महासेनाआघाडी किंवा युती, शिवसेनेशिवाय सत्तास्थापन होऊ शकत नाही : दिवाकर रावते
महाराष्ट्रात शिवसेनेचं सरकार येणार," असा विश्वासही रावते यांनी व्यक्त (Diwakar Raote on Maharashtra political crisis) केला.
औरंगाबाद : “येत्या पाच वर्षात शिवसेना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार हे पक्के (Diwakar Raote on Maharashtra political crisis) आहे. शिवसेनेशिवाय राज्यात सत्ताच स्थापन होऊ शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार,” असे वक्तव्य शिवसेना नेते आणि माजी मंत्री दिवाकर रावते यांनी औरंगाबाद येथे केलं (Diwakar Raote on Maharashtra political crisis) आहे.
“महासेना आघाडी असू दे किंवा युती… राज्यात शिवसेनेशिवाय सत्ताच स्थापन होऊ शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेचं सरकार येणार,” असा विश्वासही रावते यांनी व्यक्त (Diwakar Raote on Maharashtra political crisis) केला.
“राज्यात परतीच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान झाल आहे. त्या शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी शिवसेना प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांसाठी प्रत्येक ठिकाणी मदत केंद्र शिवसेनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहेत. या केंद्रांवर जाऊन शिवसेनेचे नेते शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत आहे. आज ना उद्या आमचीच सत्ता येणार आहे. त्यावेळी आता सुरु असलेले दौरे कामी येतील,” असं दिवाकर रावते म्हणाले.
दिवाकर रावते यांनी औरंगाबादेत गंगापूर तालुक्यातील मदत केंद्रांना भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका मांडली. “शिवसेनेशिवाय कोणताही पक्ष राज्यात सत्ता स्थापन करू शकणार नाही. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री केल्याशिवाय कोणाची सत्ता येऊ शकत नाही. भागवत यांनी कोणाला उद्देशून बोलले हे पाहावे लागेल. त्यांनी आपल्याच पक्षातील लोकांचे कान टोचले असतील माहीत नाही.” असा टोलाही त्यांनी (Diwakar Raote on Maharashtra political crisis) लगावला
“शिवसेनेचे नेते मदत केंद्राला भेट देऊन त्याबाबतचा अहवाल मातोश्रीवर सादर करणार आहेत. शेतकरी नुकसानबाबत सर्व्हे झाला पाहिजे. सध्या दोन प्रकारच्या याद्या केल्या आहेत ज्यामध्ये विमा काढलेले आणि विमा न काढलेले अशा या याद्या आहेत. ज्यांनी विमा काढला, त्यांच्यासाठी विमा कंपनीकडून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत तर ज्यांनी विमा काढलेला नाही त्यांच्यासाठी शासन दरबारी मदत घ्यावी लागणार आहे. त्यासाठी शिवसेना प्रयत्न करत असल्याची माहिती दिवाकर रावते यांनी दिली.
तसेच 2016 मध्ये झालेल्या कर्जमाफीपासून वंचित असलेल्या लोकांना त्याचा फायदा मिळावा यासाठी मदत करणार आहे. कर्जमाफीसोबत विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफ केले आहेत. सर्व बँकांना तोंडी मागणी केली की कर्ज परत मागण्याच्या नोटीस काढू नका. शेतकऱ्यांच्या वेदनांची जाणीव करणार धोरण तयार करायला पाहिजे. अशी शिवसेनेची भूमिका असल्याचं देखील दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषदेत (Diwakar Raote on Maharashtra political crisis) सांगितलं.