शरद पवार म्हणजे भीष्म पितामह, भाजप खासदाराकडून जाहीर कौतुक

"महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये शरद पवार यांनी भीष्म पितामह भूमिका निभावली" अशा शब्दात भाजपच्या खासदाराने शरद पवारांचे कौतुक केले (BJP MP Appreciate Sharad Pawar) आहे. 

शरद पवार म्हणजे भीष्म पितामह, भाजप खासदाराकडून जाहीर कौतुक
Follow us
| Updated on: Nov 28, 2019 | 12:06 AM

लखनऊ (उत्तरप्रदेश) : राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार येणार हे निश्चित झालं (BJP MP Appreciate Sharad Pawar) आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पाडण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची खेळी असल्याचे चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. यामुळे शरद पवारांचे अनेकांकडून कौतुक होत (BJP MP Appreciate Sharad Pawar) आहे. “महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये शरद पवार यांनी भीष्म पितामह भूमिका निभावली” अशा शब्दात भाजपच्या खासदाराने शरद पवारांचे कौतुक केले (BJP MP Appreciate Sharad Pawar) आहे.

“महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीच्या युतीचे श्रेय राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना जाते. जर शरद पवार नसते तर महाराष्ट्र विकास आघाडी म्हणजे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीची युती झाली नसती. तसेच या तिघांचे युतीतील सरकार अस्तित्वात येणे अशक्य होतं. असे मत भाजप खासदार जगदंबिका पाल यांनी व्यक्त केलं आहे.”

शरद पवारांचे कौतुक करताना जगदंबिका पाल म्हणाले, “शरद पवार यांनी भीष्म पितामह भूमिका निभावली. जर ते नसते तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांनी महाराष्ट्रात सरकार बनवण्याबाबत कधी विचारही केला नसता.”

“जोपर्यंत शरद पवार आहेत, तोपर्यंत या तिन्ही पक्षांची आघाडी कायम राहिलं,” असेही मत भाजप खासदार जगदंबिका पाल यांनी व्यक्त केले. जगदंबिका पाल हे उत्तर प्रदेशातील डुमारियागंजचे भाजप खासदार (BJP MP Appreciate Sharad Pawar) आहेत.

भाजपकडे संख्याबळ नसूनही त्यांनी सरकार का बनवले, असे पाल यांना विचारले असता ते म्हणाले, “आम्ही सरकार बनवण्यासाठी गेलो नव्हतो. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आमच्याकडे सरकार बनवण्यासाठी आले होते. त्यांनी आमच्याशी संपर्क साधला होता. आम्ही राष्ट्रवादीला आमंत्रित केले नव्हते. अजित पवार स्वत: राष्ट्रवादीच्या 54 आमदारांचे सही केलेले पत्र आमच्याकडे घेऊन आले होते.” असेही ते म्हणाले.

“आमच्याकडे संख्याबळ नाही आम्ही सरकार बनवणार नाही असे भाजप नेत्यांनी यापूर्वी अनेकदा सांगितले होते. पण अजित पवार यांनी आमच्याकडे सरकार बनवण्याची विनंती केली. त्यामुळे आम्हाला राज्यात सत्ता स्थापनेचा दावा करावा लागला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ (BJP MP Appreciate Sharad Pawar) घेतली.”

“महाराष्ट्रात सर्वात कमी वेळ टिकलेले सरकार बनलं. शनिवारी (23 नोव्हेंबर) सकाळी 8 वाजता शपथविधी झाल्यानंतर मंगळवारी (26 नोव्हेंबर) भाजप सरकार पडले. हे सरकार फक्त 80 तास चालले.” असेही पाल म्हणाले.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.