कर्जत जामखेडकरांची अवस्था म्हणजे अवघड जागेवरचं दुखणं, सांगताही येईना, बोलताही येईना, राम शिंदेंची रोहित पवारांवर टीका

| Updated on: Oct 21, 2021 | 8:07 AM

कर्जत जामखेडकरांची अवस्था म्हणजे अवघड जागेवरचं दुखणं झालंय. कुणाला सांगताही येईना, बोलताही येईना, अशा शेलक्या शब्दात माजी मंत्री भाजप नेते राम शिंदे यांनी आमदार रोहित पवारांवर टीका केलीय.

कर्जत जामखेडकरांची अवस्था म्हणजे अवघड जागेवरचं दुखणं, सांगताही येईना, बोलताही येईना, राम शिंदेंची रोहित पवारांवर टीका
राम शिंदे आणि रोहित पवार
Follow us on

अहमदनगर : कर्जत जामखेडकरांची अवस्था म्हणजे अवघड जागेवरचं दुखणं झालंय. कुणाला सांगताही येईना, बोलताही येईना, अशा शेलक्या शब्दात माजी मंत्री भाजप नेते राम शिंदे यांनी आमदार रोहित पवारांवर टीका केलीय. जामखेडमधील एका कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांच्या कार्यशैलीवर बोलताना त्यांनी जोरदार फटकेबाजी केली. ग्रामीण शब्दातून आणि फटकेबाजीतून त्यांनी रोहित पवारांवर टीकेचे बाण सोडले.

लोक मला म्हणतात, साहेब आता आमची जिरलीय!

सगळ्यांचे चेहरे बघतोय, सगळ्यांना कसं बरं वाटतयं, मोक्कारच बरं वाटतयं, आता सांगता येईना अन बोलता येईना, निव्वळ अवघड जाग्यावरचं दुखणं झालंय, अशी फटकेबाजी राम शिंदे यांनी केलीय. शेजारच्या गड्याला काम दाखवलं, कशी जिरवली म्हणता, माझी तर जिरलीच, पण आता जेव्हा मी बाहेर आलो, तेव्हा सगळी माणसं म्हणतात, आमचीही जिरली साहेब आता, अशी टोलेबाजी शिंदेंनी. या कार्यक्रमाला खासदार सुजय विखे पाटील देखील उपस्थित होतेय.

रोहित पवार बारामतीचे असूनही कर्जत जामखेडमधून लढले आणि कर्जत-जामखेडकरांच्या आशीर्वादाने आमदार झाले. बाहेरुन येऊनही रोहित पवारांनी राम शिंदेंना हरवलं. याचं शल्य राम शिंदेंच्या मनात अजूनही जाणवतं. अधून मधून एखाद्या जाहीर कार्यक्रमांतून ते आपली खंत बोलून दाखवत असतात. जामखेडच्या एका कार्यक्रमात त्यांनी खंत बोलून दाखवताना जोरदार फटकेबाजी केली.

आता कसं वाटतंय, मोक्कार बरं वाटतंय की नाही!

“आता कसं वाटतंय… मोक्कार बरं वाटतंय की नाही… पण आता काय करणार… सांगताही येईना बोलतानाही येईना… कर्जत जामखेडकरांचं काम म्हणजे अवघड जागेवरचं दुखणं झालंय… सांगता कुणाला… बोलता कुणाला… तुम्ही आमची जिरवली… आता त्यांनी तुमची जिरवली…”, अशा शेलक्या शब्दातून त्यांनी रोहित पवारांवर टीका केली तर तालुक्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. यावर उपस्थितांमध्ये मिनिटा-मिनिटाला खसखस पिकत होती.

कामं गडकरी-विखे करतात, उपस्थितीसाठी पवारांना आग्रह

त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि खासदार सुजय विखे ही मोठ्या मनाची माणसं आहेत. कामं मंजुर करतात आणि शरद पवारांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा आग्रह धरतात. आम्ही प्रयत्न केला आमच्या काळात प्रस्ताव गेले, खासदारांच्या काळात मंजूर झाले पण उपस्थिती शरद पवारांना लावायला लावतात  कारण की नातवाला थोडीफार संधी मिळावी. नाहीतर पारच उचलून टाकल्यावानी होईन, अशी टोलेबाजी करुन राम शिंदेंनी सभा जिंकली.

(Maharashtra EX Minister Ram Shinde Slam Rohit Pawar Karjat kamkhed)

हे ही वाचा :

पुणेकरांनी करुन दाखवलं, कोरोनाला हरवून दाखवलं, महापौर मोहोळांची प्रतिक्रिया वाचून सगळ्यांनाच अभिमान वाटेल!

आम्हाला तिघांना ग्रहण लागलं होतं, अजित पवारांनी विश्वास ठेवला, नाहीतर हे आयुष्यभराचं ग्रहण असतं : धनंजय मुंडे