BhagatSingh Koshyari | यह आमदार कामका भी और कामदार भी… नितेश राणेंवर राज्यपालांकडून स्तुतिसुमनं…

कणकवली तळेरे येथे एका महाविद्यालयाच्या इमारतीच्या उदघाटन कार्यक्रमात बोलताना राज्यपाल कोशारी यांनी नितेश राणेंबाबत हे वक्तव्य केलं.

BhagatSingh Koshyari | यह आमदार कामका भी और कामदार भी... नितेश राणेंवर राज्यपालांकडून स्तुतिसुमनं...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 3:46 PM

सिंधुदूर्गः शिवसेना आणि भाजपविरोधी पक्षांवर नेहमीच कोकणी स्टाइलने टीका करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणेंची (Nitesh Rane) पाठ खुद्द राज्यपालांनी थोपटलीय. कोकणातील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी नितेश राणेंचं कौतुक केलंय. हे आमदार कामाचेही आहेत अन् कामदारही आहेत, असा खास उल्लेख त्यांनी केला. एका भाषणादरम्यान व्यासपीठावर बसलेल्या नितेश राणेंचा उल्लेख करताना त्यांनी हे वाक्य वापरलं त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे त्याच व्यासपीठावर बसलेले एकनाथ शिंदे गटाचे दीपक केसरकरदेखील (Deepak Kesarkar) उपस्थित होते. केसरकर हे नितेश राणे यांचे कट्टर विरोधक. आता खुद्द राज्यपालांनीच व्यासपीठावर कौतुक केल्यामुळे केसरकरांची अवस्थाही पाहण्यासारखी झाली होती.

राज्यपालांचं वाक्य काय?

कणकवली तळेरे येथे एका महाविद्यालयाच्या इमारतीच्या उदघाटन कार्यक्रमात बोलताना राज्यपाल कोशारी यांनी नितेश राणेंबाबत हे वक्तव्य केलं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व्यासपीठावर भाषणासाठी उभे राहिले. सुरुवातीला मंचावर उपस्थित सर्वांची नावं घेताना त्यांनी सदर वाक्य उच्चारलं. ते म्हणाले, मंचपर उपस्थित इस प्रदेश के शिक्षणमंत्री दीपक केसरकर, युवा आमदार कामका भी है, कामदार भी है.. नितेश राणे.. कुलगुरू सुहास बेनेगल, उपकुलगुरू प्रवीण कुलकर्णी , सर्व प्राध्यापक गण आणि सर्व छात्र और मित्र गण…

केसरकर-राणे वाद शमतोय?

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे हे कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे दीपक केसरकर यांच्याशी त्यांचे जुने वितुष्ट आहे. मात्र महाराष्ट्रातील सत्ताबदलात एकनाथ शिंदे गट आणि भाजप अशी युती झाल्याने दीपक केसरकर आणि नितेश राणे यांना आपल्यातील आरोप-प्रत्यारोपांची धार काहीशी कमी करावी लागली आहे. नव्याने युती झाली तेव्हाही केसरकर यांनी राणे कुटुंबाने आता ठाकरे घराण्यावर टीका करणे टाळावे, अशा आशयाचे आव्हान दिले होते. त्यावर नितेश राणेंचीही धारदार टीका आली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोघांमधील शाब्दिक चकमक कमी झाली आहे. तसेच दीपक केसरकरांना शालेय शिक्षणमंत्री पद मिळालय आणि नितेश राणेंना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिलण्याची शक्यता आहे. आगामी काळात हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर असतील. त्यामुळे परस्परविरोधी आक्रमक नसली तरीही शेलक्या शब्दातील टीका टिप्पणी या दोघांकडूनही ऐकायला मिळण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.