VIDEO | राजकारणात जो आपला विरोध करतो, तो उद्या आपल्या सोबतही असेल, कोश्यारींचं सूचक वक्तव्य
"तुमच्यात शक्ती, भक्ती, बुद्धिमत्ता यांच्यासोबत सगळ्यात जास्त तुम्हाला गरज आहे चातुर्याची. जर तुम्ही युक्तीने वागलात, तर तुम्हाला जे इथे दिसत आहेत, ते व्यासपीठावर दिसतील. कारण छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय महाराष्ट्रच काय, देशही चालू शकत नाही" असं राज्यपाल म्हणाले.
मुंबई : राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचं महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार असलं, तरी भविष्यात शिवसेना-भाजप एकत्र येण्याची भाकितं अनेकदा वर्तवली जातात. मात्र महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजकारणात जो आपला विरोध करतो, तो उद्या आपल्या सोबतही असेल, असं सूचक वक्तव्य कोश्यारींनी केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकीय गणित बदलणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. “अपने के साथ शक्ती, भक्ती, बुद्धी और सबसे अधिक युक्ती चाहिये, अगर आप युक्ती से चलेंगे, तो जो आपको यहा दिखाई दे रहे है, वो भी इधर मंच पर दिखाई देंगे, क्योंकि छत्रपती शिवाजी महाराज के बिना महाराष्ट्र तो क्या देश भी नही चल सकता” असं कोश्यारी म्हणाले. शिवजयंती निमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आयोजित कार्यक्रमात ते शनिवारी बोलत होते.
काय म्हणाले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी?
“तुमच्यात शक्ती, भक्ती, बुद्धिमत्ता यांच्यासोबत सगळ्यात जास्त तुम्हाला गरज आहे चातुर्याची. जर तुम्ही युक्तीने वागलात, तर तुम्हाला जे इथे दिसत आहेत, ते व्यासपीठावर दिसतील. कारण छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय महाराष्ट्रच काय, देशही चालू शकत नाही” असं राज्यपाल म्हणाले.
“छत्रपती शिवाजी महाराज यांना मानत असाल, तर हे मान्य करावे लागेल, की समाजातील वाईट प्रवृत्ती विरोधात संग्राम करावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत. मी रा. स्व. संघ परिवारासोबत अनेक शाळा पाहिल्या. राज्यातील विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जास्त माहिती मिळाली पाहिजे. शक्तीसह युक्तीने शिवाजी महाराजांनी काम केले, तसेच करावे लागेल, सगळ्यांना सोबत घेऊन जात रहा” असं राज्यपाल कोश्यारी म्हणाले.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
फिरकी बॉलवर नितेश राणेंची आक्रमक फटकेबाजी, उपस्थितांनी मोबाईलमध्ये कैद केला व्हिडीओ
Video: …असे चुX#@ देशात भरपूर,पत्रकारांनी सोमय्यांबद्दल विचारताच संजय राऊत भडकले, पाहा काय म्हणाले?