Maharashtra Floor Test : आम्ही उद्याच्या बहुमत चाचणीत सहभागी होणार, एकनाथ शिंदेंची गुवाहटीतून घोषणा, मुक्कामाबद्दल बोलायला नकार

आम्ही उद्याच्या बहुमत चाचणीत सहभागी होणार असल्याचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटले आहे. मात्र बहुमत चाचणीत सहभागी होणयासाठी मुंबईत येणाऱ्या बंडखोर आमदारांचा मुक्काम नेमका कुठे असणार याबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे.

Maharashtra Floor Test : आम्ही उद्याच्या बहुमत चाचणीत सहभागी होणार, एकनाथ शिंदेंची गुवाहटीतून घोषणा, मुक्कामाबद्दल बोलायला नकार
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 10:43 AM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर बनले आहे. महाविकास आघाडी सरकारला अविश्वास ठरावाचा सामना करावा लागेल हे निश्चित होते. मात्र  तो कधी याबाबत निश्चित कोणालाही अंदाज नव्हता. अखेर तो दिवस आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे पत्र पाठवले आहे. उद्याच बहुमत सिद्ध करण्यास देखील सांगितले आहे. आम्ही उद्याच्या बहुमत चाचणीत सहभागी होणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मात्र बहुमत चाचणीत सहभागी होणयासाठी मुंबईत येणाऱ्या बंडखोर आमदारांचा मुक्काम नेमका कुठे असणार याबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे.  शिवसेनेतून (shivsena) 40 पेक्षा अधिक आमदार हे शिंदे गटात सहभागी झाल्याने ही बहुमत चाचणी महाविकास आघाडीसाठी अग्निपरीक्षा ठरणार आहे.

बंडखोर आमदारांचा नेमका मुक्काम कुठं?

राज्यापालांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगण्यात आले आहे. उद्या बहुमत सिद्ध करावे असे पत्र राज्यपाल  भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. उद्याच बहुमत सिद्ध करावे लागणार असल्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे आम्ही उद्याच्या बहुमत चाचणीत सहभागी होणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मात्र बहुमत चाचणीत सहभागी होण्यासाठी मुंबईत उद्या दाखल होणाऱ्या बंडखोर आमदारांचा मुक्काम कुठे असेल याबाबत मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे. जरी एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांच्या मुक्कामाचे ठिकाण सांगण्यास नकार दिला आहे, मात्र या आमदारांच्या मुक्कामाचे ठिकाण  मुंबई, ठाणे, सुरत, आणि  गोवा  या चार ठिकाणांपैकी एक असू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत  आहे.

हे सुद्धा वाचा
महाराष्ट्र राज्य विधानसभासत्तेचं गणित
विधानसभेचे एकूण सदस्य288
दिवंगत सदस्य01
कारगृहात सदस्य02
सध्याची सदस्य संख्या285
एकनाथ शिंदे गटाकडे किती आमदार39
आता सभागृहाची सदस्य संख्या285
बहुमताचा आकडा143
भाजपचं संख्याबळभाजप (106)+शिंदे गट (39)+अपक्ष (27)=172
मविआचं संख्याबळशिवसेना (16)+ राष्ट्रवादी (51)+ काँग्रेस (44)= 111
शिंदे गट भाजपसोबत न गेल्यास भाजपकडे किती संख्याबळ?भाजप (106)+ अपक्ष (27) = 133

राज्यापालांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव

राज्यपालांचा हा निर्णय म्हणजे मोदींच्या राफेल विमानपेक्षाही अधिक वेगवान आहे. राज्यपालांचा विशेष अधिवेशनाचा निर्णय बेकायदेशीर असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात आम्ही  सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.