राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांनी 82 वर्षी केलं मतदान, पुत्र राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिला आधार
राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांनी 82 वर्षी केलं मतदान
उस्मानाबाद : राज्याचे माजी गृहमंत्री 82 वर्षीय डॉ. पद्मसिंह पाटील (Padmasinh Patil) यांनी सहकुटुंब तेर या त्यांच्या गावी ग्रामपंचायत निवडणुकीत (Grampanchayat Elections) मतदानाचा हक्क बजावला. पाटील यांचे पुत्र भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी स्वतः गाडी चालवत केंद्रावर दाखल झाले. आमदार राणा पाटील यांनी चालताना पाटील यांना आधार दिला.
पद्मसिंह पाटील यांचे वय झाल्याने त्यांना मतदान करण्यासाठी आमदार राणा यांनी मदतनीस म्हणून अर्ज भरला व डॉ पाटील यांचे मतदान करताना मदत केली. गेली 40 वर्षांपासून तेर हे डॉ पाटील यांचा गड राहिलेला आहे, ते स्वतः मतदानासाठी आले व ज्येष्ठ नागरिक यांच्याशी संवाद साधला, यावेळी पाटील पिता पुत्राचे प्रेम आणि पाटील यांचा ज्येष्ठ नागरिक यांच्याशी असलेला स्नेह यामुळे भावनिक वातावरण निर्माण झाले होते.
राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पदमसिंह पाटील, त्यांचे पुत्र भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अर्चना पाटील, मल्हार पाटील यांनी सहकुटुंब उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथे मतदानाचा हक्क बजावला.
केंद्रात व राज्यात भाजप सरकार असल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील कृष्णा खोरे, रेल्वे, वैद्यकीय महाविद्यालयसह अनेक विषय मार्गी लागल्याने भाजपला तेरसह जिल्ह्यात मोठे यश मिळेल असा विश्वास आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी व्यक्त केला.
तेर हे गाव डॉ पाटील कुटुंबाचे मूळ गाव आहे. तेर ग्रामपंचायत येथे तिरंगी लढत होत आहे. भाजप, शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडी व आम आदमी पार्टीनेही उमेदवार रिंगणात उभे केले आहेत. 17 सदस्य व सरपंच असे 18 जागासाठी लढत होत असून जवळपास 11 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
तेर या गावची ग्रामपंचायत 40 वर्षांपासून डॉ पाटील परिवाराच्या ताब्यात होती त्यामुळे आता लढत प्रतिष्टेची बनली आहे. यावेळी आमदार पाटील यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.