजयी गुलाल कोण उधळणार उद्या होणार स्पष्ट.

महाराष्ट्रातील एकूण 288 मतदारसंघासाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान झालं. राज्यभरात एकूण 65 टक्के मतदान झालं असून 4 हजार 136 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत कैद झालंनिवडणुकीच्या मतदानानंतर आता निकालाचं काऊंटडाऊन सुरू झालं असून अवघ्या 24 तासांच्या आतच उद्या (23 नोव्हेंबर) मतमोजणी सुरू होणार आहे. राज्यात विजयी गुलाल कोण उधळणार , महायुती की महाविकास आघाडी, सत्ता स्थापन कोण करणार या सर्व प्रश्नांची उत्तरं उद्या मिळणार आहेत. राज्यात अनेक बिग फाईट्स असून सर्व राज्याचे लक्ष लागलेल्या अनेक महत्वपूर्ण लढतींमध्येही कोण बाजी मारणार याचीही मतदारांना उत्सुकता आहे. निवडणुकीच्या बातम्यांसह अनेक महत्वपूर्ण बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी दिवसभर फॉलो करा हा ब्लॉग.

Published On - Nov 22,2024 9:17 AM

Follow us
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्.
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?.
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.